Ajit Pawar Death Saam Tv
महाराष्ट्र

Ajit Pawar Death: हेलिकॉप्टर ढगात गेलं अन् पोटात गोळा आला...अजित पवारांनी सांगितला होता प्रवासाचा थरारक अनुभव, जुना व्हिडिओ व्हायरल

Ajit Pawar Plane Crash: अजित पवार यांचे विमान अपघातामध्ये निधन झाले. त्यांचे विमान बारामतीमध्ये कोसळले. या विमान अपघातानंतर अजित पवारांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये अजित पवार हेलिकॉप्टर प्रवासाचा थरारक अनुभव सांगताना दिसले.

Priya More

Summary:

  • अजित पवार यांच्या विमानाला बारामतीमध्ये अपघात झाला

  • विमान अपघातामध्ये अजित पवार यांचा मृत्यू झाला

  • या अपघातामध्ये अजित पवारांसह ५ जणांचा मृत्यू झाला

  • या अपघातानंतर अजित पवारांचा जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. बारामतीमध्ये सकाळी पावणे नऊ वाजता त्यांच्या विमानाला अपघात झाला. बारामती विमानतळाजवळ शेतात त्यांचे विमान कोसळलं. या विमान अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह ५ जणांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. या दुर्घटनेनंतर सोशल मीडियावर अजित पवार यांचा जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात अजित पवारांनी हेलिकॉप्टर प्रवासाचा भीतीदायक अनुभव सांगितला होता. 'हेलिकॉप्टर ढगात गेल्यानंतर पोटात गोळा आला होता...', असं अजित पवार यांनी सांगितलं होतं.

गडचिरोली येथे १७ जुलै २०२४ रोजी एका सभेसाठी अजित पवार हेलिकॉप्टरमधून गेले होते. त्या सभेत त्यांनी हेलिकॉप्टर प्रवासाचा थरारक अनुभव उपस्थितांना सांगितला होता. ते म्हणाले, की 'हेलिकॉप्टरमधून उतरताना बाबा आत्राम मला म्हणाले की आम्हाला वाटत नव्हते, पाऊस होता, ढग होते आता हेलिकॉप्टर कसे यायचे अन् मग कसे उतरणार यामुळे आम्ही सर्वजण चिंतेत होतो. कदाचित कार्यक्रम रद्द होऊन आमचे आम्हाला इथेच भूमिपूजन करावे लागेल की काय अशा प्रकारची शंका त्यांना आली. येताना हेलिकॉप्टरमधून सुरूवातीला नागपूरला बरं वाटलं. नंतर ढगात हेलिकॉप्टर शिरलं. इकडे बघतो ढग, तिकडे बघतो ढग आणि आमचे देवेंद्र फडणवीस निवांत गप्पा मारत बसले. मी म्हणालो बघा जरा बाहेर काही दिसत नाही. कुठे झाडे दिसेनात, कुठे काही दिसेना, जमीन दिसेना. आपण ढगात चाललो, कुठे चाललो... काय चाललो काहीच कळेना. ते म्हणाले काही काळजी करू नका. माझे आतापर्यंच ६ अॅक्सिडेन्ट झालेले आहेत. मी जेव्हा हेलिकॉप्टर आणि विमानात असतो तेव्हा अॅक्सिडेन्ट झाला तरी मला काही होत नाही. त्याच्यामुळे तुम्हालाही काही होणार नाही.'

त्यावर अजित पवार पुढे म्हणाले होते की,'अरे बाबा.. म्हटलं आता हे काय सांगतोय...एक तर पोटात गोळा आलाय माझ्या... आज आषाढी एकादशीसारखं पांडुरंगा पांडुरंगा नाव घेत होतो मनात. आणि या महाराजांचे आम्हाला उपदेश चालू होते की काय काळजी करू नका. खरोखर येईपर्यंत इतके ते निवांत होते. ते म्हणाले याचा मला अनुभव आहे, माझे अनेक अॅक्सिडेन्ट झाले आहेत. परंतु माझ्या कुठेही नखाला देखील धक्का लागला नाही. अशा पद्धतीने बाप-दादांच्या पुण्याईने इथपर्यंत महाराज पोहचले. त्यांची पुण्याई निश्चितपणे उपयोगी पडली. परंतु एकंदरीत सगळे धाकधूक करत होते. माझ्या बाजूला बसेलेले उदय सामंत म्हणाले जमीन दिसायला लागली खाली. मी म्हणालो बरं बाबा जमीन दिसायला लागली. गंमतीचा भाग जाऊ द्या. पण एकंदरीत सगळ्यांनी काळजी घ्यायची असते.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यात मुक्काम करणार

Ajit Pawar Death : हा निव्वळ अपघात, यात राजकारण नाही; अजितदादांच्या निधनानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, पाहा VIDEO

अजित पवारांच्या निधनानंतर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया, म्हणाले- आमच्या घरातला माणूस गेलाय, एकदा मला...

Ajit Pawar Family Photos: अजित पवारांचे अविस्मरणीय क्षणांचे काही फोटो! पाहून डोळ्यात येईल पाणी...

Ajit Pawar Death: अजित पवारांबद्दल तुम्हाला या गोष्टी माहिती आहेत का?

SCROLL FOR NEXT