ajit pawar  Saam tv
महाराष्ट्र

विमान तिरकं होताच विपरीत घडलं; अजित पवारांच्या अपघाताचा नवा सीसीटीव्ही समोर, VIDEO

ajit pawar death : अजित पवारांच्या अपघाताचा नवा सीसीटीव्ही समोर आलाय. विमान क्षणार्धात कोसळल्याचं सीसीटीव्हीतून दिसत आहे.

Vishal Gangurde

विमान अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल होतोय

अजित पवारांच्या विमान अपघाताचा दुसरा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर

बारामतीच्या गोजुबावीमध्ये अपघाताचा क्षण सीसीटीव्हीत कैद

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताचा आणखी एक नवा सीसीटीव्ही समोर आला आहे. अजित पवारांच्या विमानाचा बारामती विमानतळाजवळ अपघात झाला. बारामती तालुक्यातील एका गावातून अपघाताचा क्षण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. विमान क्षणार्धात कोसळून स्फोट झाल्याचे सीसीटीव्हीतून समोर आलं आहे. या सीसीटीव्हीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.

अजित पवारांच्या विमान अपघाताचा पहिला सीसीटीव्ही व्हिडिओ सकाळच्या सुमारास आला होता. पेट्रोल पंपावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही अपघाताची घटना कैद झाली होती. या व्हिडिओमध्ये विमान कोसळलं. त्यानंतर मोठा स्फोट झाला. या आगीचे ज्वाळा आणि धुराचे लोट आकाशात पसरल्याचे दिसले. याच विमान अपघाताचा आणखी एक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.

बारामतीमधील ग्रामपंचायत गोजुबावीमधील सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय. व्हिडिओमध्ये विमान हवेत घिरट्या घालताना दिसतंय. घिरट्या घातल्यानंतर विमान लँडिग करताना दिसतं. मात्र, क्षणार्धात विमान हे तिरकं झालं.

अजित पवारांचं विमान तिरकं झाल्यानंतर क्षणार्धात जमिनीवर कोसळलं. विमान कोसळल्यानंतर विमानाचा स्फोट झाला. स्फोटानंतर आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट आकाशात पसरले. या अपघाताचा थरार ९ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास सुरू होता.

तत्पूर्वी, अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला आहे. फॉरेन्सिक टीमने त्याचा तपास सुरू केला आहे. टीमकडून तपास पूर्ण झाल्यानंतर विमानाच्या अपघाताचं कारण समोर येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ममता दीदींकडून केंद्र सरकारची कोंडी, राजीनामा न दिल्यानं संघर्ष वाढणार?

Cricketer Death : पंजाब किंग्जच्या माजी क्रिकेटपटूचं ३७ व्या वर्षी निधन, क्रिकेटविश्वात शोककळा

पुण्यात 2000 झाडांची कत्तल होणार? 'ग्रीन कव्हर' धोक्यात, पुणेकरांचा संताप

Mumbai News: ताज आणि ट्रायडेंट हॉटेलवर दहशतवादी हल्ल्याची धमकी, मुंबई पोलिस अलर्ट मोडवर

राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना हिंदी सक्ती! पुन्हा मराठी विरुद्ध हिंदी वाद पेटणार?

SCROLL FOR NEXT