Maharashtra Politics  Google
महाराष्ट्र

Maharashtra Politics : स्टार प्रचारक, राज्यमंत्रिपद आणि आमदारकी; शरद पवार गटाकडून अमोल मिटकरींना जबर ऑफर? चर्चांना उधाण

amol mitkari latest news : शरद पवार गटाकडून अमोल मिटकरींना ऑफर मिळाल्याची माहिती मिळत आहे. या वृत्ताला स्वत: अमोल मिटकरी यांना दुजोरा दिला आहे.

Vishal Gangurde

अक्षय गवळी, साम टीव्ही प्रतिनिधी

अकोला : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरी यांना शरद पवार गटाची प्रवेशाची ऑफर मिळाल्यााचं वृत्त हाती आलं आहे. शरद पवार गटाच्या राज्यातील बड्या नेत्यानं मिटकरींना पक्षप्रवेशाची ऑफर दिल्याचं बोललं जात आहे. बड्या नेत्याचा फोन आल्याच्या बातमीला आमदार मिटकरींनी दुजोरा दिला आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाचं स्टार प्रचारक पद, सत्ता आल्यानंतर राज्यमंत्रिपद आणि विधान परिषदेची आमदारकी अशी ऑफर दिल्याची सूत्रांची माहिती आहे.

शरद पवार गटाच्या ऑफरनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, आमदार अमोल मिटकरींनी शरद पवार गटाची ऑफर नाकारल्याची माहिती मिळत आहे. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत अजित पवारांशी गद्दारी करणार नसल्याचं आमदार मिटकरींनी शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला उत्तर दिल्याची माहिती हाती आली आहे. आपल्या सात पिढ्या अजित पवारांच्या ऋणातून उतराई होणार नसल्याचा अमोल मिटकरी यांची भावना व्यक्त केली.

मिटकरी घेणार प्रकाश आंबेडकरांची भेट

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी उद्या प्रकाश आंबेडकरांची भेट घेणार आहेत. अकोल्यातील यशवंत निवासस्थानी आमदार अमोल मिटकरी हे प्रकाश आंबेडकरांची भेट घेणार आहेत. अजित पवार आणि बाळासाहेब आंबेडकरांनी आगामी विधानसभा निवडणुकीत एकत्र यावं, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी मत व्यक्त केलं. आंबेडकरांच्या काही अटीशर्ती असेल तर आपण मध्यस्थी म्हणून काम करू, असेही ते म्हटले होते. या संदर्भातच आज रात्री अजित पवारांसोबत आपण स्वतः बोलणार असल्याचंही मिटकरी म्हटले.s

आमदार नितेश राणे यांच्यावर भाष्य करताना मिटकरी म्हणाले, ' त्या व्यक्तीबद्दल बोलावं वाटत नाहीये. प्रत्येक तरुण सुशिक्षित झालाय. त्यांचा नादी कोणी लागणार नाही. नितेश राणेंचे वक्तव्य कोणीही लोकशाहीमध्ये खपवून घेणार नाही. त्यांना आवरलं नाही तर त्यांच्याच पक्षांना नुकसान भोगावे लागेल. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या तोंडाला पट्टा लावावा, असा सल्ला मिटकरी यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palash Muchhal : स्मृतीचा होणारा नवरा मुंबईत रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Ajit Pawar : रस्त्याची दयनीय अवस्था, गावकऱ्यांना संताप अनावर, अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्याचा दिला इशारा

Jalgaon : मध्यरात्री काळाचा घाला, दुचाकीवर जाणाऱ्या ४ मित्रांचा मृत्यू, जळगावमध्ये भीषण अपघात

Aditi Tatkare: ५२ लाख महिला अपात्र नाहीत, मंत्री आदिती तटकरेंचं लाडक्या बहि‍णींना आवाहन

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

SCROLL FOR NEXT