Ajit Pawar 
महाराष्ट्र

Ajit Pawar: लोकसभेचा पराभव जिव्हारी? अजित पवार बारामती सोडणार?

Ajit Pawar: बारामतीमधील एका कार्यक्रमात अजित पवार यांनी केलेल्या विधानामुळे राजकारणात मोठी खळबळ उडालीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

बारामतीत एवढी कामं करूनही पराभव झालाय, त्यामुळे बारामतीकरांना मी सोडून दुसरा आमदार मिळाला पाहिजे. तेव्हा माझी आठवण येईल, असं म्हणत अजित पवारांनी बारातीतून न लढण्याचे संकेत दिलेत. याचबाबत पाहुयात साम टीव्हीचा हा स्पेशल रिपोर्ट.

लोकसभेला झालेला सुनेत्रा पवारांचा पराभव अजित पवारांच्या चांगलाच जिव्हारी लागलाय...तब्बल 32 वर्षे बारामती विधानसभेचं नेतृत्व केल्यानंतर अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचा पराभव झाला. त्यामुळे अजित पवारांनी बारामतीत उद्विग्न होत बारामतीतून न लढण्याचे संकेत दिलेत.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी विरोधकांचं डिपॉझिट जप्त केलं होतं. मात्र त्याच बारामतीकरांनी लोकसभा निवडणूकीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांच्या विरोधात सुप्रिया सुळेंना 48 हजारांचं लीड दिलं. त्यानंतर अजित पवार अस्वस्थ असल्याची चर्चा रंगलीय. त्यातच शरद पवारांनी युगेंद्र पवारांना ताकत देऊ केलीय. तर काही कार्यकर्त्यांकडून जय पवारांच्या नावाचा आग्रह धरला जातोय. असं असलं तरी अजित पवारांनी हक्काचा मतदारसंघ सोडू नये यावर त्यांचे समर्थक ठाम आहेत.

आधी खासदार आणि त्यानंतर सलग 32 वर्षे आमदार असलेल्या अजित पवार सुनेत्रा पवारांच्या पराभवानंतर व्यथित झाले आहेत. त्यातच संपूर्ण पवार कुटुंब विरोधात गेलंय. त्यामुळे अजित पवारांकडून मतदारांना इशारा देण्यात आलाय. मात्र अजित पवार खरंच बारामती सोडणार की अशा प्रकारची वक्तव्य करून त्यांनी मतपेरणी तर सुरू केली नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुलात रंगू लागल्यायेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT