Ajit Pawar Future CM Banner Saam TV
महाराष्ट्र

Ajit Pawar Future CM Banner: "जनतेच्या मनातील मुख्यमंत्री" अजित पवार; वर्षा बंगला परिसरात झळकले बॅनर, चर्चांना उधाण

Ajit Pawar Banner at Varsha Bungalow Area: वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या परिसरात उपमुख्यमंत्री अजित पवारांचे बॅनर लावण्यात आलेत.

साम टिव्ही ब्युरो

रुपाली बडवे

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री पदावरुन सुरू असलेली रस्सीखेच थांबता थांबत नाहीये. सातत्याने विविध मंत्र्यांचे मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर पाहायला मिळतायत. अशात आता वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या परिसरात उपमुख्यमंत्री अजित पवारांचे बॅनर लावण्यात आलेत. (Latest Ajit Pawar News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान वर्षा बंगला परिसरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर लावण्यात आले आहे. "जनतेच्या मनातील मुख्यमंत्री अजित पवार", असा मजकूर यावर लिहिण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उद्या २२ जुलैला वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त वर्षा बंगला परिसरात हे बॅनर लावण्यात आलेत. सलीम सारंग यांनी अजित पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना हे बॅनर लावलं आहे.

या आधी एप्रिल महिन्यात देखील पुण्यामध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांचा मुख्यमंत्री उल्लेख असलेले बॅनर झळकवण्यात आले होते. अजितदादा हेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे बॅनर्स पुण्यातील (Pune) कोथरूड परिसरात झळकले होते. आता पुन्हा एकदा असे बॅनर झळकल्याने चर्चांना उधाण आलं आहे. पुण्यातील हे बॅनर्स पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips: घरात आजच ठेवा या ५ मूर्ती; लगेच उघडतील नशीबाचे दरवाजे, आर्थिक स्थिती सुधारेल

Bigg Boss Marathi 6 : रुचिता गेली विरोधात; विशालला बसला 440 व्होल्टचा धक्का, पाहा VIDEO

Panvel Karjat Railway: आनंदाची बातमी! कर्जत-पनवेल लोकलने करा प्रवास, या दिवशी धावणार लाईफलाइन; थेट नवी मुंबई एअरपोर्टला जोडणार

Maharashtra Live News Update: सोलापूर - शासकीय कंत्राटदारांची तब्बल 77 कोटी रुपयांची थकबाकी

कसाई बाप! नराधम बापानेच मुलींना वेश्याव्यवसायात ढकलले; नवी मुंबई हादरली

SCROLL FOR NEXT