Supriya Sule Saam Tv
महाराष्ट्र

Supriya Sule:- दादा मुख्यमंत्री झाला तर पहिला हार घालायला मी जाईल, पण.. : सुप्रिया सुळे

Supriya Sule: अजित पवार मुख्यमंत्री झाल्याच सुप्रिया सुळेंची काय प्रतिक्रिया असेल असा प्रश्न करण्यात आला होता.

Bharat Jadhav

(संजय सूर्यवंशी )

Supriya sule comment on Ajit Pawar:

दादा जर पाच वर्षासाठी मुख्यमंत्री झाला तर पहिला हार मी घालेल अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. त्या नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलत होत्या. दादा मुख्यमंत्री होण्याचा आनंद, पण ज्यांनी दोन खासदारांचा पक्ष ते ३०३ खासदारांचा पक्ष बनवण्यासाठी आतापर्यंत काम केले त्यांच्याबद्दल वाईट वाटते, अशीही कोपरखळी सुप्रिया सुळेंनी अजित पवार यांना मारली. (Latest News)

अजित पवारांना जेव्हा मुख्यमंत्री बनवायचं तेव्हा ५ वर्षासाठी बनवू असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं. त्यावरुन सुप्रिया सुळेंना प्रश्न करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना आपल्याला आनंद होईल असं म्हटलं.

राष्ट्रवादीची आई आणि वडील दोघेही शरद पवार

६ ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षचिन्ह कोणाकडे जाणार याची सुनावणी निवडणूक आयोगाकडे होणार आहे. यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की,जर न्याय मिळाला, खरं झालं तर अर्थातच राष्ट्रवादी शरद पवारांची राहील. जन्म देणारी आई त्यावर कधी प्रश्नचिन्ह असते का? आई ही आईच असते आणि राष्ट्रवादीची आई आणि वडील दोघेही शरद पवार आहेत. उद्या आयोगाकडे सुनावणी असताना पेपरच्या आधीच जबाबदार व्यक्ती निकाल सांगताहेत. दिल्लीतील अदृश्य हात महाराष्ट्राचे खच्चीकरण करत असल्याचं सुळे म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धमकीनंतरही बिग बींचा रविवारचा नियम कायम; चाहत्यांना भेटण्यासाठी शोधली भन्नाट शक्कल

Vastu Tips For Wall Clock: घरात घड्याळ कुठे लावावे? वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा कोणती?

Stylish Tops For Women: जीन्सवर कोणत्या प्रकारचे टॉप्स घालावेत? पाहा लेटेस्ट कलेक्शन

Jalgaon Firing: दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांकडून 25 वर्षीय तरुणावर बेछुट गोळीबार, भुसावळ हादरलं!

Co-Ords Sets Dress For Women: दिवाळीनिमित्त महिलांसाठी को-ऑर्ड सेट ड्रेसचे लेटेस्ट 5 पॅटर्न्स

SCROLL FOR NEXT