Ajit Pawar's Akola Visit Saam TV News Marathi
महाराष्ट्र

Ajit Pawar : अजित पवारांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात, अकोला दौऱ्यात घडली दुर्घटना

Ajit Pawar's Akola Visit : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार अकोला दौऱ्यावर असताना त्यांच्या ताफ्यातील अॅम्बुलन्सचा अपघात झाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Namdeo Kumbhar

अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी

Ajit Pawar’s Convoy Incident : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज अकोल्याच्या दौऱ्यावर आहेत. अकोला आणि वाशिम जिल्ह्याची आढावा बैठकीसाठी अजित पवार आले आहेत. या दौऱ्यावेळी अकोल्यात बैठकीसाठी जाताना अजित पवार यांच्या ताफ्यातील रूग्णवाहिकेचा अपघात झाला.

अकोला शिवनी विमानतळाकडून अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात येत असताना ताफ्यातील पाठीमागे असलेल्या ॲम्बुलन्सचा मोठा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवारांच्या ताफ्यातील थार गाडीला अॅम्बुलन्सने धडक दिल्यामुळे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सुदैवाने या अपघातात कुठलेही जीवितहानी झाली नाही.

सदर ॲम्बुलन्स अकोला पोलीस मुख्यालय कार्यालय ठेवण्यात आली आहे. गणेश नामक व्यक्ती ॲम्बुलन्स चालवत होता. अचानक समोर असलेल्या वाहनाला ॲम्बुलन्स धडक लागली.. त्यामुळे हा अपघात झाला आहे.दरम्यान, ज्या ठिकाणी अजित पवार गटाचे माजी आमदार तुकाराम बिडकर यांचा अपघात झाला होता.. त्याच घटनास्थळाचे अगदी हाकेच्या अंतरावर हा अपघात झाला आहे.

बैठकीसाठी अजित पवार अकोला दौऱ्यावर -

अजित पवार आज साडे नऊ वाजता अकोल्यात दाखल झाले. अकोला आणि वाशिम जिल्ह्याची आढावा बैठकीसाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी अजित पवार अकोल्यात आले आहेत. अकोला शिवणी विमानतळावर अजित पवार यांचे स्वागत करण्यात आले. आढावा बैठकीसाठी अजित पवार अकोला जिल्हाधिकारी कार्यालय येथे दाखल झाले आहे.. थोड्याच वेळात अजित पवार आढावा बैठकीला सुरुवात करणार आहे. राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि आमदार अमोल मिटकरीसह अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील आमदार बैठकीसाठी उपस्थित आहेत.

काँग्रेस नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश -

दुपारी १२ वाजता अजित पवारांची पत्रकार परिषद पार पडणार आहे. पत्रकार परिषद आटोपल्यानंतर आमदार अमोल मिटकरी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देणार आहेत. त्यानंतर अकोल्यातल्या पोलीस लॉन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यात काँग्रेसचे माजी महापौर मदन भरगड आणि तसेच इतर पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे बंधूंवरून मविआत बिघाडी; मुंबईत कॉग्रेसचा स्वबळाचा नारा?

Mahayuti: महायुतीचं ठरलं! मुंबईत एकत्र,राज्यात स्वतंत्र, विजयाची रणनिती काय?

Cough Syrup: कफ सिरपनं घेतला आणखी एकाचा जीव; दोन चमचे औषध प्यायल्यानंतर महिलेनं सोडला जीव, रुग्णालयातच घडला धक्कादायक प्रकार

Microwave: मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम केल्याने होतात 'हे' परिणाम

Shocking : धक्कादायक! दारुच्या नशेत ५ जणांचा घरात घुसून महिलेवर सामूहिक अत्याचार

SCROLL FOR NEXT