ajit pawar  Saam Tv
महाराष्ट्र

Ajit Pawar News : 'मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटतं, पण...'; अजित पवार मनातलं बोलून गेले, पाहा व्हिडिओ

Ajit Pawar Latest news : महायुतीच्या सत्ता स्थापनेला सहा महिनेही झाले नाहीत....मात्र अजित पवारांना मुख्यमंत्री व्हावं वाटतंय... अजित पवारांनी आपली इच्छा उघडपणे बोलून दाखवलीय... नेमकं अजित पवार काय म्हणालेत आणि विरोधकांनी अजित पवारांवर कसं तोंडसुख घेतलंय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....

Saam Tv

सुप्रीम मस्कर, साम टीव्ही

आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री व्हायचंय...अजित पवारांच्या मनातली इच्छा ओठावर आलीय. सहावेळी उपमुख्यमंत्री पद मिळवणाऱ्या अजित पवारांची मुख्यमंत्री होण्याबाबतची इच्छा काही लपून राहिली नाही... मात्र आता भरसभेत अजितदादा गंभीरपणे पाहिल्यांदाच असं वक्तव्य केलंय... पुन्हा पाहा.....अजितदादा काय म्हणालेत....

खरंतर सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्रीपदाचा रेकॉर्ड अजित पवारांच्या नावावर आहे.. तब्बल 6 वेळा अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपद भुषवलंय.. मात्र त्यांना सातत्याने मुख्यमंत्रिपदाने हुलकावणीच दिलीय.. एवढंच नाही तर शिवसेनेच्या फुटीनंतर भाजपनं एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं... त्यामुळे महायुतीची सत्ता आल्यानंतर अजित पवारांना मुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागण्याची चर्चा होती.

मात्र यावेळीही मुख्यमंत्रिपदाने दादांना चकमा दिलाय.. त्यामुळे पुन्हा एकदा अजित पवारांनी मुख्यमंत्रिपदाची सल बोलून दाखवलीय.. तर त्यावरुन संजय राऊतांनी अजित पवारांना खोचक सल्ला दिलाय.. तर जयंत पाटलांनी मात्र अजित पवारांना मुख्यमंत्री होण्याआधीच शुभेच्छा दिल्यात.

'मुख्यमंत्री होण्यासाठी भाजपमध्ये विलिन व्हा, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले. तर जयंत पाटील यांनी अजित पवारांना मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा दिल्या.

महायुतीचं सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपद मिळालंय.. सध्या महायुतीत सगळं काही आलबेल नसल्याची चर्चा आहे.. त्यापार्श्वभुमीवर अजित पवारांनी मनातली सल बोलून दाखवलीय. त्यामुळे शिंदे आणि फडणवीसांनंतर मुख्यमंत्रिपदासाठी अजित पवारांचा नंबर लागणार की कायम उपमुख्यमंत्रिपदाचा नवा रेकॉर्ड रचला जाणार? याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: हार्दिक पांड्या विरोधात पुणे न्यायालयात याचिका दाखल होणार

Navi Mumbai : रीलच्या नावाखाली उच्छाद! नवी मुंबईत आगरी कोळी समाजाच्या पुतळ्याचा अपमान; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Rahul Gandhi Relief : राहुल गांधींना मोठा दिलासा, नाशिकमधील 'तो' खटला बंद, कोर्टात काय घडलं?

LPG Rules Update : वर्षभरात तुम्ही किती गॅस सिलिंडर खरेदी करू शकता? वाचा नियम काय सांगतो

घरगुती गॅस पुरवठ्याबाबत हायकोर्टानं दिला महत्वाचा आदेश, केंद्र सरकारलाही धाडली नोटीस

SCROLL FOR NEXT