Ajit Pawar on ₹70,000 Crore Scam Allegations  Saam TV Marathi
महाराष्ट्र

Ajit Pawar : ७० हजार कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपांवर अजित पवार स्पष्ट बोलले, भाजपच्या आरोपाला नेमकं काय दिले प्रत्युत्तर, पाहा

Ajit Pawar on ₹70,000 Crore Scam Allegations :७० हजार कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली. साम टीव्हीच्या ‘ब्लॅक अँड व्हाईट’ कार्यक्रमात त्यांनी श्वेतपत्रिकेचा दाखला देत आरोप फेटाळले.

Namdeo Kumbhar

Ajit Pawar Black & White : महापालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पुन्हा एकदा ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप कऱण्यात आला. भ्रष्ट्राचाराच्या आरोपामुळे राजकारण सोडण्याची दोन वेळा इच्छा झाल्याचे अजित पवार यांनी सांगितले. साम टीव्हीचे संपादक निलेख खरे यांच्या ब्लॅक अॅण्ड व्हाइट कार्यक्रमात अजित पवार यांनी ७० हजार कोटींच्या घोटाळ्यावर प्रत्युत्तर दिले. मी एकाही फाईलमध्ये बदल केला नाही. सचिवांनी आणलेल्या फाईलवर मी सही केली. त्यांनी दिलेल्या फाईलमध्ये मी बदल केला असता तर मी त्याला सर्वस्वी जबाबदार असतो. पण मला टार्गेट केले जातेय. त्यावेळी आरोपांमुळे मी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.

७० हजार कोटींच्या घोटाळ्यावर श्वेतपत्रिका काढण्यात आली होती. माधवराव चितळे यांच्यासह ५ जणांची कमेटी केली. त्यांनी तीन महिने यावर रिसर्च केला. यामध्ये अनियमितता झाली, भ्रष्ट्रचार झाला नसल्याचा रिपोर्ट त्यांनी दिला. आजही हे रेकॉर्डवर आहे, असे अजित पवारांनी सांगितले. राजकारणात आरोप होत असतात असेही यावेळी अजित पवार म्हणाले.

पाटबंदारे खात्याचे आता जलसंपदा मंत्रालय नाव दिले. माझ्यावर २०१० मध्ये आरोप झाले. त्या काळातील मी नंतर माहिती घेतली. त्या काळापर्यंत पाटबंदारे विभागाला पगारासह ४५ हजार कोटी दिले होते. आरोप झाला तोपर्यंत १ मे १९६० पासून २०१० पर्यंत या विभागाचा खर्च ४५ हजार कोटी झाला होता अन् आरोप केला ७० हजार कोटींचा असे अजित पवार म्हणाले.

कोयता गँग वर बोलायला सगळे दबकत आहे. याला दोषी राजकीय पक्ष आहे. निवडणुकीमध्ये यश मिळायला सोपं जातं असं बहुतेक राजकीय पक्षांनी ठरवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे हे आत्ताच नाही तर गेल्या अनेक वर्षापासून गेले अनेक वर्षापासून पुण्यामध्ये ही परिस्थिती निर्माण झाली. पण त्याला मी समजा एका पक्षाचा आहे तर मी एकट्याने करून चालणार नाही. जर तिथे आठ पक्ष दहा पक्ष काम करत असेल तर सगळ्यांनी नाही. आता कंट्रोल आणावा लागलं, असे अजित पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: 9 वर्षांनंतर अचानक समोर आला बॉयफ्रेंड आणि....! लॉन्ग डिस्टन्स कपलचा व्हिडीओ होतोय व्हायरल

Tilgul Ladoo: तिळगुळ लाडू मऊ होण्यासाठी वापरा 'या' ३ सोप्या ट्रिक्स; ही आहे सोपी रेसिपी

Pune : प्रशांत जगतापांचे गुंड टिपू पठाणशी "घनिष्ट" संबंध? जामिनावर बाहेर आलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडून आरोप

Maharashtra Live News Update : पुण्यात अजित पवारांचा भव्य रोड शो

PF Withdrawal: कामाची बातमी! या UPI App मधून काढता येणार PF चे पैसे, वाचा सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT