कांजूरमार्ग डम्पिंग अखेर होणार बंद होणार आहे.
भांडुप, कांजूरमार्ग, विकोळी आणि घाटकोपरमध्ये राहणाऱ्या नागरिकांचा अखेर कांजूर डम्पिंग पासून अखेर सुटका
मुंबई उच्च न्यायालयाने कांजूरमार्ग डम्पिंग जागा तीन महिन्यात खाली करण्याचे दिले आदेश
कांजुर डम्पिंगची जागा संरक्षित वन जमीन असल्याचे डम्पिंगचा विस्तार करता येणार नाही. त्यामुळे तीन महिन्यात कांजूर डम्पिंगची जागा मुंबई उच्च न्यायालयाने रिकामी करण्यास सांगितले.
पुणे सासवड रोडवर दिवेघाटात एसटी आणि दुचाकींचा अपघात झाला. ब्रेक निकामी झालेली एसटी दुचाकीला धडकून दिवेघाटात अपघात झाला. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. हा अपघात सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घाटातील पहिल्या वळणाजवळ घडला.
चंद्रपूर जिल्ह्यात आज अनेक ठिकाणी वादळासह पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारपीटही झाली. प्रामुख्याने नागभीड आणि मूल तालुक्यात वादळ, पाऊस आणि गारपीट झाली. नागभीड येथे वादळाने शहरभर धूळ उडवली आणि त्यानंतर पावसाने झोडपून काढले. याच तालुक्यात काही ठिकाणी गारा पडल्या. भाताचे उन्हाळी पीक कापणीवर आले असताना हा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुणे पोलिसांनी लॉज मालक आणि चालक यांच्यासह घर मालकांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
लॉजमध्ये राहायला येणाऱ्या सर्व ग्राहकांची कागदपत्रे व्यवस्थितपणे तपासून त्याची रजिस्टर मध्ये नोंद करा
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या अनुषंगाने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतील लॉजचे मालक-चालक यांची बैठक घेण्यात आली.या बैठकीत अनेक सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत.
कांद्याच्या बाजारभावात दररोज घसरण होत असून आज येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे सरासरी बाजारभाव ७०० ते ८०० रुपयांपर्यंत तर कमीत कमी बाजार भाव १०० ते १५० रुपयांपर्यंत कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे
अलिबाग तालुक्यातील सासवणे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सात सदस्यांना पदावरून बडतर्फ करण्यात आले आहे. कोकण विभागीय आयुक्त विजय सुर्यवंशी यांनी याबबतचे आदेश जारी केले आहेत. ग्रामपंचायतीच्या कामकाजात आर्थिक अनियमिता आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
- सोयगाव तालुक्यात दोन सख्ख्या चुलत भावांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू;तर एकाला वाचविण्यात यश
- नांदगाव येथील घटना;बैल धुण्यासाठी तिघे उतरले होते तलावात
- अखिल शकील पठाण आणि अहियान पठाण असे मृत पावलेल्या दोन्ही अठरा वर्षीय तरुणांचे नाव
- 17 वर्षीय मुलीने वाचवले एका तरुणाचे प्राण
- दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल
- घडलेल्या घटनेने नांदगाव गावात शोकाकुल वातावरण झाले आहे
महाराष्ट्र राज्य रस्तेविकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतलेल्या पूर्व भागातील रिंगरोडच्या कामाला गावगुंडांचे ग्रहण लागले आहे. गाव गुंडांकडून रस्त्याचे काम करणाऱ्या मजुरांना धमक्या दिल्या जात आहेत. याबाबतचा एक व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.
एमएसआरडीसीच्या वतीने हाती घेतलेला रिंगरोड हवेली तालुक्यातून जातो. तालुक्यातील १५ गावांत रिंग रोडचे काम सध्या सुरु आहे. यामध्ये तुळापूर, भावडी, लोणीकंद, पेरणे, बकोरी, डोंगरगाव, वाडे बोल्हाई, गावडेवाडी, मुरकुटेनगर, बिवरी, पेठ, कोरेगावमूळ, शिंदवणे, वळती, तरडे, आळंदी म्हातोबाची या गावांचा समावेश आहे.
पुरंदर विमानतळासाठी ड्रॉन सर्वेला शेतकऱ्यांचा विरोध
रक्तबंबाळ होईपर्यंत पोलिसांचा आंदोलकांवर लाठी चार्ज अशा प्रशासनाचा जाहीर निषेध
अनेक शेतकऱ्यांवरती पोलिसांचा लाठीचार्ज
विमानतळ बाधित गावांमध्ये तणावाचे वातावरण
शेतकरी आक्रमक झाले अमानुषपने शेतकऱ्यांना मारहाण
- गोदावरीच्या प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
- नाशिक महापालिकेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची पर्यावरण प्रेमींची मागणी
- गोदावरीतील पानवेलींच्या विळख्यात अडकून भाविकाचा मृत्यू झाल्यानंतर पर्यावरणप्रेमींची मागणी
- गोदावरीच्या प्रदूषणाकडे महापालिकेचं अक्षम्य दुर्लक्ष, गोदावरीच्या प्रदूषणाला महापालिकाच जबाबदार
- गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यानंतर पानवेली वाहून रामकुंड आणि गोदा घाटाच्या परिसरात आल्या होत्या
- ३ दिवसांपूर्वी बीडहून आलेल्या २५ वर्षीय भाविकाचा पानवेलींच्या विळख्यात अडकून झाला होता मृत्यू
- गोदावरीला पानवेलींचा विळखा नसता तर कदाचित भाविकाचा नाहक मृत्यू झाला नसता, पर्यावरणप्रेमींची भूमिका
- गोदावरीच्या प्रदूषणाला जबाबदार महापालिकेच्या अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करण्यासाठी न्यायालयात याचिका केली आहे
धनंजय मुंडे यांच्या गुंडाकडून मिळणाऱ्या धमक्यांबाबत देखील याचिका केली दाखल
जो पर्यंत आमचा केस निकाल लागत नाही, तोपर्यंत साखर कारखाने किंवा इतर प्रॉपर्टी कुणी खरेदी करू नये यासाठी केली याचिका
सोलापूर शहरातील हुतात्मा स्मृती मंदिरात आज राज्यातील पहिले बौद्ध साहित्य संमेलन पार पडले.या साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक,आंध्र आणि तेलंगणा राज्यातून मोठ्या संख्येने बौद्ध बांधव सामील झाल्याचं चित्र दिसून आलं.एकूण तीन सत्रात या संमेलनाचे आयोजन करण्यात आले.यामध्ये पहिल्या सत्रात श्रीलंकेतुन आलेले पूज्य भंते यश थेरो यांची धम्मदेसना,दुसऱ्या सत्रात विविध विषयावर परिसंवाद तर तिसऱ्या सत्रात भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.या संमेलनात बौद्धगाय विहाराचा ताबा बौद्ध समाजाला मिळावा, सोलापूर विद्यापीठात डॉ. आंबेडकर विचारधारा केंद्र सुरु करावा असे ठराव यावेळी मंजूर करण्यात आले.
- वर्धा जिल्ह्याच्या अनेक भागात अवकाळी पाऊस
- वर्धा जिल्ह्याच्या देवळी, हिंगणघाट,वर्धा, समुद्रपूर तालुक्याच्या अनेक भागात पाऊस
- सकाळपासुन जिल्ह्यात होते ढगाळ वातावरण
- अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ
- काही वेळ बरसला अवकाळी पाऊस
- उन्हाळी पिकांना बसणार फटका
- पावसामुळे नागरिकांना उकाड्याने दिलासा
- नाशिकच्या अंबड एमआयडीसीमध्ये ट्रान्सपोर्ट कंपनीच्या गोडाऊनला आग
- अचानक आग लागल्याने परिसरात नागरिकांमध्ये भीती
- आग विझवण्यासाठी अग्निशमनदल घटनास्थळी दाखल
- आगीत लाखो रुपयांचा नुकसान, आगीचे कारण अस्पष्ट
सिंहगड रोडवरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अतिरिक्त पोलीस आयुक्त थेट रस्त्यावर
अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी केली सिंहगड रोडची पाहणी
गेल्या अनेक दिवसांपासून सिंहगड रोडवर होत आहे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी
नवीन उड्डाणपुलावर देखील काल झाली होती ट्रॅफिक जॅम, आयुक्तांनी पाहणी करत केल्या सूचना
वाहतूक कोंडी होत असलेल्या हॉट स्पॉट वर जाऊन नागरिकांशी अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी जाणून घेतल्या अडचणी
सिंहगड रोडवरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी योग्य उपाययोजना करा अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या अधिकाऱ्यांना सूचना
- मागील दोन दिवसांपासून तापमानात घट झाली असून हवामान विभागाकडून विदर्भात पावसाचा अंदाज व्यक्त केला होता
- ते शहरात ऊन तापत असताना शहरातील काही भागांमध्ये पाऊस तर काही भागात गारा पडला..
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या आदेशानुसार देशभरात ‘वक्फ बोर्ड बचाव’ अभियान राबविण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आज बुलढाणा जिल्ह्यातील मुस्लिम पर्सनल ला बोर्डा च्या पदाधिकाऱ्यांकडून एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचून निवेदन सादर करण्यात आले. वक्फ बोर्ड कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी मुस्लिम समाजाने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. पुढील ७ जुलैपर्यंत दर शुक्रवारी मुस्लिम बांधव वेगवेगळ् प्रकारे आंदोलन करणार आहेत. यात लोकशाही पद्धतीने काळ्या फिती लावणे, मोर्चे काढणे, विविध ठिकाणी आंदोलन करणे, साखळी उपोषण करणे आणि धरणे आंदोलन यांचा समावेश असेल.
मालवण येथे राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवार दिनांक ११ मे रोजी सकाळी 12:30 ते 1:30 दरम्यान होणार आहे. यावेळी मंत्रिमंडळातील इतर मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत. पुतळा अनावरण सोहळ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुपारी २ वाजता कणकवली तालुक्यातील करंजे येथील नारायण राणे यांच्या गोवर्धन गो शाळेचे उद्घाटन करणार आहेत.
पुण्याच्या नवले पूल परिसरामध्ये दुपारच्या सुमारास ही ट्रक ने दोन दुचाकी व दोन रिक्षांना जोराची धडक दिली. दूचाकीस्वाराचा यामध्ये मृत्यू झाला असून एक जण जखमी आहे.तर एकावर उपचार सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी दिली. प्रथमदर्शनी ट्रक हा कात्रज कडून नवले पुलाच्या दिशेने येत होता. नवले पूल परिसरात आल्यानंतर ट्रकचा ब्रेक फेल झाला आणि ट्रकने गाड्यांना उडवलं. यामध्ये एक रिक्षा चालक याने सावधानता बाळगत रिक्षा बाजूला केली मात्र रिक्षाचं मोठं नुकसान झालं असे या रिक्षा चालकाने सांगितला.
मुंबई गोवा महामार्गावर माणगाव बाजार पेठ दरम्यान मोठी वाहतूक कोंडी
० सलग तिसऱ्या दिवशी कोकणात जाणाऱ्या पर्यटकांना वाहतूक कोंडीचा फटका
० मुंबईकडे जाणाऱ्या आणि कोकणात येणाऱ्या दोन्ही मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
० माणगाव बाजारपेठेपासून दोन्ही बाजूला सहा किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा
० रोजच्या वाहतूक कोंडीला कंटाळले स्थानिक माणगावकर आणि पर्यटक
० उन्हाचा चटका आणि वाढती उष्णता यामुळे वाहतुक कोंडीत अडकलेले वाहन चालक आणि प्रवासी हैराण
शिर्डीच्या साईबाबा संस्थानला धमकीचा मेल आला आहे. साई मंदिर भिषण पाईप बॉम्बने उडवून देण्याची धमकी. मेलमध्ये नेमके काय?..साईबाबा संस्थानसह शिर्डी पोलिसांकडून माहिती देण्यास टाळाटाळ. यापूर्वी देखील साई संस्थानला धमकीचे मेल आल्याच्या घटना. यापूर्वीचे मेल निघाले होते फेक. पहलगाम घटनेमुळे वातावरण ढवळून निघाले असताना साई संस्थानला पुन्हा धमकीचा मेल आल्याने एकच खळबळ.
- महापालिकेच्या पश्चिम विभागातील परिसरात दूषित पाणीपुरवठा
- गेल्या काही दिवसांपासून होतोय दूषित पाणीपुरवठा
- संतप्त नागरिकांचा थेट महापालिकेच्या पश्चिम विभागीय पाणीपुरवठा कार्यालयावर धाव
- दूषित पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांनी अधिकाऱ्यांना घेराव घालून विचारला जाब
- दूषित पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात
- वारंवार तक्रारी करूनही शुद्ध पाणीपुरवठा होत नसल्यानं नागरिकांचा संताप अनावर
- शुद्ध पाणीपुरवठा करण्याची नागरिकांची मागणी
- मागील काही दिवसांपासून महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांना सहन करावा लागतोय मनस्ताप
नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार शहादा आणि नवापूर आगाराला नवीन ई-बसेस मिळणार आहेत.
यासाठी आगाराकडून चार्जिंग स्टेशन उभारले जात आहे. चार्जिंग स्टेशनच्या काम 80 टक्के पूर्ण झाला असून, लवकरच 100 % पूर्ण होणार आहे.
त्यामुळे नंदुरबारच्या दुर्गम भागात लालपरी आता नवीन रूपात धावणार आहे. चार्जिंग स्टेशनचे काम जवळपास पूर्ण होण्यात आला आहे.
180 केवीच्या चार्जिंग पॉइंट राहणार असून, एक बसला चार्जिंग होण्यासाठी जवळपास पाच तास लागतील पूर्ण चार्जिंग झाल्यानंतर ही बस तीनशे ते साडेतीनशे किलोमीटर धावणार आहे.
त्यामुळे प्रवाशांना याच्या मोठा फायदा होणार आहे. परंतु नवीन ई-बसेस कधी मिळणार याबाबत कुठलेही शाश्वती आगाराला मिळालेली आहे.
सध्या जिल्ह्यात भंगारवासाची संख्या मोठ्या प्रमाणावर झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
यासाठी अनेक प्रवासी ग्रामीण भागाचे जीवन वाहिनीत प्रवास करणे टाळत आहे. त्यामुळे महामंडळाच्या तिजोरीवर भार पळत असून आता नवीन ई-बसची तयारी सुरू झाली आहे...
धुळ्यात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा खिंडार पडणार असून माजी आमदार शरद पाटील हे आज राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश करत राष्ट्रवादीचा घड्याळ हातात बांधणार आहे, राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये त्यांचा आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रवेश होणार आहे,
यापूर्वी शरद पाटील यांनी शिवसेनेमधून आमदारकी मिळवत त्यानंतर गेल्या काही काळात पक्षातील कुरघुडींना नाराज होत काँग्रेसमध्ये देखील प्रवेश केला होता,
परंतु त्यानंतर काही दिवसातच पुन्हा शिवसेनेत ते परतले होते, परंतु आता पुन्हा एकदा माझ्या आमदार शरद पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे घड्याळ हातात बांधण्याचा निर्णय घेतला आहे,
त्यामुळे आज त्यांचा अधिकृतपणे मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार आहे.
अकलूज येथील मोहिते पाटील यांच्या शेतात थाडलंडच्या पांढर्या जांबळाची लागवड केली आहे. मोहिते पाटील यांच्या शेतातील या नव्या प्रयोगाची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.
आजवर आपण काळ्या- जांभळ्या रंगांची जांभूळ पाहिली-खाल्ली आहेत परंतु अकलूज येथे पांढऱ्या रंगाच्या जांभूळ शेतीचा जिल्ह्यातील पहिला प्रयोग यशस्वी झाला आहे.
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या शेतात थायलंडची पांढरे जांभूळ झाडे लगडली आहेत. मोठ-मोठ्या शहरांतून या पांढऱ्या जांभळास चांगली मागणी आहे.
2022 मध्ये सव्वा एकर क्षेत्रात 15 बाय 12 फूट एवढे अंतर ठेवून 284 पांढऱ्या जांभळाची रोपे लावली. प्रति झाड 40 ते 50 किलो एवढे पांढरे जांभूळ मिळण्याची अपेक्षा आहे.
पाचव्या वर्षापासून प्रति झाड 100 किलोपेक्षा जास्त जांभूळ उत्पादन देईल, असे नंदिनी देवी मोहिते पाटील यांनी सांगितले.
या जांभळास मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर आदी मोठ्या शहरांमध्ये मागणी आहे. नुकतेच 200 किलो पांढरी जांभळे पुणे येथील मार्केटला पाठविली होती. त्यास सुमारे दोनशे रुपयांप्रमाणे दर मिळाला आहे.
कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात एका ज्वेलर्स दुकानात बुरखाधारी महिलेने दुकानातील कर्मचाऱ्यांना बोलण्यात गुंतवून दुकानामधील सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना गेल्या काही दिवसांपूर्वी घडली होती .
याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता . ही बुरखादारी महिला आणि तिच्यासोबत असलेली लहान मुलगी सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालीय .
ही बुरखाधारी महिला खरेदीच्या बहाण्याने ज्वेलर्सच्या दुकानात जाते. दागिने पाहन्याच्या बोलण्यात गुंतवून स्वतः जवळील नकली दागिने ठेवून खरे सोन्याचे दागिने घेऊन पसार होते.
धक्कादायक म्हणजे या ज्वेलर्स दुकानापासून हाकेच्या अंतरावर एसीपी कार्यालय आहे . गुन्हा दाखल झाल्यानंतर देखील ही महिला अन्य काही दुकानांमध्ये गेल्याचे देखील सीसीटीव्ही फुटेज सध्या समोर आलेत .
या दुकानांमध्ये तिच्या हाताला काही लागले नाही मात्र आठ दिवस उलटूनही ही महिला अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाही. बुरखाधारी महिलेमुळे ज्वेलर्स मध्ये भीतीच वातावरण पसरला आहे.
दिवसेंदिवस उन्हाळा वाढत असल्यामुळे पिंपळे गुरव येथील महापालिकेच्या काळुराम जगताप जलतरण तलावात पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढत चालली आहे.
तसेच, अनेकजण आपल्या लहान मुलांना पोहायला शिकवताना दिसत आहेत.
नवी सांगवी, दापोडी, पिंपळे गुरव परिसरातील हा एकमेव तलाव असल्यामुळे मागील महिन्यांपासून पोहण्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत गर्दी होत आहे. .
यामुळे पोहण्यासाठी शौकिनांची गर्दी होत आहे. यामध्ये लहान मुलांची संख्या जास्त आहे. तसेच, काही दृष्टिहीन व दिव्यांग मुलेही पोहण्यासाठी येत आहेत.
पुरुषांसाठी सकाळी ६ ते १० व दुपारी ३ ते ६ अशी पोहण्याची वेळ आहे. दुपारी २ ते ३ ही वेळ महिलांसाठी राखीव आहे. सर्वांसाठी २० रुपये इतका तिकीट दर आहे.
यामध्ये एक तास मनसोक्त पोहायला मिळते. दरमहा ५०० व तिमाही १२०० रुपये तर वार्षिक फी ४५०० रुपये ठेवण्यात आलेली आहे.
जलतरण तलावासाठी पाच जीवरक्षक, दोन कर्मचारी व एका लिपिकाची व्यवस्था करण्यात आली आहे.
शालेय व पदवीच्या परीक्षा संपल्यामुळे पोहण्यासाठी येणाऱ्यां तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. शाळा १६ जूनला सुरू होणार असून, शाळांना आणखी सव्वामहिना सुटी असल्यामुळे अनेकांनी एका महिन्याचे शुल्क भरले
केंद्र सरकार व राज्य शासनाच्या सहकार्यातून महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारक लाभ शेतकत्यांना देण्याच्या उद्दिष्टाने अॅग्रो स्टैंक प्रणाली योजना राबविण्यात आली आहे.
'कसमादे'त अद्याप जेमतेम ६० टक्क्याच्या आसपास काम झाले आहे.
नाशिक जिल्ह्यातील १३ लाख ७८ हजार २३० शेतकऱ्यांना फार्मर आयडी उपलब्ध होणार आहे.
तर नाशिकच्या मालेगाव तालुक्यात एक लाख ४८ हजार ४५१ शेतकऱ्यांना आयडी उपलब्ध होणार आहे.
ही आयडी बनविण्याची मुदत संपली असली तरीही पोर्टलवर अद्याप नोंदणी चालू असल्यामुळे ती लवकरात लवकर करावी आणि योजनांपासून, आर्थिक नुकसान भरपाई पासून वंचित राहू नये असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात येत आहे...
नवले ब्रिजवर मर्सिडीज कारने दुचाकीस्वराला उडवले
अपघातात एका जणांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी
दोन कारचालकांना पुणे पोलिसांनी केली अटक
आरोपींविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
पुण्यातील सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आला गुन्हा दाखल
आज पहाटे चार वाजता घडली अपघाताची घटना
आरोपी ममद्यधुंद अवस्थेत कार चालवत असल्याचा स्थानिकांचा दावा
जखमेवर उपचार सुरू
मेळघाटातील दहेंद्री गावात वीज समस्येने गंभीर रूप धारण केले आहे. विजेची तार पूर्णपणे खाली लोंबुन पडली आहे, इतकी की लहान मुलेही तिच्यापर्यंत पोहोचू शकतात.
अशा परिस्थितीत अनुचित प्रकार घडून जीवित हानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वीज विभागाच्या निष्काळजी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा आणि त्यांना निलंबित करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
जर ही समस्या लवकर सोडवली नाही तर तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे...
जातनिहाय जनगणनेला आमचाही पाठिंबा आहे. सगळ्यात आधी राहुल गांधी यांनी मागणी केली होती.संजय राऊत
पहलगाम हल्ल्यानंतर मी अतिरेक्यांची पाठराखण केली, महाराजांच्या भूमिका करत मी औरंगजेबाची बाजू घेतली. असा विपर्यास करण्याचा केविलवाणा प्रयत्न महाजनांनी केला.
मुळात मी पेहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची नांगी ठेचली पाहिजे, देशवासीयांसोबत माझी ही तिचं भावना आहे.
26/11 च्या हल्ल्यावेळी अतिरेक्यांनी बेछूट गोळीबार केला पण पेहलगाम हल्ल्यावेळी धर्म विचारण्यात आला, ते का अन कशासाठी? याचा विचार आपण करणार आहोत का?
देशांतर्गत कलह निर्माण करण्याचा त्यांचा हेतू होता का? या अनुषंगाने मी केलेलं ते वक्तव्य होतं.
गोळीने एक माणूस मृत पावतो, पण त्या वक्तव्यातून जी अस्वस्थता जाणवते, त्यातून भडका उडाला तर अनेक घरांना आग लागू शकते.
मात्र महाजन अंतरज्ञानी झाले अन त्यांनी भडखाऊ अन बेताल वक्तव्य केली. महाजनांनी भान राखावं अन मोदींच्या मनसुब्यात मिठाचा खडा टाकू नये. असा खोचक सल्ला कोल्हेनी दिला
वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट परीक्षा उद्या होणार आहे..
मात्र लातूरमध्ये नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या वीस वर्षीय विद्यार्थ्याने रूम मध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादाय घटना घडली आहे...
अनिकेत अंकुश कानगुडे असून तो मागच्या दोन वर्षापासून लातूरच्या RCC कोचिंग क्लासेस येथे तयारी करत होता...
दरम्यान मागच्या वेळी अनिकेत कानगुडे या विद्यार्थ्याला 520 च्या जवळपास मार्क मिळाले मात्र वैद्यकीय प्रवेश मिळाला नाही..
पुन्हा तो नीट परीक्षेची तयारी करत होता मात्र परीक्षेच्या एक दिवस आधीच, या विद्यार्थ्याने लातूरमध्ये गळफास घेत आत्महत्या केली आहे..
अनिकेत कानगुडे हा बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातील रुई धानोरा येथील रहिवाशी आहे.आत्महत्या करण्यामागचे नेमकं कारण काय याचा तपास आता पोलीस करत आहेत..
विदर्भात गावरान आंब्याचा सध्या मोठा सीजन सुरु आहे,मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातून अमरावती शहरात गावरानी आंबे विक्रीसाठी दाखल झाले आहे,
यावेळी आंब्याचा मोह आमदार रवी राणा यांना सुद्धा आवरला नाही,
परतवाडा दौऱ्यावर रवी राणा गेले असतांना रस्त्याच्या कडेला आंबे विकणारा खाली बसलेला शेतकरी राणा यांना दिसला व त्यांनी भर रस्त्यात ताफा थांबवून शेतकऱ्याकडून त्यांनी आंबे विकत घेऊन त्याचा आस्वाद घेतला,
रवी राणा यांनी आंब्याची यावेळी खाली बसून चवं चाखली....
परभणीच्या जुना पेडगाव रोड येथील इनायत नगर मध्ये एका मोकाट पिसाळलेल्या कुत्र्याने रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या 5 नागरिकांना चावा घेण्याची घटना घडली आहे.
ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या कुत्र्याने रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या पाच नागरिकांना चावा घेतला आहे.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
तर नागरिकांडून या मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परभणी महानगरपालिकाला केली आहे .
घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद.
एका कार्यक्रमाच्या निमित्याने आले होते गौतम अदानी
सायन्स एंड टेकनलोजी पार्कच्या प्रकल्पावर चर्चा झाल्याची माहिती
जवळपास २ तास शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यात भेट
पुरंदर नियोजित विमानतळाचे पहिल्या दिवशीचे ड्रोन सर्वेक्षण आज सात गावातील बाधित शेतकऱ्यांनी रोखले.
विमानतळ प्रकल्पाच्या दृष्टीने ड्रोन सर्वेक्षण करावयाचे असून त्यास प्रारंभ झाला. मात्र स्थानिक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन दिवसभर शांततामय मार्गाने सर्वेक्षण रोखले.
शासकीय अधिकारी व आंदोलक यांच्यात सर्वेक्षण रोखताना खडाजंगी झाली. आमची संमती नसताना जमिनीची मोजणीका करता?. असा आंदोलकांनी उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, भूसंपादन अधिकारी कल्याण पांढरे व इतर शासकीय अधिकाऱ्यांना जाब विचारला.
सर्वेक्षण करणे हा शासकीय कामाचा भाग असून आम्हाला ते करावेच लागणार आहे. सहकार्य करावे असे आवाहन यावेळी शासकीय अधिकाऱ्यांनी आंदोलकांना केले.
अधिकारी व आंदोलक यांच्यात दिवसभर शाब्दिक चकमकी होत होत्या.त्यावेळी आकाशात फिरत असलेले ड्रोन ताबडतोब थांबवा. असा आग्रह आंदोलकांनी धरला व सर्वेक्षणाची गाडी अडवली. कुंभारवळण व एखतपुर दरम्यान सर्वेक्षण करणारा एक ड्रोन शेतकऱ्यांनी रोखला.
ड्रोन सर्वेक्षण करणारी व्हॅन शेतकऱ्यांनी घेराव घालून सुरू झालेली प्रक्रिया थांबविली होती.सध्याचे दिवस उष्माघाताचे असल्याने ड्रोन सर्वेक्षण थांबवावे अशा प्रकारचे लेखी निवेदन शासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. आज आंदोलनादरम्यान
राधिका देवराम मेमाणे जामदार वस्ती पारगाव मेमाणे (ता. पुरंदर) येथील महिला आंदोलकांना उष्माघाताचा त्रास झाल्याने त्यांना शासकीय रुग्णालय सासवड येथे दाखल करण्यात आले होते. प्रकृती स्थिर असल्याचे समजले.
पौड (ता. मुळशी) येथील नागेश्वर मंदिरात 2 मे 2025 रोजी दुपारी झालेल्या प्रकारामुळे संपूर्ण गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिवाजी मारुती वाघवले (वय 34) यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, चांद नौषाद शेख (वय 19) याने मंदिरात प्रवेश करून अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची विटंबना केली. या घटनेत देवीच्या मूर्तीवर लघुशंका व अश्लील कृत्ये करण्यात आली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
यावेळी आरोपीने मंदिराचे गेट बंद करून मूर्तीला खाली पाडले आणि विटंबना केली.या घटनेनंतर चांद शेख याचा वडील नौषाद शादाब शेख (वय 44) यांनी उपस्थित लोकांना उद्देशून "तुम हिंदू लोक आमचं काहीच करू शकत नाही" असे धमकीचे उद्गार काढल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
पौड येथील नागेश्वर मंदिर व मज्जीत ला पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे करत असून पोलिस निरीक्षक घुले यांनी गुन्हा दाखल केला आहे.
आमिष देवून घराशेजारी राहणाऱ्या दोन चिमुकलींवर एकान लैंगिक अत्याचार केल्याची घटना भंडाऱ्याच्या करडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
या प्रकरणी करडी पोलिसांनी अतुल बुराडे (३६) या आरोपीच्या विरोधात पॉक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली.
आरोपीला न्यायालयानं एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
करडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंढरी या गावातील ही घटना असून आरोपी अतुल बुराडे याच्या घराशेजारी राहणाऱ्या ८ आणि ९ वर्षीय चिमुकलींसोबत मागील काही दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याची माहिती समोर आलंय.
दोन्ही पीडित चिमुकलींवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर त्यांना आरोपी मारण्याची धमकी देत असे, असे पीडितेच्या पालकांनी त्यांच्या तक्रारीत नमूद केलं आहे.
केंद्र सरकारने देशात जातीनिहाय जनगणना करण्याचे जाहीर केले आहे. सरकारच्या या निर्णयाचे पंढरपुरात भाजपच्या वतीने स्वागत करण्यात आले.
पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजप कार्यकर्त्यांनी निर्णयाचे स्वागत केले.
यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ घोषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.
- ११:३० वाजता माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव मध्ये जाऊन सांत्वनपर भेट घेणार आहेत.
- भाजपचे बीड विस्तारक बाबासाहेब आगे यांची काही दिवसांपूर्वी झाली होती हत्या.
- माजलगाव शहरातील भाजप कार्यालयासमोरच नारायण फपाळ याने कोयत्याने वार करत केली होती निर्घृण हत्या.
- मंत्री पंकजा मुंडेंनी कुटुंबियांना फोनवरून धीर दिला होता. आपण भेटायला येणार असंही आश्वासन दिलं होतं.
एकाच आठवड्यात काविळचा दुसरा बळी...
10 वर्षीय मीजबा इलियास शेख या मुलीचा मृत्यू...
संगमनेरमध्ये खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान काल रात्री झाला मृत्यू...
चार दिवसापूर्वी 20 वर्षीय युवतीचा झाला होता मृत्यू...
काविळ साथ रोखण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरूच...
अद्यापही गावात दीडशे रुग्ण असल्याची माहिती...
आज पासून सुरू होणारा तीन दिवसीय उरूस देखील केला अनिश्चित काळासाठी स्थगित...
तर नैतिक जबाबदारी स्वीकारून राजूर गावच्या उपसरपंचांनी दिला राजीनामा...
दूषित पाणी पुरवठ्यामुळे पसरली काविळीची साथ...
पाणी पुरवठ्याकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामसेवक प्रशासकीय सेवेतून बडतर्फ तर आरोग्य अधिकारी निलंबित...
आमदार किरण लहामटे यांच्या गावातच 20 दिवसांपासून काविळीचे थैमान...
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या जन्मोत्सव सोहळ्यास अलंकापुरी अर्थात आळंदी येथे सुरुवात झाली आहे. .
मंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते या सोहळ्याचा शुभारंभ झालाय.
सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवासाठी राज्यातील वारकरी संप्रदाय अलंकापुरीत दाखल झालाय. वारकऱ्यांसाठी पुढील आठवडाभर पर्वणी आहे.
नामवंत महाराजांच्या भजन, कीर्तन अन प्रवचनचं आयोजन आळंदी देवस्थान आणि ग्रामस्थांकडून करण्यात आलंय.
काही कारणास्तव पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्यास उपस्थित राहणार नसले तरी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हजेरी लावतील अशी अपेक्षा आहे.
10 मे ला या सोहळ्याची सांगता होईल.
- मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील दुर्दैवी घटना..
- गौसपाक जावेद शेख असं मृत्यू झालेल्या युवकाचे नाव..
- टाकळी सिकंदर येथे गौसपाक हा बहिणीकडे यात्रा निमित्ताने आला होता..
- उन्हाळ्याचे दिवस असल्याने पोहण्यासाठी कॅनॉल मध्ये वडील आणि भाऊजी यांच्यासोबत गौसपाक गेला होता..
- कॅनॉल मध्ये उडी मारली असता विजेचा जोरदार धक्का बसल्यामुळे झाला होता गंभीर जखमी..
- तातडीने मोहोळ येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असता त्याला करण्यात आलं मृत घोषित..
नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा 43 अंश सेल्सिअस वर गेला असून त्यांचा परिणाम आता पक्षांवर देखील होत आहे.
पाण्याचे स्रोत कमी झाल्याने पाण्या अभावी पक्ष मृत होत आहे यावर उपाय म्हणून नंदुरबार जिल्ह्यातील इंदवे या आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी यूट्यूबवर बघून टाकाऊ प्लास्टिक बाटल्यापासून पक्षासाठी अन्न पाण्यासाठी एक उपकरण तयार केलं आहे.
टाकाऊ प्लास्टिक पासून तयार केलेलं साहित्य विद्यार्थांनी झाडावर चढून पक्षासाठी अन्न पाण्याची सोय केली आहे.
आदिवासी विद्यार्थिनी केलेल्या उपक्रमांमुळे त्याच कौतुक करण्यात येत आहे...
धाराशिव उपप्रादेशिक परिवहन विभागाकडुन वर्षभरात 124 ट्रॅव्हल्सवर कारवाई केली आहे.
लग्नसराई,उन्हाळी सुटी व पर्यटनामुळे ट्रॅव्हल्स तिकिटाची मागणी वाढत आहे.
यामुळे अनेक ट्रॅव्हल्सधारक मनमानी ज्यादा तिकीट दर आकारत असल्याची बाब समोर आल्यानंतर यावर अंकुश ठेवण्यासाठी धाराशिवच्या उपप्रादेशिक परिवहन विभागाने 577 वाहनांची तपासणी करून त्यापैकी 125 ट्रॅव्हल्सवर कारवाई केलीय तर खाजगी ट्रॅव्हल्स धारकांकडून 9 लाख 36 हजार रुपयांचा दंड ही वसुल करण्यात आल्याची माहिती आरटीओ प्रशांत माळी यांनी दिलीय.
- मालक कार्यक्रमानिमित्त परगावी गेले असताना घराची चावी चोरून चावीवाल्याच्या माध्यमातून कपाटाचे लॉक तोडले
- फराना फारुख शेख असे गुन्हा दाखल झालेल्या महिला मोलकरणीचे नाव आहे
- या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय
- चावीवाल्या व्यक्तीला स्वतःचे घर भासवून कपाटाची चावी हरवल्याचे सांगून लॉक तोडून घेतल्याची माहिती तपासातून पुढे आलीय.
युवकांवर टोळक्याच हल्ला
मारहाणीत युवक गंभीर जखमी, कृष्णा धात्रक असे जखमी युवकाचे नाव
घाडगे मळा येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेलेल्या युवकावर टोळक्याचा प्राणघात हल्ला
हल्ल्याचा सर्व प्रकार पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेरेत कैद
गंभीर जखमी असलेल्या युवकावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू, युवकाची प्रकृती चिंताजनक
गेल्या काही दिवसांपासून शांतीनगर ते घाडगे मळा परिसरात टवाळाखुरांचा हैदोस वाढला, पोलिसांची मात्र बघ्याची भूमिका
टवाळखोरांचा हैदोस वाढल्याने परिसरात भीतीचे वातावरण, टवाळखोरांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी.
म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लातूरच्या औसा मतदार संघात वेगवेगळ्या विकास कामाचं लोकार्पण करण्यात आल आहे..
औसा शहरात नव्याने उभारण्यात येणाऱ्या 100 खाटाचे उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले आहे..
आमदार अभिमन्यू पवार यांनी सातत्याने पाठपुरावा करून, जवळपास 100 कोटी रुपयांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर केले आहे..
त्यामुळे औसा तालुक्याच्या विकासात आणखीन मोठी भर पडली आहे, सुसज्ज असं 100 खाटाच उपजिल्हा रुग्णालय अत्याधुनिक सोयीसुविधांनी लवकरच तयार होणार असल्याचे देखील पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले आहे .....
धाराशिव जिल्ह्यातील 226 प्रकल्पांपैकी दहा प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत तर 61 प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेल्याने हे प्रकल्प देखील कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत.आता 216 प्रकल्पात केवळ 21 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहीला आहे.जिल्ह्यात उन्हाचा पारा 42.4 अंश सेल्सिअसवर गेला आहे.त्यामुळे बाप्पीभवन होऊन प्रकल्पांतील पाणीसाठा वेगाने घटु लागला आहे.
दत्ता गाडे याने गेल्या वर्षभरात तब्बल २२ हजार वेळा अश्लील व्हिडिओ पाहिल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.
त्याच्या गुगल सर्च हिस्ट्रीची सायबर तज्ज्ञांमार्फत तपासणी करण्यात आली.
दत्तात्रय रगाडे याने तरुणीवर दोन वेळा बलात्कार केल्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली.
या प्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, ८९३ पानांचे आरोपपत्र पुणे न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.
त्यानंतर आरोपीने जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे.
या अर्जाला पोलिसांनी विरोध केला असून, त्याची कारणमीमांसा करणारा अर्ज शुक्रवारी न्यायालयात सादर केला.
दोंडाईचा रस्त्यावरील कल्याणी डेअरीजवळ अपघात....
अपघातात एक ठार एक गंभीर जखमी.....
ट्रॅक्टर मध्ये बांधकामासाठी लागणारी लोखंडी सळई ...
मोटरसायकल स्वाराने मागून दिली धडक...
मयत गणेश तुकाराम पावरा शहादा तालुक्यातील रहिवाशी...
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातीय जनगणना करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाचे भाजपा शहादा शहराच्या वतीने स्वागत करण्यात आले
यावेळी शहादा शहर भाजपाच्या वतीने शहादा शहरात जल्लोष करण्यात आला
फटाके फोडून पेढे वाटत जोरदार घोषणाबाजी करत नरेंद्र मोदींच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले
अनेक दिवसापासून जातीय जनगणनेची मागणी होती हा महत्वकांक्षी निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतल्याने देशात आनंदाचे वातावरण असून या निर्णयामुळे देशाच्या विकासासाठी फायदा होणार असल्याचे भाजपाच्या वतीने सांगण्यात येत आहे..
धाराशिवच्या वाशी तालुक्यामधील बावी गावात पाणीपुरवठा,स्वच्छता,शालेय साहित्य व इतर विविध विकास कामांमध्ये जवळ जवळ एक कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी अमरण उपोषण आंदोलन सुरु केले आहे.
आज आमरण उपोषणाचा चौथा दिवस असुन प्रशासनाकडुन आंदोलनाकडे दुर्लक्ष केला जात असल्याचा आरोप ग्रामस्तांनी केलाय.
बावी ग्रामपंचायत मध्ये विविध विकास कामांमध्ये एक कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची लेखी तक्रार ग्रामस्थांनी प्रशासनाला दिली होती.
गावचे सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमत करून भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप करत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली होती
मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने गेल्या चार दिवसापासून बावी गावचे ग्रामस्थ गावातील ग्रामपंचायत समोर आमरण उपोषणाला बसले आहेत.
मध्य रेल्वे आणि मोटरमन संघटना यांच्यातील वाद चिघळला
मध्य रेल्वे प्रशासनाकडून सीसीटीव्ही बसवण्याचं काम सुरु
१ हजार ८१० लोकलचं वेळापत्रक विस्कळीत होण्याची शक्यता
लातूरच्या औसा मतदार संघात बांधण्यात आलेले शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय कार्यालय, तसेच नगरपालिकेच्या वतीने बांधण्यात आलेली 9 सार्वजनिक स्वच्छतागृहे, सुसज्ज औसा बसस्थानक , व औसा ग्रामीण रुग्णालय या विकास कामाचं लोकार्पण पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वास असणारे आ.अभिमन्यू पवार यांनी औसा विधानसभा मतदारसंघात विकासाची गंगा आणली आहे,
त्यामुळे विकास कामांच्या प्रगतीसाठी आमदार अभिमन्यू पवार यांच्या पाठीमागे कायम भक्कम उभे राहण्याचे देखील यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी औसा वाशी यांना केले आहे...
जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
त्यामुळे अभियांत्रिकी, वैद्याकीय व अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेशित विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.
प्रवेश प्रक्रियेच्या काळातच विद्यार्थिहिताचा विचार करून राज्य शासनाने जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ दिली होती.
त्यानंतर काही विद्यार्थी हे प्रमाणपत्र सादर करू शकले नाहीत. त्यासाठी पुन्हा मुदतवाढ मिळावी,
अशी मागणी पालक-विद्यार्थिवर्गातून होत होती.
त्यामुळे जानेवारीमध्येही तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही काही विद्यार्थी जातवैधता प्रमाणपत्र सादर करू शकलेले नाहीत.
वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत हळद पिकाने विक्रमी आवक चा आकडा पार केला आहे. वाशिम बाजार समितीत पहिल्यांदाच ऐतिहासिक 14 हजार 300 क्विंटलची विक्रमी आवक झाली. त्यामुळे वाशिम बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची गर्दी बघायला मिळाली.
वाशिम बाजार समितीत दर शुक्रवारी हळद पिकाची खरेदी केली जाते,सध्या हळद पिकाला चांगला दर मिळत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाशिम बाजार समितीत हळद पिकाची आवक वाढत आहे. दरम्यान शुक्रवारी झालेली विक्रमी आवक पहिल्यांदाच बघायला मिळाली.
या आधी 12 एप्रिलला हळदीची 13 हजार क्विंटल ची आवक झाली होती. त्यानंतर आज हळदीने विक्रमी आकडा पार केला आहे.
यावेळी कान्डी हळदीला- १२०७० ते १३५९० रुपयांचा दर मिळाला, गट्टू हळदला ११०५० ते १२७५० रुपयांचा दर मिळाला.
एकीकडे सोयाबीनला मिळत असलेल्या भावामुळे शेतकरी चिंतातूर असताना वाशिम बाजार समितीत हळद पिकाला मिळत असलेल्या भावामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाच वातावरण दिसून येत आहे.
हळदीच्या विक्रमी आवकमुळे हळदीच्या मोजणीला उशीर झाल्याने शनिवारी बाजार समिती बंद ठेवण्याची वेळ आली.
आगीत रेकॉर्ड रूम मधील महत्त्वाचे दस्तावेज जळून खाक.
सकाळच्या सुमाराला लागलेल्या आगीत कारण मात्र अस्पष्ट.
अग्निशमन दल व मेहकर नगर परिषदेचे कर्मचारी आग विझविण्याचे प्रयत्न करत आहेत.
आगीचे कारण संशयाच्या भोवऱ्यात...?
जालना जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई जाणवत असून टँकरच्या संख्येने आता सेंच्युरी पार केली आहे.
जिल्ह्यातील 60 गावांसह 16 वाड्यांची तहान 101 टँकरने भागवली जात आहे.तर प्रशासनाकडून 130 विहिरींचे अधिग्रहण देखील करण्यात आले आहे.
बदनापूर तालुक्यात सर्वाधिक पाणीटंचाई जाणवत असून 23 गावातील 82 हजार नागरिकांना 39 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
दरम्यान उन्हाच्या तीव्रतेमुळे पाणीपातळी झपाट्याने घट होत असल्याने जिल्ह्यातील अनेक गावांना टँकरद्वारे प्रशासनाला पाणीपुरवठा करावा लागणार आहे...
राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमात आदिती तटकरेंच्या महिला बालविकास खात्याने उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला.
त्यांचे होम ग्राउंड असलेल्या रायगड जिल्ह्यातील रोहा आणि महाड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकत्यांनी जल्लोष केला.
कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आणि पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.
सांगली शहरामध्ये भर दिवसा धूम स्टाईलने पतसंस्थेच्या समोरून सोन्याचे दागिने लंपास करण्यात आल्याची घटना घडली होती.
या चोरी प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी अवघ्या चार तासात आरोपींना जेरबंद करत त्यांच्याकडून 13 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत,
धक्कादायक बाब म्हणजे वृद्ध ध्यानचंद सकळे यांचा वाहन चालकचं चोरीतला मुख्य सूत्रधार असल्याचा उघडकीस आले आहे.
त्याच्यासह दोघांना पोलिसांनी अटक सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.पतसंस्थेच्या लॉकरमध्ये सोन्याचे दागिने ठेवण्यासाठी जात असताना पतसंस्थेच्या दारातूनच वृद्ध ध्यानचंद सकळे यांच्या हातातील सोन्याच्या दागिन्यांची बॅग धूम स्टाईलने लंपास करण्यात आल्याचा प्रकार घडला होता,
या घटनेमुळे सांगली शहरात एकच खळबळ उडाली होते.
आळंदी ते पंढरपूर पालखी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले असले तरी वाखरी ते पंढरपूर दरम्यान पालखी मार्गाचे काम मात्र रखडले आहे.
त्यामुळे यंदाही वारकर्यांची वाट बिकट होणार असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
यंदाचा पालखी सोहळा एक महिन्यांवर येऊन ठेपला आहे. तरीही पालखी मार्गाचे काम रडतखडत सुरू आहे.
वाखरी ते पंढरपूर दरम्यान तर रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे.
वाखरी येथे सर्व संतांच्या पालख्या एकत्रित येतात. येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. गर्दी कमी करण्यासाठी वाखरी ते पंढरपूर चार पदरी रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे.
शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्याचे काम ही हाती घेतले आहे. मात्र रस्ता रूंदीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे.
आषाढी पालखी सोहळ्यापूर्वी या मार्गाचे काम पूर्ण करावे अशी मागणी मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी रत्नागिरी जिल्हापरिषद समोर आंदोलन केले.
वेतनश्रेणी, निवृत्त वेतन तसेच ग्रामपंचायत स्तरावरील प्रलंबित मागण्या संदर्भात हे आंदोलन होते.
शासनाने मागण्यांचा तातडीने दखल घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला.
रत्नागिरी जिल्ह्यातील ग्राम पंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या गेटवर यासंदर्भात धरणे आंदोलन करण्यात आले प्रशासनाला मागण्यांसंदर्भात निवेदनही देण्यात आले.
जिल्ह्यातील ग्रामपचांयतीमध्ये सफाई कामगार, पाणी पुरवठा कामगार, वीज पुरवठा कामगार, कर वसुली कर्मचारी, लिपिक इ. पदावर कामगार सेवेत आहेत.
सर्व ग्रामपंचायत कर्मचारी अत्यल्प वेतनात काम करत आहेत. कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित आहेत.
नाशिकच्या सुरगाणा तालूक्यातील बा-हे या आदिवासी भागात गेलेल्या शेकडे वर्षा पासून तेथिल आदिवासी आजही परंपरागत भोवाडा उत्सवाची परंपरा जपताय.
निर्सगपूजक असलेल्या आदिवासी बांधवां मध्ये भोवाडा उत्सवाला अधिक महत्व इतर सणांप्रमाणे दिले जाते.
विविध देवदेवतांचे रुप धारण करत त्यांना नाचवत गावातून त्यांची मिरवणूक काढण्यात येऊन हा उत्सव साजरा करीत असतात.
पारंपारिक भोवड्याची कला आधूनिक युगात लूप्त होऊ नये ती नामशेष होऊ नये म्हणून वयोवृध्दांच्या मार्गदर्शनाखाली ही परंपरा जपण्याचा प्रयत्न आजही येथे पहावयास मिळते.
केंद्रीय आयुष्य मंत्रालयाच्या वतीने देशभरातील आरोग्य मंत्र्यांसाठी दोन दिवशी कार्यशाळेचे आयोजन लोणावळ्यातील कैवल्यधाम येथे करण्यात आले होते.
या कार्यशाळेला देशभरातील केरळ, राजस्थान, उत्तर प्रदेश, झारखंड, यासह देशातील नऊ राज्यातील आरोग्य मंत्र्यांसह आरोग्य अधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती.
आपल्या शरीरातील योग साधनेने कशा पद्धतीने विविध रोगावर नियंत्रण ठेवू शकतो याविषयी इथे चर्चा करण्यात आली आहे.
रोजच्या जीवनात योग किती महत्त्वाचा आहे. गेल्या तीन वर्षात या योगसाधने मुळे बऱ्याचशा रुग्णांना प्रचिती मिळालेली आहे...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.