Ajit Pawar On Maharashtra-Karnataka Border Dispute
Ajit Pawar On Maharashtra-Karnataka Border Dispute Saam Tv
महाराष्ट्र

अरे ला कारे नं उत्तर द्या, तक्रारी कसल्या करताय?; बेळगावात महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला झाल्यानंतर अजित पवार संतापले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Maharashtra-Karnataka Border Dispute: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणखी चिघळला आहे. बेळगाव येथे महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला आहे. हिरबागेवाडी टोलनाक्यावर ही घटना घडली आहे. या घटनेनंतर महाराष्ट्रातून संताप व्यक्त होत आहे. अशात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला होतो तेव्हा तक्रारी कसल्या करतायत? कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना अरे ला कारे ने उत्तर द्या असं आवाहन अजित पवारांनी सरकारला केलं आहे. (Maharashtra News)

बेळगाव शहर आणि परिसरात कन्नड संघटनांनी मंगळवारी सकाळपासूनच वातावरण बिघडण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे दिसले. काही वेळापूर्वी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील हिरे बागेवाडीजवळ महाराष्ट्र राज्यातील वाहनांना लक्ष्य करण्यात आले. वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे. (Maharashtra-Karnataka Border Dispute)

या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार आक्रमक झाले आहेत. अजित पवार म्हणाले की, तक्रार काय करतात. त्यांच्या अरे ला कारे ने उत्तर द्या ना. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची तक्रार काय करता. महाराष्ट्राची काय ताकड भूमिका आहे हे दाखवलं पाहिजे. कर्नाटकचे मुख्यमंत्री ज्याप्रकारे वक्तव्य करतायत तसं उत्तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे असं अजित पवार आक्रमकपणे म्हणाले आहेत. (Latest Marathi News)

हा वाद काय भारत-पाकिस्तान नाही: उदय सामंत

उद्योग मंत्री उदय सामंत याबाबत म्हणाले की, कर्नाटकमध्ये ज्या संघटनेने हे कृत्य केलंय त्याचा जाहीर निषेध करतो. संबंधितांवर कारवाई झाली पाहीजे, राज्य सरकार कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोलेल. सीमावादामध्ये राजकरण करतात त्यांचा मी निषेध करतो. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री चळवळीतील नेते आहेत, त्यांना मार्गदर्शनाची गरज नाही. महाराष्ट्र सीमेवरील गावांना भेट दिली आहे, महाराष्ट्र राज्याला आक्रमकता काय आहे हे सांगायची गरज नाही. देशांतील ही दोन राज्ये आहेत, हा वाद काय भारत-पाकिस्तान नाही असं ते म्हणाले

ही बाब पंतप्रधान तसेच केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मांडणार: शंभूराज देसाई

याबाबत राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामुळे महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जात आहे. शंभूराज देसाई यांनीदेखील या हल्ल्यानंतर निषेध व्यक्त केला असून लवकरच आम्ही ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मांडणार आहोत, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

कन्नड संघटनांची मुजोरी

दरम्यान कन्नड संघटनांमुळे शहराचे वातावरण बिघडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तरीही राष्ट्रीय महामार्ग आणि इतर ठिकाणी कन्नड संघटना जाणीवपूर्वक गोंधळ घालण्याचा प्रयत्न करत आहेत. हिरेबागेवाडी येथे महाराष्ट्रातील ट्रक व इतर वाहनांवर चढून धिंगाणा घालण्यात आला. तसेच लाल- पिवळे झेंडे फडकून महाराष्ट्र सरकार आणि मराठी भाषिकांविरोधात गरळ ओकण्याचे काम कन्नड संघटनांनी केले. कन्नड संघटनाना वेळीच रोखावे अन्यथा मराठी भाषिक जशास तसे उत्तर देतील, असा इशारा यावेळी मराठी भाषिकांनी दिला.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम; नाहीतर येतील आर्थिक अडचणी

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

Beed News: 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला, प्रीतम मुंडेंचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT