Ajit Pawar  Saam Tv
महाराष्ट्र

Ajit Pawar Death : मास्टरमाईंड कुणी असो, घरात पाळणा हलवायाला कुणी राहणार नाही, आमदाराचा पुन्हा एकदा इशारा

Ajit Pawar plane crash death news : अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर राज्यात शोककळा पसरली आहे. घातपाताची शक्यता व्यक्त करत आमदार अमोल मिटकरी यांनी गंभीर इशारा दिला असून उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.

Namdeo Kumbhar

अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी

Ajit Pawar plane crash update : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले.. या घटनेमुळे महाराष्ट्र शोकसागरात आहे. अजित पवार यांची अस्थी कलश काल अकोल्यात आणण्यात आली. आज काटेपूर्णा प्रकल्पात अजित दादांच्या अस्थीचे विसर्जन करण्यात आले. यावेळी आमदार अमोल मिटकरीसह त्यांचं पूर्ण कुटुंब आणि कार्यकर्ते उपस्थित होते. अस्थी विसर्जनावेळी आमदार अमोल मिटकरी काहीसे भावुक झाले.

मनात शंकेचं मोठं काहूर, अजूनही विश्वास आहे, अजित दादांचा अपघाती मृत्यू होणं शक्यच नाही. जर घातपाताची शक्यता समोर आली तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. मास्टरमाईंड कुणी असो, भविष्यात त्याच्या घरात पाळणा हलव्याला सुद्धा कुणी राहणार नाही, असा इशारा अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा दिला.

बारामती विमान अपघातचे सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. मात्र अद्याप पर्यंत मिळत नाही. केंद्रीय मंत्र्यांना भेटीची वेळ मागितली आहे, मात्र वेळ मिळत नाहीये. सुनेत्रा वहिनींना भेटूनच पुढचा निर्णय घेऊ. कारण, आज मनात शंकेचं मोठं काहूर आहे. माझा अजूनही विश्वास आहे, अजित दादांचा अपघाती मृत्यू असं होणं शक्यच नाही. दादा आमच्यातून गेले, आमचा अजिबात विश्वास नाही. विधिमंडळातील सर्व सदस्यांसह खासदारांनी राज्यसभेच्या खासदारांनी एकत्रयेण्याची वेळ आहे. कारण अजितदादांचा मृत्यू आपल्या सर्वांना चटका देणार आहे.. यामागे घातपात असेल तर सर्वांनी हा मुद्दा रेटून धरावा, असे मिटकरी म्हणाले.

सर्वांनी प्रधानमंत्रीसह केंद्रीय गृहमंत्री यांची भेट घ्यावी. या गोष्टीच आपण राजकारण करत नाहीये. इतक्या चांगल्या नेत्याचा वाईट अंत कसा असू शकतो. जर घातपाताची शक्यता समोर आली तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. यामागचं मास्टरमाईंड कुणी असो, भविष्यात त्याच्या घरात पाळणा हलव्याला सुद्धा कुणी राहणार नाही, असा इशारा अमोल मिटकरी यांनी दिला. दरम्यान, प्रत्यक्षदर्शी घटना पाहणाऱ्या सरपंचांनी सांगितलं होतं की, विमान लँड होत असताना दोन वेळा पलटी झाले होते. विमानातून कुणी तरी बाहेर पडण्याची धडपड करत होतं. तोपर्यंत विमानाचा ब्लास्ट झाला, असा दावा आमदार मिटकरींनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Trigrahi Yog: 100 वर्षांनंतर सूर्य, शुक्र आणि राहू बनवणार त्रिग्रही योग; या राशींच्या नशीबाचा एका रात्रीत होणार कायापालट

Rice Face Mask For Glowing Skin: चेहऱ्याला लावा तांदळाच्या पाण्याचा फेस मास्क, काचेसारखी त्वचा चमकेल

Guava Raita : घरच्या घरी बनवा टेस्टी पेरु रायता, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्यात बैठक झाली

Virar News: भयानकच! चक्क गटाराच्या पाण्याने फळे धुतली अन् प्यायलाही; मुंबईकरांच्या जीवाशी खेळ, किळसवाणा VIDEO

SCROLL FOR NEXT