ajit pawar SaamTV
महाराष्ट्र

"कुणी कोंबड्याला मांजर करतंय, तर कुणी मांजराला कोंबडा करतंय, यातून विकास होईल?"

सध्या सोशल मीडिया वरून कोण कोंबड्याला मांजर करतंय, तर कुणी मांजराला कोंबडा करतंय यातून कोकणच्या विकासाचे मुद्दे सुटणार आहेत का? - अजित पवार (उपमुख्यमंत्री)

अमोल कलये.साम टीव्ही रत्नागिरी

रत्नागिरी : यंदाचे हिवाळी अधिवेशन अत्यंत वादळी ठरत असताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होताना दिसत आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना नेत्यांना महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा विसर पडलाय कि काय? असा प्रश्न निर्माण होतोय. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे विधानभवनात प्रवेश करत असताना भाजपचे आमदार नितेश राणे यांनी 'म्याव-म्याव' असा आवाज काढून आदित्य यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी राणेंच्या या कृतीकडे दुर्लक्ष करत सभागृहात प्रवेश केला.

हे देखील पहा :

यांनतर समाज माध्यमांत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्याचे पाहायला मिळाले. राणे यांच्या "म्याव-म्याव" च्या कृतीनंतर शिवसेना विरुद्ध राणे कुटुंबीय वाद चांगलाच पेटल्याचे दिसून आले. याच वादात अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी उडी घेत एका कोंबडीला मांजरीचा चेहरा मॉर्फ केलेला एक फोटो ट्विटरवर ट्विट केला आणि 'पेहचान कौन?' असे कॅप्शन दिले. साहजिक त्यांचा रोख नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याकडे होता.

मलिक यांच्या ट्विटला अपेक्षित उत्तर राणेंकडून आले. नितेश राणे यांनी ट्विटचा मतितार्थ समजून घेत एका डुकराचा मॉर्फ केला फोटो ट्विट केला आणि 'ही प्रजाती फक्त भंगारात आढळते' असे कॅप्शन त्याला दिले. मात्र, या ट्विटरवरमधून महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नेतेमंडळी विसरली असल्याचेच दिसून आले.

या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज रत्नागिरीमध्ये भाष्य केले आहे. रत्नागिरी जवळच्या मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलताना पवार म्हणाले, सध्या सोशल मीडिया वरून कोण कोंबड्याला मांजर करतंय, तर कुणी मांजराला कोंबडा करतंय यातून कोकणच्या विकासाचे मुद्दे सुटणार आहेत का? अश्या पद्धतीचे राजकारण हे कुणीच करू नये असं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप आमदार नितेश राणे आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना चांगलेच खडे बोल सुनावलेत. एकमेकांची उणीदुणी काढून काहीही सध्या होणार नाही. आपण विकासावर बोलले पाहिजे, असे अजित पवार यावेळी म्हणाले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

World Cup 2025: महिला टीम इंडियाचा 'कबिर खान', लेकींचं स्वप्न साकार करणारा जादूगार

Maharashtra Live News Update: रोहा-रामराज मार्गे अलिबाग जाणाऱ्या मार्गावरील पूल तुटला

अवकाळीच्या मदतीवर अधिकाऱ्यांचा डल्ला, भ्रष्ट अधिका-यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही नाही सोडलं

व्होटी चोरीचा मुद्दा पप्पूपर्यंत पोहचला, राजकारणात आणखी किती पप्पू?

Ritesh Meshram Case: रितेश मेश्राम प्रकरणात मोठी कारवाई, हत्येचा गुन्हा दाखल झालेल्या ८ पोलिसांचे निलंबन

SCROLL FOR NEXT