Ajit Pawar saam tv
महाराष्ट्र

स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजित पवारांची तोफ धडाडली, महाराष्ट्र पिंजून काढला

Ajit pawar News : अजित पवार यांनी महाराष्ट्रभर तब्बल ३९ सभा घेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला वेग दिला आहे. बारामती-पिंपरी चिंचवड मॉडेलसारखा विकास करण्याचे आश्वासन त्यांनी मतदारांना दिले.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

Ajit Pawar Maharashtra campaign full details : महाराष्ट्राच्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार प्रचार केला. गेल्या काही दिवसांत त्यांनी राज्यभर ३९ प्रचारसभांना संबोधित केले. पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, सातारा, सांगली या भागांत त्यांची तोफ धडाडली.अजित पवार यांच्या सभांना प्रचंड गर्दी उसळली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह तयार झाला. नगर परिषद, नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीला चांगले यश मिळेल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी बहुजनवाद आणि विकासाला केंद्रस्थानी ठेवून भाषणांवर भर दिल्याचे दिसून आले. संपूर्ण निवडणुकीचा प्रचार हा अजित पवार यांनी मांडलेल्या निधीच्या मुद्याभोवतीच फिरत राहिला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका सांगत असताना अजित पवार यांनी शिव-फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा आणि विकासकामांचे मुद्दे मांडत मतदारांना साद घातली. विकासाच्या बाबतीत अनेक सभामधून अजित पवार यांनी विकासाचं बारामती मॉडेल लोकांसमोर मांडून त्या त्या भागात तश्याच पद्धतीचा विकास करण्यासाठी मतदारांना साद घातली. सत्तेत राहून विकास कामे करायची आहेत. मी बारामती आणि पिंपरी चिंचवडचा विकास ज्या पद्धतीने केला तसा विकास करायचा आहे, अशा पद्धतीने त्यांनी भाषणातून मतदारांना साद घालत विकासावरही भर दिला.

अजित पवार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र पिंजून काढला. त्यांनी दररोज वेगवेगळ्या जिल्ह्यात पाच ते सात सभा घेतल्या. महाराष्ट्राचा पुरोगामी वारसा जपत आम्ही वाटचाल करत आहोत, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राला जी दिशा दाखवली त्याच पद्धतीने आम्हाला महाराष्ट्र पुढे घेऊन जायचा आहे. शेतकरी, महिला, युवकांचा रोजगार, शहरांचा सुनियोजित विकास, पाणी प्रश्न, पर्यारण, लोकसंख्या वाढ तसेच वंचित, दलित, अल्पसंख्यांक, आदिवासी, मागासवर्गीय घटक अशा सर्व बुहजन समाजाच्या मुद्द्यांवर देखील त्यांनी सभेतून भर दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीत शरद पवारांना मोठा धक्का; दोन बड्या नेत्यांचा अजित पवार गटात प्रवेश

Glass Bangles: काचेच्या बांगड्या खरेदी करताना लक्षात ठेवा 'या' महत्त्वाच्या गोष्टी

BMC Election : मुंबईत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती का रखडली? कारण आलं समोर

ठाकरे गटात राडा; यवतमाळमध्ये खासदार संजय देशमुखांचे बॅनर फाडले, VIDEO

Namo Bharat Video : धक्कादायक! नमो भारत ट्रेनमधील 'त्या' कपलचा दुसरा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT