Ajit Pawar's valuable advice to students SAAM TV
महाराष्ट्र

Ajit Pawar Video: मित्र, मैत्रिणी निवडताना काळजी घ्या! नाहीतर... अजित पवारांचा विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला

Ajit Pawar Latest News: जालना येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी हा सल्ला दिला आहे.

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

Ajit Pawar Advice To Students : वाईट मित्र असले की आयुष्याचं वाटोळं होतं त्यामुळे मित्र आणि मैत्रिणी निवडताना काळजी घ्या असा मोलाचा सल्ला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे. जालना येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी हा सल्ला दिला आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार आज जालना जिल्ह्याच्या दौर्यावर आहेत. या दौऱ्यात अंबड येथे त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. अजित पवार म्हणाले, मित्र मैत्रिणी निवडताना काळजी घेतली पाहिजे, वाईट मित्र असले की आयुष्याचं वाटोळं होतं, वाईट संगती लागतात. त्यामुळे मित्र, मैत्रिणी निवडताना काळजी घेतली पाहिलेज.

'मन की बात'वरून पंतप्रधान मोदींवर टीका

यावेळी बोलताना अजित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मनकी बात कार्यक्रमावरही टीका केली. व्हाट्सअपवरील संदेशही पडताळून फाॅरवर्ड केले पाहिजे. संवाद हा मन की बात नव्हे, तर जन की बात असला पाहिजे असं म्हणत अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.

अजित पवारांना संभाजीनगर नामांतराचा विसर?

दरम्यान जालन्यात बोलताना अजित पवार यांनी छत्रपती संभाजीनगरचा उल्लेख औरंगाबाद असा केला. त्यामुळे त्यांना नामांतराचा विसर पडला की काय? असा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अंबड येथील गुणवंत विद्यार्थी कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी आमदार सतीश चव्हाण यांच नाव घेताना औरंगाबादचे आमदार सतीश चव्हाण असे असे म्हणाले.

येथे पाहा व्हिडिओ...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवारांना धक्का; कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे आघाडीवर

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

Maharashtra Election Result: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? पाहा एका क्लिकवर

Maharashtra Assembly Election Result: सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे 'हे' तीन दिग्गज नेते पिछाडीवर

SCROLL FOR NEXT