शिंदेंच्या शिवसेनेचा युवा विजय महाराष्ट्र दौरा आज नवी मुंबईत सुरु आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्शवभूमीवर वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात युवा सेनेचा मेळावा
युवा नेते, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के करणार नवी मुंबईतील युवा सेनेच्या पदाधिकारी,कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
थोड्याचवेळात होणार युवासेना मेळाव्याला सुरुवात
नवी मुंबईतील स्थानिक नेत्यांसह मोठ्या संख्येने युवा पदाधिकारी, कार्यकर्ते मेळाव्याला उपस्थित
- नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाला सुरुवात
- वादळ वाऱ्यासह आणि विजांचा कडकडात जोरदार पावसाला सुरुवात
- नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेती
पिकांसोबतच घरांचे पडझड देखील मोठ्या प्रमाणावर होत आहे
- उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा
- अवकाळी पावसामुळे नवीन पिकांचे देखील लागवड होत नाही आहे
नांदेडच्या बिलोली तालुक्यातील रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोहगाव वाडी व परिसरातून गेल्या काही दिवसापासून स्टार्टर वायर व इतर शेती अवजारे चोरीचे प्रमाण वाढले होते. त्यातच लोहगाव वाडी येथे रात्री दोन चोरटे कृषी पंप चोरतांना गावकऱ्यांच्या लक्षात आल्याने गावकऱ्यांनी दोघांनाही पकडले. दोन्ही चोरट्यांच्या हाताला एकत्र दोरी बांधून पोलिसांच्या हवाली केले आहे. पोलिसांनी चोरट्यांकडून दोन कृषी पंप व एक ऑटोरिक्षा जप्त केला आहे. या आरोपीकडून इतर काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
कल्याण बिर्ला कॉलेज रोडवर भीषण अपघात
मद्यधुंद कारचालकाचा कारवरील ताबा सुटल्याने भरधाव कारची दोन कार सह चार ते पाच दुचाकीला धडक, एक जण जखमी
कारचालकाला नागरिकांनी पकडून चोप देत दिलं पोलिसांच्या ताब्यात
छत्रपती संभाजीनगरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर मध्ये हल्लाबोल महामोर्चाच आयोजन करण्यात आल आहे. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर मध्ये हल्लाबोल मोर्चाला सुरुवात झाली आहे. या मोर्चामध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहे.क्रांती चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली असून गुलमंडी येथे या मोर्चाचं सभेत रूपांतर होणार आहे.
महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांचा 18 मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होत आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न होणार असून याची जय्यत तयारी महाडच्या चांदे क्रिडांगण येथे सुरु आहे. माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी कार्यक्रम स्थळाला भेट देत पहाणी केली.
9 जुन रोजी किल्ले रायगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या नियोजनाच्या अनुशंघाने मंत्री भरत गोगावले यांनी आढावा बैठक घेत शासन आणि आयोजकांकडून उत्सवाच्या आयोजनाबाबत माहिती घेतली. येणारे मान्यवर आणि शिवभक्त यांची गैरसोय होणार नाही याबाबत शासकिय अधिकारी आणि आयोजकांना सुचना केल्या. शिवराज्याभिषेक सोहळ्याता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण दिल असून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निमंत्रण देणार असल्याचे गोगावले यांनी सांगितले आहे.
अंबरनाथमध्ये आज दुपारी पावसानं जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची आणि दुकानदारांची तारांबळ उडाली. मात्र या पावसामुळे वातावरणात आल्हादायक गारवा निर्माण झालाय.
गेल्या आठवड्याभरापासून अंबरनाथ तालुक्यात पावसाच्या सरी बरसतायत. आज दुपारी अचानकपणे आकाशात ढग दाटून आले आणि जोरदार पाऊस बरसला. जवळपास तासभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. कल्याण-बदलापूर रस्ता, कोहोजगाव, खुंटवली, मोरिवली, हुतात्मा चौक, लोकनगरी रोड अशा सर्वच ठिकाणी पावसाचा जोरदार शिडकावा झाला. सुदैवानं या पावसामुळे कुठेही पाणी तुंबलं नाही. मात्र अचानक पावसानं हजेरी लावल्यामुळे नागरिक आणि दुकानदारांची चांगलीच तारांबळ उडाली. महत्त्वाचं म्हणजे या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्यानं हैराण झालेल्या अंबरनाथकरांना मोठा दिलासा मिळालाय.
- नाशिकच्या पंचवटी कारंजावरून भाजपची तिरंगा रॅली
- मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपची तिरंगा रॅली
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून तिरंगा रॅलीला सुरुवात
- माजी सैनिक, शहरातील लोकप्रतिनिधी, यांसह मोठ्या संख्येने नागरिक रॅलीत सहभागी
- ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय लष्कराने यशस्वी कामगिरी केल्यानं तिरंगा रॅलीचे आयोजन
- भारतीय लष्कराला पाठिंबा देण्यासाठी तिरंगा रॅलीच आयोजन
- शहरातील हुतात्मा स्मारकावर होणार रॅलीचा समारोप
वानखेडे स्टेडियम येथे शरद पवार यांचे स्टँड उभारण्यात आले आहे. आज या स्टँडचे उद्घाटन पार पडले. यावेळी क्रिकेटपटू रोहित शर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
छत्रपती संभाजीनगरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर मध्ये हल्लाबोल महामोर्चाच आयोजन करण्यात आलेले आहे. आमदार आदित्य ठाकरे या मोर्चासाठी छत्रपती संभाजीनगर मध्ये दाखल झालेले आहे.
मेधा कुलकर्णी यांनी या प्रकरणात पडू नये नाहीतर त्यांची व्यवस्था करू मागे त्यांचा तिकीट कापलं होतं हे त्यांना माहिती आहे... अशा पद्धतीची धमकी यशवंत सहकारी बँकेच्या काही पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आल्याची माहिती आज मेधा कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.
बारामती वाहतूक पोलिसांनी मोटार वाहन कायद्याच्या कलम 198 चे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. विशेषतः, बुलेट मोटारसायकलींवरील सायलेन्सरमध्ये बेकायदेशीर बदल करणाऱ्यांवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. हे बदल फक्त कायद्याच्या विरोधात नाहीत, तर दिवसभर शहरातील अनेक भागांमध्ये ध्वनी प्रदूषणातही लक्षणीय वाढ करत आहेत.
विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह सुरूय मुसळधार पाऊस
हवामान विभागाने सोलापूर जिल्ह्याला जारी केला आहे ऑरेंज अलर्ट
मान्सूनपूर्व कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मिळाला दिलासा
मात्र या मान्सूनपूर्व पावसामुळे बागायतदार शेतकऱ्यांच्या चिंतेत पडली भर
मान्सून पूर्व पावसाने आज सलग दुसऱ्या दिवशी पंढरपूर शहर व परिसराला जोरदार झोडपून काढले.
दोन दिवसांपासून परिसरामध्ये पाऊस सुरू आहे. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण तयार झाले होते .दरम्यान आज दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले आहे.
कोकणात जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा तर मुंबईच्या दिशेने संथ गतीने वाहतुक
उन्हाळी सुट्टीमुळे पर्यटनासाठी कोकणात जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांची महामार्गावर संख्या वाढली
नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी आता युवा सेना मैदाना उतरले दिसून येत आहे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेत जाहीर मेळावा पार पडत आहे या मेळाव्यासाठी शिवसेनेने जोरदार शक्ती प्रदर्शन केलेला आहे
बनेश्वर महादेव मंदिरात ‘शर्ट काढून दर्शन’ घेण्याची प्रथा ग्रामस्थांच्या मागणीवरून रद्द
भोर तालुक्यातील नसरापूर येथील प्रसिद्ध श्रीक्षेत्र बनेश्वर महादेव मंदिरात पुरुषांनी शर्ट काढूनच दर्शन घ्यावे, असा नियम काही महिन्यांपूर्वी मंदिर ट्रस्टमार्फत लागू करण्यात आला होता..
मात्र या प्रथेचा ग्रामस्थांनी तीव्र विरोध करत ग्रामसभेमार्फत ती रद्द करण्यात यावी,अशी मागणी केली.
त्यानंतर झालेल्या ग्रामसभेत सर्वानुमते ठराव संमत करण्यात आला असून, सदर प्रथा तात्काळ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
फलटण तालुक्यातील तरडगाव येथील विराज गायकवाड यांच्या शेतामध्ये नारळाच्या झाडावर वीज कोसळल्याने नारळाच्या झाडाने घेतला पेट...
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी नाही...
तरडगाव भागामध्ये दुपारच्या सुमारास अचानक वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह आला मुसळधार पाऊस...
राहाता, राहुरी, श्रीरामपूर तालुक्यांसह सर्वदूर पावसाची हजेरी...
दुपारच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस...
अर्धा तास सुरू असलेल्या पावसाने रस्ते झाले जलमय...
अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत...
फळ पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता..
- दोन वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग डोक्यात धरून करण्यात आली मारहाण
- बार्शी तालुक्यातील उक्कडगावात तरुणाला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी
- किरण बाबासाहेब खुरंगळे असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव
- सादर प्रकरणी पांगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होत असलेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे, आणि त्याचा परिणाम आता नागरिकांच्या शरीरावर देखील होताना दिसून येत आहे, शासकीय रुग्णालयामध्ये त्याचबरोबर खाजगी रुग्णालयांमध्ये सर्दी, ताप, खोकला यांसारख्या आजारांमुळे मोठ्या प्रमाणात नागरिक ग्रस्त असल्याचे दिसून येत आहे,
जमिनीच्या वादात आर्थिक फायद्यासाठी पदाचा गैरवापर
चंदननगर पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्यावर गुन्हा दाखल
लांडगे यांच्यासह चार जणांच्या विरुद्ध चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुण्यातील वाघोली येथील 10 एकर जमिन हडपण्याचे उद्देशाने संगनमत करून फौजदारीपात्र रचून स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता बनावट महिला उभी करून ती मूळ जमिनीची मालक असल्याच्या भासविण्यात आल्याचा त्यांच्यावर आरोप
पुण्यातील एका बड्या बांधकाम व्यवसायाशी देखील हे प्रकरण संबंधित असल्याचे बोलले जाते आहे.
चौदा जिल्ह्यात मान्सून-पूर्व पावसाचा जोर अधिक '
१-आजपासुन पुढील १५ दिवस म्हणजे ३१ मे पर्यन्त म्हणजेच मान्सून केरळात दाखल होईपर्यंत, मुंबई सह कोकण व संपूर्ण महाराष्ट्रात भाग बदलत दिवसागणिक, मान्सूनपूर्व (मान्सून चा नव्हे) वीजा, वारा वावधनासहितचा केवळ मान्सूपूर्व वळवाचा गडगडाटी पावसाची शक्यता जाणवते.
ड्रोन किंवा इतर मानवरहित यंत्र चालवण्यास, उडविण्यास किंवा वापरण्यास मनाई
15 मे ते 3 जुनपर्यंत विना परवाना बेकायदेशीररित्या ड्रोन प्रक्षेपण, छायाचित्रण तसेच कोणत्याही प्रकारच्या ड्रोनचा वापर करण्यास मनाई
सोलापूर शहरात भविष्यातील ड्रोन द्वारे होणारे संभाव्य हल्ले रोखण्यासाठी तसेच ड्रोनचा अनियंत्रित वापर टाळण्यासाठी घेतला निर्णय
पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी काढले मनाई आदेश
ऑपरेशन सिंदूर अद्याप थांबवलेलं नाही. जे काही झालं तो फक्त ट्रेलर होता. योग्य वेळ येईल तेव्हा अख्ख्या जगाला संपूर्ण पिक्चर दाखवला जाईल, अशा शब्दांत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तान आणि त्या देशाला समर्थन करणाऱ्या इतर देशांना कडक इशारा दिला आहे. गुजरातच्या भूजमध्ये ते बोलत होते.
पाहा व्हिडिओ...
यवतमाळच्या दिग्रस शहरात वातावरणात अचानक बदल होऊन विजांच्या कडकडाटासह सकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली, अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली तर पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना उकाडा पासून दिलासा मिळाला आहे.
वडजी गावात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरात शिरले पाणी
पाणी घरात शिरल्याने अनेक नागरिकांच्या गृहउपयोगी साहित्याचे झाले नुकसान
मुसळधार पावसामुळे संपूर्ण वडजी गावाला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाल्याचं चित्र दिसून आलं.
वडजी ग्रामपंचायतीच्या गलथान कारभारामुळे घरात पाणी शिरले असल्याचा आरोप ग्रामस्थ्यांनी केलाय.
संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील इंदापूर ते अकलूज दरम्यानच्या टोल नाक्यावर वारकऱ्यांच्या वाहनांना कायम स्वरुपी टोल मुक्ती द्यावी, या मागणीसाठी उध्दव ठाकरे यांच्या युवा सेनेच्या वतीने भीक मागो आंदोलन करण्यात आले.
युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष गणेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली सराटी येथील टोल नाक्यावर आज टोल मुक्तीसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी टोल मुक्तीच्या घोषणा दिल्या.
भारतीय सैनिकांच्या समानार्थ राष्ट्रप्रेमी सोलापूरकरांच्या वतीने तिरंगा सन्मान पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. मार्कंडेय उद्यान येथील वीर सावरकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ही पदयात्रा सुरू झाली.पालकमंत्री जयकुमार गोरे , आमदार देवेंद्र कोठे , आमदार सचिन कल्याणशेट्टी , माजी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी हे या पदयात्रेत सहभागी झाले होते. मात्र भाजपचे आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांनी या पदयात्राकडे पाठ फिरवल्याचे बघायला मिळाले.
मार्कंडेय उद्यान येथून निघालेली ही पदयात्रा अशोक चौक , सत्तर फूट भाजी मंडई मार्गे माधव नगर येथील पटांगणात समारोप झाला. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैनिकांनी अतुलनीय असे शौर्य दाखवले आहे. विजय शौर्याला सलाम करण्यासाठी ही तिरंगा सन्मान पदयात्रा काढण्यात आल्याची माहिती पालकमंत्री गोरे यांनी दिली.
टायर फुटल्याने वाहनाला अपघात..
* या अपघातात दोन प्रवासी गंभीर जखमी तर इतर प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती...
* जखमींना दर्यापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलेय...
* टायर फुटल्याने वाहनाचे मोठे नुकसान...
* घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमल्याने वाहतूक विस्कळीत...
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले येत्या सोमवारी करणार आहेत
पुढील महिन्यात दोन्ही पालख्या पंढरपूर च्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत
दरम्यान दोन्ही पालख्या पुणे शहरात मुक्कामी असणार आहे
त्यामुळे शहरातील सोयी सुविधा यासह पालखी मार्ग याची पाहणी पालिका आयुक्त यांच्यासह इतर अधिकारी सुद्धा उपस्थित असणार आहेत
कर्जत शहरातील प्राचीन हनुमान मंदिरा भोवतीचे अतिक्रमण काढावे यासाठी आज कर्जत बंद आणि रस्ता रोको आंदोलन...
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन सुरू ..
जव्हार तालुका म्हणजे कुपोषणाचा तालुका असी ओळख मात्र ही ओळख पुसत पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम भागातील कोगदे गावातील सुपुत्र डॉ. अजय काशीनाथ डोके यांने UPSC परिक्षेत 364 यशस्वी रित्या उत्तीर्ण करून IAS म्हणून नवीन ओळख निर्माण केली आहे. तसेच कोकण विभागातून आदिवासी समाजाचे पहिले IAS अधिकारी झाले आहेत. यांचा सन्मान करण्यासाठी जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम भागातील कोगदे गावातील ग्रामस्थांनी डॉ. अजय काशीनाथ डोके यांच्या सह त्यांच्या आईवडिलांची वाजत गाजत मिरवणूक काढली. गावात रांगोळी काढत आदिवासी पारंपरिक नुसार सांबळी वाजवत मिरवणूक काढण्यात आली.
डॉ अजय डोके सर हे... कोणत्या प्रकारचा क्लास न लावता तीन वेळा upsc पास आहेत पण IAS आता मिळाले. यामुळे आदिवासी कोगदा गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
जळगाव च्या कजगाव जवळील रिलायन्स टॉवर परिसरात रात्री एक भीषण अपघात घडला असून ओमनी कार व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक होऊन चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
ही घटना कजगाव येथील अविनाश हॉटेलच्या पुढे घडली..पाचोऱ्याकडे जाणारी ओमनी कार आणि कजगावकडे येणारी दुचाकी यांच्यात जोरदार धडक झाली.
या अपघातात दुचाकीस्वार दोघे व ओमनी कारमधील दोघे असे एकूण चार जण गंभीर जखमी झाले.
अपघात इतका जोरदार होता की वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, एक जखमी व्यक्तीची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे सांगितले जात आहे.
अपघाताची माहिती मिळताच भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेतले.
जखमींना तात्काळ उपचारासाठी चाळीसगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघातातील दुचाकीस्वार हे मजूर असून, ओमनी कार चालक पाचोरा शहरातील असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
उद्यमनगर मधील एक किराणा दुकानातून विकत घेण्यात आली होती ही पिठाची पिशवी
संबंधीत किराणा मालकाला हि बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर बदलून दिली गेली पिशवी
आनंद पेडणेकर यांनी ही विकत घेतली होती पिठाची पिशवी
श्री महलक्ष्मी फुड प्राँटक्ट्स कंपनीची ही पिठाचे पिशवी
आनंद पेडणेकर यांनी संबंधीत विभागाकडे केली आहे तक्रार दाखल
सोमनाथ प्रकाश कोरे असं 24 वर्षीय मृत तरुणाचं नाव
रात्री आई-वडिलांसोबत जेवण करून प्रकाश झोपला मध्यरात्री हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
झोपेत असताना प्रकाश ओरडला, आई-वडिलांनी धाव घेतली मात्र तो उठलाच नाही
तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यावर डॉक्टरांनी मृत घोषित केले
एकुलत्या एक मुलाच्या दुर्दैवी मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर
वाशिम जिल्ह्यात काल झालेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे शेतातील भुईमूग पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल आहे. सध्या हळद आणि भुईमूग काढणीचा हंगाम सुरू आहे, मोठ्या प्रमाणात शेतकरी शेतात राबत असताना काल आलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकावर झाकण्यासाठी वेळ सुद्धा मिळाला नाही. त्यामुळे हाता तोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा निसर्गाने हिरावून घेतला आहे. वाशिम तालुक्यातील सुदी शेतशिवारातील हि विदारक दृश्य..
बदलापुरातील मांजर्ली भागात असलेल्या शिव पार्वती कृपा सोसायटीच्या रहिवाशांना दररोज गुडघाभर साचलेल्या सांडपाण्यातून वाट काढावी लागतेय. या सोसायटीच्या आवारातील सांडपाणी आणि पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी असलेला नैसर्गिक नाला खाजगी जमीन मालकाने बंद केल्यानं सोसायटीच्या आवारात घाणीचं साम्राज्य आणि दुर्गधी पसरलीय.
त्यामुळे डासांची संख्या वाढल्याने रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली असून इमारतीतील अनेक रहिवासी आजारी पडत आहेत.
भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. निवडणुकीच्या पूर्वी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रारूप मतदार यादी प्रकाशित केली असून त्यात भंडाऱ्याचे शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांचं नाव वगळण्यात आलं आहे.
त्याचा सह अजून 5 सदस्याची वगळण्यात आल्याने आमदार भोंडेकर यांनी आज दुपारी 1 वाजे पर्यंत वेळ देण्यात आली आहे.
भोंडेकर यांच्यासह बलुतेदार मतदार संघातील अन्य पाच सदस्यांची नावं यातून वगळण्यात आल्यानं भोंडेकर यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत प्रशासकीय अधिकाऱ्याला धारेवर धरत ठिय्या आंदोलन केलं.
कर्ज घेतलेल्या बलुतेदार संस्थांना शासनानं २०१९ मध्येचं कर्ज परतफेड केल्याचं ना हरकत प्रमाणपत्र दिलं.
मात्र, बँक प्रशासनानं जिल्ह्यातील पाच बलुतेदार संस्थांवर १ कोटी ३१ लाखांचं कर्ज असल्याचं पुढे करून त्यांचं नावं मतदार यादीतून वगळण्यात आलेल्याचा आरोप आमदार नरेंद्र भोंडेकरांनी करून जोपर्यंत निवडणूक मतदार यादीत नाव समाविष्ट होणार नाही तोपर्यंत बँकेत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय आमदार भोंडेकर यांनी घेतला होता.
मात्र, बँक प्रशासनानं आज दुपारी 1 पर्यंत यावर योग्य निर्णय घेण्याचं आश्वासन दिल्यानं आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी त्यांचं ठिय्या आंदोलन तूर्तास थांबविला आहे. योग्य निर्णय नं झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भोंडेकर यांनी दिलाय.
यवतमाळ जिल्ह्यात रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे उन्हाळी भुईमूग पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
दारव्हा तालुक्यात बोथ, बिजोरा, दत्तापूर, मांगकिन्ही,हातणी या गावातील शेतकऱ्यांनी
उन्हाळी भुईमुगाची लागवड केली होती. मात्र जिल्ह्यात काल पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतामध्ये काढून ठेवलेला या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
संजय राऊत यांना मीडियात बोंलण्याचं पगार मिळत असतो.. त्यामुळे ते असे वक्तव्य करत असतातआशिष देशमुख
आज जळगाव शहरातील तिरंगा रॅलीला सुरवात करण्यात आली यावेळेस राज्याचे मंत्री गिरीश महाजन व खासदार स्मिता वाघ व आमदार सह नागरिक या तिरंगा रॅलीत सहभागी शहरातून प्रमुख मार्गाने राहिलेला सुरुवात
अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र महागणपती मंदिर, रांजणगाव येथे संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागात सामूहिक श्री गणपती अथर्वशीर्ष पठणाचा भव्य कार्यक्रम संपन्न झाला.
पुणे, नगर, नाशिकसह विविध भागांतील भाविकांनी या धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतला.
सामूहिक पठणाचा प्रारंभ मंगलमय वातावरणात करण्यात आलामहागणपती भक्तांनी पहाटेपासूनच मंदिरात गर्दी केली होती.
या निमित्ताने मंदिरातील गाभाऱ्यात महागणपतींच्या मूर्तीची विविध फुलमाळांनी अत्यंत सुंदर अशी सजावट करण्यात आली होती.
फुलांच्या सुगंधित साजशृंगारामुळे महागणपतींचं रुप अक्षरशः फुलून निघालं होतं. भाविकांनी मंत्रमुग्ध होऊन दर्शनाचा लाभ घेतला.
रायगड जिल्ह्याच्या सर्वच भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.
पुढे अजून दोन दिवस कोकण किनारपट्टीवरील अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
सध्या कोकणात शेवटच्या टप्प्यातील आंब्याचा हंगाम सुरू झाला असून या अवकाळी पावसाचा फटका शेवटच्या टप्प्यातील आंबा उत्पादनाला बसतो आहे.
पावसामुळे फळगळती बरोबरच आता आंबा खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
फळावर देठकुजवा किंवा फळामध्ये साकेची भीती असून यामुळे आंब्याचा दर उतरून शेतकऱ्याच्या नफ्यावर परिणाम होणार आहे.
खराब होण्या पूर्वी आंबा काढणे गरजेचं असल्यामुळे तयार झालेला आंबा लवकरात लवकर काढण्याची शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.
वाशी तालुक्यातील पिंपळगाव लिंगी येथे विनापरवाना व अवैध,अनाधिकृत पणे साठवुन ठेवलेला ४५७ बॅग २० मेट्रिक टन खतसाठा जप्त
कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय व तालुका स्तरीय भरारी पथकाची संयुक्त कारवाई
एका शेतकऱ्याच्या कुक्कुटपालन शेडमध्ये आढळला खताचा साठा, एकुण ४ लाख ६१ हजार रुपये किंमतीचा खतसाठा केला जप्त
दोघांविरुद्ध वाशी पोलिसात गुन्हा दाखल
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने यांची माहीती
अकोला, परतवाडा येथील एकता ज्वेलर्सच्या दुकानावर १४ मे रोजी आयकर विभागाने धाडी टाकल्याचे सराफा बाजार वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली.. गेल्या दोन दिवसांपासून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून संबंधितांचे घरासह ज्वेलर्समध्ये तपासणी सुरू आहे... विशेष म्हणजे गुरुवारला एकता ज्वेलर्समध्ये अधिकाऱ्यांनी संगणक तसेच कागदपत्रांची,वहिखात्याची तपासणी केली.. दरम्यान गुरुवार १५ मे रोजी नागपुर शहरातील काही सराफा ज्वेलर्समध्ये आयकर विभागाने घाड टाकल्याने विदर्भासह अमरावती विभागातील सराफा बाजार हादरला आहे. व्यापाऱ्यांना तर एवढी धडकी बसली आहे की, बहुतांश सराफा व्यापाऱ्यांनी आपले दुकान व मोबाइल बंद केला आहे.. सध्याघडीला विभागातील पाचही जिल्ह्यातील किमान ७० टक्के सराफा बाजाराची उलाढाल बंद आहे.आयकर विभागाने एका ज्वेलर्सच्या अमरावती, परतवाडा, यवतमाळ, अकोला येथील ज्वेलर्सवर एकाचवेळी धाड टाकली. यासह तिन्ही शहरातीलइतर ज्वेलर्सवरदेखील धाडी घालण्यात आल्या. यासह आयकर विभागाने अकोला शहरातील पूनम ज्वेलर्स, अग्रवाल ज्वेलर्स, ईशा ज्वेलर्स यांच्यावर इन्कम टॅक्सची धाड पडली आहे. मुंबई, नागपुर, औरगांबाद आयकर विभागातील १४७ पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या समावेश असलेल्या विविध पथकांची अद्यापही ज्वेलर्समध्ये तपासणी सुरू आहे. सर्व ज्वेलर्समधील रक्कम, डिजिटल डेटा, खरेदी-विक्रीचे बिल, बॅकींगसह इतर सर्व प्रकारच्या व्यवहाराची कागदपत्रे तपासणे सुरू आहे.
जालन्यात पाच लाखांची लाच घेताना महसूल सहाय्यकाला लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने पकडले आहे. राजेंद्र शिंदे अस या लाच घेणाऱ्या महसूल सहाय्यकाचं नाव आहे.तक्रारदाराचा दाव्याचा निकाल बाजूने लावण्यासाठी महसूल सहायकाने पैशाची मागणी केल्याचं समोर आलं आहे. दरम्यान जालन्याच्या तहसीलदार छाया पवार यांच्यासाठी या महसूल सहायकाने तक्रारदाराकडून लाचेची मागणी केल्याचं निष्पन्न झाल आहे . याप्रकरणी या लाचखोर महसूल सहाय्यकाविरोधात जालन्यातील तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
शिवसेना उबाठा गटाचे शाखा अध्यक्ष मा. किशोर दुर्भे यांनीशेकडो कार्यकर्त्यांसोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत भव्य पक्षप्रवेश केला.
सदर कार्यक्रम अमित ठाकरे यांच्या हस्ते त्यांच्या निवास स्थानी "राज महाल" येथे झाला.
या पक्षप्रवेशामुळे मनसेची ताकद घोरपडी गाव, पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघात आणखी वाढली असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
किशोर यांनी मनसेत प्रवेश करताना सांगितले, राजसाहेबांच्या विचारांवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करण्याची माझी इच्छा आहे.
या कार्यक्रमात मनसेचे अनेक ज्येष्ठ इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
भंडाऱ्याचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांना शहरातील वारंवार येत असलेल्या तक्रारीमुळे त्यांनी शहराचा दौरा केला, यावेळी रस्त्यांवरील जागोजागी पडलेले खड्डे, फुटलेल्या नाल्या आणि पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना होणारी पायपीट यावर खासदार अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले. यावेळी नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना निर्देश देत पावसाळ्यापूर्वी सर्व रस्ते आणि नाल्या दुरुस्ती करण्यास सांगितले
नैऋत्य मान्सून जून ते सप्टेंबर या काळात कार्यरत असणार आहे यंदा नेहमीच्या सरासरी पावसाच्या 105% पाऊस पडण्याची शक्यता आहे
या काळात विशिष्ट कालावधीत ठराविक भागात ढगफुटी सदृश्य किंवा अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे
त्यामुळे पुणे विभागातील आपत्ती व्यवस्थापन विभागासमोर मोठे आव्हान असणार आहे.
आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगरात हल्लाबोल महामोर्चा
ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भव्य हल्लाबोल महामोर्चा काढण्यात येणार आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संभाजीनगर शाखेच्या वतीने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले.
आज सायंकाळी ४.३० वाजता क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केल्यानंतर या मोर्चास सुरुवात होणार आहे.
पैठण गेट येथील लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर पुढे गुलमंडीपर्यंत हा हल्लाबोल महामोर्चा जाणार आहे.
गुलमंडी येथील संभाजीनगरचे प्रथम नगराध्यक्ष द्वारकादास पटेल यांच्या पुतळ्यासमोर जाहीर सभा होणार आहे.
सभा संपन्न झाल्यांतर मनपा आयुक्त यांच्याशी शहराच्या पाणी प्रश्नावर चर्चा करणार आहे.
पवनार ते पत्रादेवी महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्गाच्या कामास शासनाद्वारे सुरुवात करण्यात आली असून या महामार्गासाठी यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे. शक्तीपीठ महामार्ग एकूण 802 किलोमीटर लांबीचा आहे.त्यापैकी या महामार्गाची 137 किलोमीटर एवढी लांबी यवतमाळ जिल्ह्यातून जाते त्यातच यवतमाळ तालुक्यातून 27 किलोमीटर व आर्णी तालुक्यातील 34 किलोमीटर एवढी लांबी आहे. यवतमाळ विभागातील आर्णी तालुक्यामध्ये एकूण 16 गावांमधून शक्तिपीठ महामार्ग करिता भूसंपादन करण्यात येणार आहे.
वन मंत्री गणेश नाईक आणि बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्यात सुरू असलेल्या कुरघोडीच्या राजकारणावर आ. मंदा म्हात्रे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. काही दिवसांपूर्वी माजी आमदार संदीप नाईक यांच्यावर टीका केल्यानंतर आज भाजपच्या कार्यक्रमात मंदा म्हात्रे यांनी "माझ्यात आणि गणेश नाईक यांच्यात कोणतंही वैयक्तिक वैर नसून, त्यांच्या कार्यकर्त्यांमुळे हे वैर निर्माण झाल्याचे" मंदा म्हात्रे यांनी स्पष्ट केले आहे. भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम करावे आणि येत्या महापालिका निवडणुकीत भाजपचा झेंडा पालिकेवर फडकवावा असे आवाहन मंदा म्हात्रे यांनी याप्रसंगी केले आहे.
रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शीळ धरणात 10 जून पर्यंत पाणीपुरवठा होईल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी 150 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा जास्त आहे त्यामुळे आठवड्यतून एकदाच पाणी कपात केली जातेय. दररोज शहराला 18 ते 19 दशलक्ष घनमीटर इतका पाणीपुरवठा केला जातो. दररोज रत्नागिरीकरांना दीड तास पाणी मिळतं मात्र मान्सून लांबल्यास 10 मिनिटांची पाणी कपात केली जाणार आहे गेल्या वर्षी एप्रिलपासूनच शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता.
दोन दिवसापासून विदर्भात हवामान अंदाजानुसार अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवीला आहे .. त्यानुसार जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.. बुलढाणा शहरात सुद्धा अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली.. उकाड्याने जिल्हावासी त्र स्त झाले होते आता हवेत गारवा निर्माण झाला असून उकाड्या पासून काहीसा दिलासा मिळाला आहे ... तसे या पावसाने कांदा, मका, उन्हाळी भुईमूंग, मुंग व फलबाग या पिकांचे नुकसान झाले आहे ....
जोरदार वाऱ्यासह कोल्हापूर शहराबरोबरच ग्रामीण भागात अवकाळी पाऊस
सर्वत्र ढगाळ वातावरण आणि ढगांचा गडगडाट सुरू
विजा पडण्याची शक्यता असल्याने घराबाहेर न पडण्याचं जिल्हा प्रशासनाच आवाहन
मेट्रोची प्रवासी संख्या वाढत असताना त्यांच्याकडून प्रवाशांकडून ऑनलाईन तिकीट खरेदीला अधिक प्राधान्य मिळत असल्याचे दिसून येते मागील चार महिन्यात एनसीएमसी कार्डनंतर व्हाट्सअप वरून होत असलेल्या तिकीट विक्रीतून मेट्रोला सर्वाधिक उत्पन्न मिळाले आहे.
जानेवारी ते एप्रिल 2025 मध्ये एनसीएमसी कार्डद्वारे मेट्रोला सर्वाधिक 5 कोटी 66 लाख 58 हजारांचे उत्पन्न मिळाले
व्हाट्सअप वरून एक लाख 23 हजार 533 तिकीट विक्री झाली असून त्यातून मेट्रोला 5 कोटी 38 लाख 38 हजार 714 रुपये उत्पन्न मिळाले.
Maharashtra Today Live Updates: पूरस्थिती टाळण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडून नवीन यंत्रणा
पावसाळ्यात पुण्यात वारंवार पूरस्थिती निर्माण होते. गेल्या वर्षी धरणातून अचानक पाणी सोडल्याने मोठा गोंधळ उडाला होता. यंदा अशी पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पाटबंधारे विभागाने आरटीडीएएस (रियल टाइम डाटा एक्युजेशन सिस्टम) प्रणाली लागू केली आहे.
या प्रणालीमुळे धरणातून पाणी विसर्गाची माहिती पुणे महापालिकेला तीन दिवस आधी मिळणार आहे.
त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभागाला वेळीच उपाययोजना करता येणार आहेत. विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नियंत्रण कक्ष २४ तास सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.