Maharashtra Guardian Minister List : पालकमंत्रिपदाचा तिढा प्रजासत्ताक दिनाच्या आधी सुटण्याची शक्यता आहे. जवळपास ८० टक्के जागांवर तिढा सुटलेला आहे. पण २० टक्के जागांवर तिढा कायम आहे. रायगड, पुणे आणि कोल्हापूर यासारख्या काही जागांवरून तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेंच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. गडचिरोली व बीडचे पालकमंत्री पदही कुणाला मिळणार? याकडे लक्ष लागलेय.
रायगड व कोल्हापूर जिल्ह्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेत रस्सीखेंच सुरू आहे, तर मुंबई शहर व साताऱ्यासाठी भाजप व शिवसेना आग्रही आहे. नाशिकसाठी भाजप शिवसेनामध्ये रस्सीखेंच सुरू आहे. तर सोलापूरसाठी भाजप आणि राष्ट्रवादी आमनेसामने आहेत. रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री आदिती तटकरे यांना नको, हा विरोध २०१९ मध्ये देखील करण्यात आला त्यांनतर येथील पालकमंत्री उदय सामंत याच्या कडे देण्यात आले होते.
बीड येथील सरपंच हत्या प्रकरणी पालकमंत्री पद धनजय मुंडे याना देऊ नका? अशी मागणी सर्व पक्षाकडून करण्यात येत आहे. बीडचे पालकमंत्रिपद अजित पवार यांनी घ्यावे या मागणीने जोर धरला आहे. रायगड पालकमंत्रिपद शिवसेनाला देण्यात यावी, अशी मागणी सरकार स्थापन झाल्यापासून होते आहे. भरत गोगवले यांच्याकडून मागणी होत आहे. मात्र राष्ट्रवादीकडून आदिती तटकरे यांनी देखील या ठिकाणी मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे कोणाला मिळणार हे पाहावे लागणार आहे.
कोल्हापूरमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. राष्ट्रवादी मंत्री हसन मुश्रीफ हे पुन्हा पालकमंत्रिपद मिळण्यासाठी आग्रह आहे. तर शिवसेना प्रकाश अबिटकार यांच्याकडून देखील मागणी होत आहे. मुंबई शहर गेल्यावेळी शिवसेनाला सोडण्यात आले होते. ते पुन्हा सोडण्यात यावे अशी मागणी होत आहे. तर आगामी महापालिका निवडणूक असल्यामुळे शिवसेना भाजप दोघे आग्रही आहेत.
साताऱ्यामध्ये सर्वाधिक भाजप आमदार असल्यामुळे हे भाजपला सोडण्यात यावे अशी मागणी होत आहे. मात्र शंभूराजे देसाई देखील आग्रही आहेत. नाशिक मध्ये दादा भुसे आग्रही आहेत मात्र याठिकाणी भाजपची ताकद जास्त असल्यामुळे गिरीश महाजन याचा या ठिकाणी आग्रही आहे.
भाजपकडे असणारे पालकमंत्रिपद राष्ट्रवादी दत्ता भरणे यांच्यासाठी मागणी होत आहे. गडचिरोली पालकमंत्रिपदासाठी मुख्यमंत्री यांनी स्वतः इच्छा व्यक्त केली आहे. मात्र एकनाथ शिंदे यांनी देखील गडचिरोली पालकमंत्रिपद भूषवली आहे. त्यामुळे पुन्हा एकनाथ शिंदे घेणार का ? याकडे लक्ष लागलेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.