Chief Minister Fadnavis: ड्रग्स केसमध्ये कर्मचारी असो की पोलीस अधिकारी थेट बडतर्फच करणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

Home Minister Devendra Fadnavis: ड्रग्स संदर्भात सरकार झिरो टोलरन्सी पॉलिसी अवलंबणार आहे. यात कोणी पोलीस कर्मचारी सापडला तर त्याची गय केली जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी दिलाय.
Devendra Fadnavis
Home Minister Devendra Fadnavissaam tv
Published On

ड्रग्स संदर्भात सरकार झिरो टोलरन्सी पॉलिसी अवलंबणार आहे. ड्रग्सच्या केसमध्ये कोणत्याही पदावरील पोलीस अधिकारी आढळून आला तर त्याच्यावर निलंबनाची कारवाई होणार नाही. त्याला थेट बडतर्फ केले जाईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलीस यंत्रणेला इशारा दिलाय. महाराष्ट्र पोलीस परिषद शनिवारी झाली, त्यात विविध विषयांवर चर्चा झाली. या बैठकीला देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी पोलिसांना इशारा दिला.

बैठकीत झालेल्या चर्चेबाबत माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले, नवीन तिन्ही कायद्यांचे अंमलबजावणी सादरीकरण ,सायबर प्लॅटफॉर्म सादरीकरण,महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आरोप पत्र कसे जलद गतीने न्यायालयासमोर जाईल यावर चर्चा ,ड्रग संदर्भात कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. ड्रग्स संदर्भात झिरो टोलरन्सी आणण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाने करावा, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महिला अत्याचार संदर्भात वेळेत आरोपपत्र दाखल व्हावे हा प्रयत्न असेन. जप्त झालेली संपत्ती परत करण्याची तरतूद करावी जेणेकरून मुद्देमाल परत दिल्याने पोलीस ठाणे रिकामी होतील, अशा सूचनाही मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ड्रग्स संदर्भात कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती देताना फडणवीस म्हणाले, सरकार ड्रग्स संदर्भात झिरो टोलरन्सी पॉलिसी अवलंबणार आहे.

Devendra Fadnavis
State Government: सरकारकडे काम आहे व्हॉट्सअ‍ॅप करा! Whats App वर मिळणार सरकारच्या ५०० सेवांचा लाभ

या प्रकरणात कोणताही पोलीस कर्मचारी किंवा कोणत्याही रँकमधील अधिकारी सापडला, तर त्याचे थेट निलंबन करण्यात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले. महिला अत्याचार संदर्भात वेळेत आरोपपत्र दाखल व्हावे हा प्रयत्न केला जाणार आहे. त्याचे ट्रॅकींग केली जात आहे. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. नवीन कायद्यात एखाद्या गुन्ह्यात लोकांची जप्त केलेली संपत्ती परत करण्याची तरतूद तयार केल्यात. त्याची अंमलबजावणी लवकरच केली जाईल. सहा महिन्यांत लोकांचा मुद्देमाल परत गेला पाहिजे,असंही फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis
Shivsena UBT: भास्कर जाधव यांना आमदारांचा विरोध; ठाकरेच हवे विरोधी पक्षनेते!

दत्ता गाडेचा बदलापूरचा अक्षय शिंदे होणार का?

स्वारगेट बस डेपोमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी दत्ता गाडे या नराधमाला पोलिसांनी गुणाट गावात अटक केली गेली. त्यानंतर दत्ता गाडेसोबत अक्षय शिंदेसारखी पुनरावृत्ती होणार का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला, यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, आता यावर बोलणं खूप लवकर बोलण्यासारखं होईल. पोलिसांनी आरोपीला पकडलंय. आज कस्टडी मिळेल त्यानंतर चौकशी होईल. काही तांत्रिक आणि फॉरेन्सिक माहिती समोर आली त्या एकत्रित करून यावर बोलणं योग्य ठरेल असं फडणवीसांनी यावेळी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com