Ajit Pawar On Lok Sabha Election 2024 saam tv
महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024: अजित पवार गटाकडून निवडणुकीची तयारी सुरू, विधानसभा-लोकसभेच्या लढवणार इतक्या जागा

अजित पवार गटाकडून निवडणुकीची तयारी सुरू, विधानसभा-लोकसभेच्या लढवणार इतक्या जागा

साम टिव्ही ब्युरो

Ajit Pawar On Election 2024: राज्यातील राजकारणाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी पक्षात फूट पाडून वेगळं झालेल्या अजित पवार गट आतापासूनच २०२४ च्या निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. अजित पवार गटाने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार गट लोकसभेला १३ ते १५ जागा लढवू शकतो. तर विधानसभेला ९० जागा लढवणार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आधीच स्पष्ट केलं होतं. दोन आकडी जागा जिंकण्याची अजित पवार गटाची तयारी सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.

राष्ट्रवादीत दोन गट, अजित पवारांचा पक्षावर दावा

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी थेट पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर आपला दावा सांगितला आहे. अजित पवार यांनी निवडणूक आयोगात धाव आयोगात एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाची निशाणी घड्याळ या दोन्हींवर दावा सांगण्यात आला आहे. (Latest Marathi News)

यातच अशी माहिती समोर आली आहे की, अजित पवार यांनी दोन दिवस आधीच निवडणूक आयोगात ही याचिका दाखल केली होती. या आयाचिकेत ४० आमदारांनी सही केलेलं पात्र देखील असल्याचं समजतं आहे. यामध्ये अजित पवार यांना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

यातच आज शरद पवार यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक घेतली. या बैठकीला पीसी चाको, योगानंद शास्त्री, विरेंद्र वर्मा, जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे, फौजिया खान, वंदना चव्हाण यांच्यासह १३ नेते उपस्थित आहेत. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणले आहेत की, मीच पक्षाचा अध्यक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: प्रवीण गोयल आणि आई पूजा गोयल यांची १२ तास चौकशी

Ratnagiri Tourism : कोकणातील खास आकर्षण; पावसाळ्यात आवर्जून फिरा रत्नागिरीतील 'हे' २ समुद्रकिनारे

गुगलवर हत्येचे पर्याय शोधले, लोहगडवरून ढकलण्याचा सराव केला; केतन अग्रवाल खून प्रकरणाचा थरारक उलगडा

TET Exam Update : आज होणारी TET परीक्षा पुढे ढकलली, दिल्ली कनेक्शन आणि दीड कोटींचा व्यवहार; मोठी अपडेट समोर

भयंकर! ७ वर्षांची मुलगी शेजारी झोपलेली असतानाच पत्नीचा गळा चिरून खून; नंतर पतीने मेट्रोसमोर उडी मारून संपवलं आयुष्य

SCROLL FOR NEXT