आरोग्य विभाग सर्वच आजाराच्या बाबतीत सतर्क आहे. कोणत्याही आजाराबाबत लक्षणं वाढत असल्यास आरोग्य विभागाचं लक्ष आहे. महिनाभरात देशभरात रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्र्यांनी नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
मुसळधार पावसामुळे छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील घारेगाव पिंपरी शिवारातील शेतकऱ्याची विहीर खचली आहे. विहीर खचतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. अवघ्या काही सेकंदातच ही विहीर जमिनीदोस्त झाली आहे. घारेगाव पिंपरी येथील शेतकरी विकास लहाने यांनी काही दिवसांपूर्वीच विहिरीचे बांधकाम पूर्ण केलं होतं.
पिस्तूल परवाना व सुरक्षा रक्षक मिळावा यासाठी स्वतःच्या गाडीवर गोळीबार घडवून आणणाऱ्या शिवसेनेच्या ( एकनाथ शिंदे गट ) युवासेनेचे जिल्हाप्रमुख नीलेश घारे याच्यासह चौघांना न्यायालयाने शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.या गुन्ह्यात घारे (वय ३८, रा. वारजे) याच्यासह सचिन अनिल गोळे ( वय २७), शुभम संपत खेमनार ( वय २७) आणि अजय ऊर्फ बगली रवींद्र सकपाळ (वय २५, तिघे रा. वारजे माळवाडी) यांना अटक करण्यात आलेली आहे. तर गोळीबार करणारा संकेत प्रभाकर मातले (वय २६, रा. कोल्हेवाडी) हा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.गोळे, खेमनार आणि सपकाळ यांना अटक करण्यात आली होती.
मनी लॉन्ड्रिंगमध्ये सहभाग असल्याने डिजिटल आणि प्रत्यक्ष अटक करून बदनामी करू, अशी भीती घालून सायबर भामट्यांनी सेवानिवृत्त प्राध्यापिका मीना मुरलीधर डोंगरे यांना 3 कोटी 57 लाख 23 हजार रुपयांचा गंडा घातलाय. हा प्रकार 18 एप्रिल ते 27 मे 2025 या दरम्यान घडला आहे. ट्रायचे अधिकारी आणि मुंबई पोलीस असल्याची बतावणी करून त्यांनी हा गंडा घातल्याचं समोर आलय.
डोंगरे यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यातील अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान 40 दिवसात पंधरा वेळा डोंगरे यांनी परराज्यातील विविध 10 बँक खात्यांवर आरटीजीएस आणि एनईएफटीद्वारे रक्कम पाठवली असल्याचं समोर आले.
बीडच्या वडवणी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे मुख्य वाहतुकीचा रस्त्यावरील पूल वाहून गेला. यामुळे अनेक गावांचा जाण्या-येण्याचा संपर्क तुटला आहे. यामध्ये विशेष म्हणजे पिंपळनेर बीडकडे जाणाऱ्या पंधरा गावाचा संपर्क तुटला.
लातूर जिल्ह्यात मागच्या 16 दिवसापासून झालेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातल्या अनेक शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल आहे. रेनापुर तालुक्यातल्या अनेक शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हेरावून घेतला आहे.
चार कोरोना रुग्णावर उपचार सुरु
तीन जणांना डीचार्ज
तर आत्तापर्यत दोन रुग्णांचा मृत्यू
वैष्णवी मृत्यूप्रकरणी सरकारी वकील म्हणून आर आर कावेडिया यांची नियुक्ती
कस्पटे कुटुंबीयांनी राज्य सरकारकडे केली होती मागणी
आंदोलनासाठी २५० फूट वर चिमणीवर चढलेले विकेश उघडे आणि मनोज सूर्यवंशी हे कामगार अखेर ६० तासानंतर उतरले चिमणी वरून खाली
पुढील २ महिन्यांमध्ये कामगारांचे सर्व वेतन आणि मागण्या मान्य करण्याचे फिनले मिल प्रशासनानं लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन मागे
आमदार प्रवीण तायडे आणि फिनाले मिल प्रशासन यांच्यात झाली बैठक
चिमणीवर बसून आंदोलन केलेल्या दोन्ही कामगारांची प्रकृती ठीक नसल्यानं उपचारासाठी रुग्णालयात केलं दाखल
भरपावसात आंदोलकांनी केलं वेतनासाठी आंदोलन, मागील २४ महिन्याचं ५० टक्के वेतन आणि चालू सात महिन्यांचे वेतन मिळावे यासाठी सुरू होते आंदोलन
तेच शहराच्या इतर भगत उन्ह असल्यानं उन्ह पावसाचा खेळ पाहायला मिळाला..
नागपूर शहरात बर्डी परिसरात पावसाचे सरी पडल्याच... आजूबाजूच्या एक किलोमीटरच्या परिसरात मात्र उन्ह पडल्याचं चित्र होतं...
अचानक आलेल्या पावसाने मात्र काहींची तारांबळ उडालीय...
पुणे पोलिसांकडून हगवणे कुटुंबियांना नोटीस
शस्त्र परवाना रद्द का करू नये असे या नोटीस मधून विचारले आहे
हगवणे यांच्या शस्त्र परवाना रद्द करा अशी सूचना पिंपरी चिंचवड पोलिसांनी पत्रातून केली आहे
हगवणे यांच्या शस्त्र परवाना बाबत पिंपरी चिंचवड पोलिसांनी दिला पुणे पोलिसांना अहवाल
नोटीस वर हगवणे कुटुंबीयांनी जर उत्तर दिलं नाही तर हगवणे यांचा शस्त्र परवाना रद्द केला जाणार
पुढील आठवड्यात पुणे पोलिस शस्त्र परवाना रद्द करू शकतात
हगवणे कुटुंबीयांकडे ३ शस्त्र परवाने आहेत
गजा मारणेच्या मटण पार्टी प्रकरणात पोलिसांची कारवाई
विशाल धुमाळ याला केली अटक
विशाल धुमाळ याला न्यायालयीन हजर केल असता त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे
सांगलीतील कणसे ढाब्यावर मारणे टोळीतील इतर सद्यास्याची भेट घालून दिल्याप्रकरणी केली आहे अटक
धुमाळ गेल्या अनेक दिवसापासून देत होता पोलिसांना गुंगारा
आगामी निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत उद्यापासून दोन दिवस जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून विधानसभा निवडणुकीच्या वेळेस संजय राऊत हे 5 आमदारांना पाडायला आली होते मात्र एकही आमदार पाडू शकले नाही त्यामुळे आता संजय राऊत येथील आणि तोंड काळं करून जातील अशी खोचक टीका मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांवर केली आहे.
जालिंदर सुपेकर यांना गृहविभागाचा दणका
नाशिक संभाजीनगर नागपूरचा कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा कार्यभार काढला
सुपेकर यांचे नाव वैष्णवी हगवणे यांच्या प्रकरणात जुळवण्यात आलं होतं
सुपेकर हे सध्या पुणे कारागृहाच्या महानिरीक्षक पदावर कार्यात आहेत
सुपेकर हे शशांक हगवणे याचे मामा असल्याने त्यांचा या प्रकरणात जुळविले गेले आहे
वैष्णवीचा नवरा शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण
वैष्णवीच्या हगवणे मृत्यू प्रकरणातील तीन आरोपींना पिंपरी चिंचवड पोलिसांनी केलं कोर्टात हजर
वैष्णवी यांचे पती शशांक हगवणे, सासु लता हगवणे, नणंद करिष्मा हगवणे या तिन्ही आरोपींना करण्यात आलं हजर
काल एक दिवसाची पोलीस कोठडी संपत असल्याने आज पुन्हा न्यायालयात हजर
अंबरनाथमध्ये अज्ञात इसमाचा शीर नसलेला मृतदेह आढळून आला आहे. नालिंबी रोडवरील तीन झाडांजवळ हा मृतदेह सापडला असून यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
मिरा रोड मधील शांती नगर परिसरात भीषण आग लागण्याची घटना घडली आहे.
शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे ,यामध्ये दोन सिलेंडर ब्लास्ट झाले आहेत
बिल्डरच्या मोकळ्या जागेत अनधिकृत झोपड्या असून चार झोपड्या जळून खाक झाल्या आहेत.
चार अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले असून यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही
ओबीसी समाजाला एकत्रित करण्यासाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसीने ओबीसीच्या उमेदवारांना मतदान करावे यासाठी समाजामध्ये जागृती केली जाईल. यासाठी आॅगष्ट मध्ये माळेगाव (जि.नांदेड) ते मुंबई असा लाॅग मार्च काढण्यात येणार आहे. ओबीसी समाजाचे झोपडे कोण उध्वस्त करत असेल तर तुमची जागा दाखवून देऊ असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे यांना दिलीय.
लक्ष्मण यांना नांदेड जिल्ह्यातील ओबीसी समाजाने चारचाकी गाडी भेट दिली आहे. आज हाके यांचे सांगोल्यात आगमन झाल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करत त्यांचे स्वागत केले. यावेळी लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही थेट इशारा दिला आहे.
डोंबिवली एमआयडीसी परिसरात गॅस पुरवठा खंडित
दुपारी 1 वाजल्यापासून पुरवठा ठप्प
घरडा केमिकल कंपनीजवळ पाईपलाइन डॅमेज झाल्याने गॅस पुरवठा खंडित झाल्याची माहीती
महानगर गॅसकडून SMS द्वारे माहिती देण्यास सुरुवात
9-10 तास दुरुस्तीचा अंदाजित कालावधी लागत असल्याने गॅस सेवा रात्री 11.30 वाजेपर्यंत सुरळीत होण्याची शक्यता
-सिडको उत्तम नगर गौरीशंकर मंगल कार्यालय समोरील फर्निचरच्या दुकानावर व घरावर कोयत्याने वार
मद्यधुंद नशेत दोन ते तीन अज्ञात अटवाळखोरांनी केले दुकानावर व घराच्या सेटरवर कोयत्याने वार
- संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद
- दहशत वाजवण्याच्या उद्देशाने केला प्रकार
- उत्तम नगर भागात दहशतीचे वातावरण
- सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल
नागपूर - पाकिस्तान गेलेल्या सुनीताची चौकशीत तथ्य आढळल्यास ATS, NIA सर्वच अँगलने चौकशी होणार
- सुनीता जामगेडे यांनी मोबाईल नेमका कशासाठी format केला, सायबर पोलीस सुनीताच्या मोबाईलचा डेटा रिकव्हर करत आहेत
- BSF ची सुरक्षा असताना सुनीताने LOC पार कशी केली याचीही चौकशी करत आहे.
- सुनीताने तिच्या मोबाईलचा सर्व डेटा डिलिट केला होता, त्यामुळे पोलिसांना संशय आहे. आता नागपूर सायबर पोलिसांनी तज्ज्ञ टीम सुनीताच्या मोबाईलचा डाटा रिकव्हर करण्याचा प्रयत्न करत आहेत.
बीड - माजलगावच्या केसापुरी कॅम्प परिसरात स्कॉर्पिओ गाडीचा अपघात, तीन गंभीर जखमी
बीडच्या माजलगाव शहराजवळ असलेल्या केसापुरी कॅम्प कार पीओ गाडीचे टायर फुटल्याने तीन जण गंभीर जखमी खासगी रुग्णालयात दाखल
धर्मनाथ अर्बनचे चेअरमन जोगडे यांच्या गाडीला केसापुरी कॅम्प येथे टायर फुटल्याने अपघात झाला असल्याची माहिती मिळत आहे.
माजलगाव शहराजवळ असलेल्या केसापुरी कॅम्पजवळ कारचे टायर फुटल्याने तीन जण गंभीर जखमी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुसळधार पावसामुळे वडापूर बंधाऱ्यांच पाणी झाले ओव्हरफ्लो
अति पाऊस आणि पाण्याचा प्रवास जास्त असल्याने बांधाऱ्याची माती अक्षरश गेली वाहून
बंधाऱ्याला जोडणारा रोड पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे वाहून गेल्याचे चित्र दिसून येत आहे.
यामुळे नदी काठावरील शेतामध्ये हे पाणी घुसून मोठ्या प्रमाणात शेतीच नुकसान होण्याची शक्यता
दरम्यान बंधाऱ्याला जोडणारा रस्ताच वाहून गेल्याने वडापूर सिद्धापूर गावाचा संपर्क तुटला आहे
नंदुरबार शहरातील शहादा प्रकाशा बायपास रस्त्यावर लाभार्थी महिलांची रांगच रांग....
बांधकाम कामगारांना पेटी वाटपाचा कार्यक्रमात एक ते दीड किलोमीटर पर्यंत रांग...
लाभार्थ्यांच्या गर्दीमुळे शहादा प्रकाशा बायपास रस्त्यांवर वाहतूक कोंडी...
तासंतास उभे राहिल्यानंतर महिलांचा संताप....
वैष्णवी हगवणे मृत्यु प्रकरणी न्यायालयाने लता हगवणे शशांक हगवणे करिष्मा हगवणे यांना काल एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती.
लता, शशांक, करिष्मा यांना आज पोलीस तीन वाजता कोर्टात सुनावणीसाठी हजर करणार आहेत.
राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय....
- कोल्हापुरातील गांधी मैदान येथे गेली आठ दिवस पडलेल्या पावसामुळे मैदानाचे रूपांतर तळ्यामध्ये झाले आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने गांधी मैदानात अनोखा आंदोलन करण्यात आले आहे. या मैदानाच्या सुशोभीकरणासाठी 5 कोटी रुपये खर्च केल्याचा दावा प्रशासनाने केलेला आहे. मात्र एका पावसातच मैदानाची दयनीय अवस्था निर्माण झालेली आहे.शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून गांधी मैदानात साठलेल्या पाण्यामध्ये आंदोलन करण्यात आलं आहे. यावेळी एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांचे पोस्टर या चिखलात बुडवण्यात आले.
मान्सूनपूर्व पावसामुळे अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात मोठं नुकसान झालंय. मान्सूनपूर्व पावसाने ज्वारी पिकाचा हाता तोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांच्या तोंडून हिरावलाय. पावसामुळे काळवंडलेल्या ज्वारीला अक्षरशः कोंब फुटलेय. तेल्हारा तालुक्यातील हिंगणी गावातील तुषार कोरडे या युवा शेतकऱ्यांना मोठ्या मेहनतीने फुलवलेले ज्वारीचे पीक अक्षरशः मातीमोल झालंय. सरकारने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलीये.
यवतमाळ येथील चिंतामणी ट्रॅव्हल्स पॉइंटसमोरील आणि उमसरा परिसरातील 'एस.बी.आय.'ची दोन एटीएममध्ये छेडछाड करून चोरट्यांनी एक लाख १४ हजार २०० रुपयांची रोख लंपास केल्याची घटना उघडकीस आली.
यावेळी तिघे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले असून अवधूतवाडी पोलिसांपुढे या चोरट्यांच्या अटकेचे आव्हान उभे ठाकले आहे.
बसस्थानक चौकापासून हाकेच्या अंतरावर ट्रॅव्हल्स पॉइंट असून, याच परिसरात एस.बी.आय.चे एटीएम केंद्र आहे.
या मार्गावर रात्रीही वर्दळ असते. अशा स्थितीत तीन ते चार अनोळखी लोकांनी एटीएममध्ये प्रवेश करून मशिनमध्ये छेडछाड करीत एक लाखाच्या रकमेची चोरी केली.
तसेच उमरसरातील एस.बी.आय. शाखेच्या एटीएम केंद्रातही चोरट्यांनी १४ हजार २०० रुपयांची रोख लंपास केली.
सातपुड्यातील प्रसिद्ध गावरान आंब्याला कवडीमोल भाव...
दीडशे ते दोनशे रुपये दर असलेल्या गावरान आंब्याचे दर घसरले....
सततच्या पावसामुळे 80 ते 90 रुपये किलोने गावरान आंबे विकण्याची शेतकऱ्यांवर आली वेळ...
कवडीमोल भावात रस्त्यांवर आंबे विकण्याची शेतकऱ्यांवर आली वेळ.....
आंब्याच्या दरात तब्बल 50 टक्क्यांनी घसरले...
पुणे पोलिसांकडून निलेश चव्हाण याच्या विरोधात कस्पटे लुक आऊट नोटीस काढली आहे.
चव्हाण याने वैष्णवी हगवणे यांच्या बाळाचा ताबा घ्यायला गेलेल्या मोहन कस्पटे यांच्या डोक्याला पिस्तूल लावून धमकावल्याप्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
तसेच निलेश चव्हाण याच्याकडे असलेला पिस्तुल परवाना सुद्धा रद्द करण्यात आल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली.
चव्हाण याच्या तपास करण्यासाठी २ पथकं काम करत असून त्याला लवकरच ताब्यात घेतले जाईल.
- 31 मे रोजी होणारा पक्षप्रवेश 5 जून रोजी होणार असल्याची माहिती
- शिव शिवसेना शिंदे गटाचे लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे यांची माहिती
- काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे निकटवर्तीय असलेले सिद्धाराम म्हेत्रे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ते शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश करणार आहेत
- 31 मे रोजी त्यांचा पक्षप्रवेश ठरलेला होता मात्र तो आता 5 जून रोजी होणार आहे
- दरम्यान सिद्धाराम म्हेत्रे यांचा पक्षप्रवेश रखडल्याने चर्चेला उधाण आलेय
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. विशेषतः केळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुमारे २ एकर क्षेत्रातील केळी पीक उद्ध्वस्त होऊन जमीन दोस्त झाले आहे शेतकऱ्याचे 12 लाखाहून अधिक नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या वतीने प्रशासनाकडे त्वरित पाहणी करून आर्थिक मदत देण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली आहे.
बार्शी तालुक्यातील सौंदरे गावातील ड्रॅगनफ्रुट बागेची मान्सूनच्या पावसाने केलं नुकसान
अति पावसामुळे ड्रॅगनफ्रुटच्या झाडाची पाने पडली पिवळी जरद
मान्सूनमुळे सोलापूर जिल्ह्यातील बळीराजा आला अडचणीत
पाच एकर बागेतील साधारण 700 ड्रॅगनफ्रुटच्या झाडावर पावसाचा झाला परिणाम
निसर्गाच्या लहरीपणामुळे ड्रॅगनफ्रुटचा दर्जा ढासाळला
कमी पाण्यात येणार पिक म्हणून ड्रॅगफ्रुट पिकाची आहे ख्याती,मात्र सोलापूर जिल्ह्यात सुरु असणाऱ्या पावसाने ड्रॅगनफ्रुटचे भाव आले अर्ध्यावर
मागच्या दोन वर्षात निसर्गचक्र बदलल्यामुळे प्रत्येक वर्षी ड्रॅगनफ्रुट उत्पादक शेतकऱ्याला याचा बसत आहे फटका
त्यामुळे शासनाने याची तात्काळ दखल घेऊन नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.
गेल्या वर्षात पीएमपीला 91 लाखाची उत्पन्न
पीएमपीने गेल्या आर्थिक वर्षात 18 हजार 170 फुकट्या प्रवाशांवर कारवाई केली आहे.त्यांच्याकडून 91 लाख दंड वसूल करण्यात आला आहे.
पीएमपीच्या पथकाकडून दररोज कारवाई केली जाते,तरी फुकट्या प्रवाशांची संख्या कमी होताना दिसत नाही.
पीएमपीकडून पुणे,पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीएच्या हद्दीत 160 बसच्या माध्यमातून सार्वजनिक सेवा दिली जाते. यामधून दररोज दहा लाख नागरिक प्रवास करतात.त्यातून पीएमपीला दररोज दीड ते दोन कोटीचे उत्पन्न मिळते.
मात्र या प्रवासात दररोज विना तिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अशा फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी पीएमपी प्रशासनाकडून पुणे पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीच्या कार्यक्षेत्रात तिकीट तपासणी पथक तैनात केली आहेत.
प्रवासादरम्यान तिकीट तपासणी केली जाते.त्यामध्ये दररोज 50 ते 60 फुकटे प्रवासी सापडत आहेत.पाच ते दहा रुपये तिकीट न करता विना तिकीट प्रवाशांकडून पाचशे रुपयांचा दंड आकारला जातो तरीही प्रवासी विना तिकीट प्रवास करताना आढळून येत आहेत.
पुणे महापालिकेकडून मार्गदर्शक सूचना जारी
शहरात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असून या रुग्णांसाठी उपचार पद्धतीबाबत आरोग्य विभागाने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत
सहव्याधी असलेल्या व रुग्णालयात भरती झालेल्या कोरोना रुग्णांना तीन ते पाच दिवस रेमडेसिव्हीर वापरण्याच्या सूचना
सिंगापूर आणि हाँगकाँगनंतर राज्यातही कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यासाठी महापालिकेमध्ये आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती
खासगी रुग्णालयांना बाधित रुग्णांचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणसाठी बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत
सांगली जिल्ह्यातील ओबीसी नेते आणि व्हिजीएनटी परिषदेचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष संग्रामनाना माने यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीमध्ये विटा येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.. गेल्या काही दिवसांपासून संग्राम माने यांना विविध पक्षांकडून पक्षप्रवेशाच्या ऑफर देण्यात येत होत्या.मात्र संग्राम माने यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, त्यानुसार आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.ओबीसी समाजातील एक लढवय्या नेतृत्व म्हणून संग्राम माने यांची सांगली जिल्ह्यामध्ये ओळख आहे.त्यांच्या भाजपाच्या पक्षप्रवेशामुळे विशेषतः विटा-खानापूर तालुक्यामध्ये भाजपाची ताकत अधिक वाढणार आहे.
जालन्यात उत्पादनास परवानगी नसलेले विनापरवाना खत रेल्वे रेक द्वारे वाहतूक करून कंपनीच्या गोडाऊन मध्ये साठवल्याप्रकरणी खताच्या गोडाऊनवर कृषी विभागाने मोठी कारवाई केली आहे . जालन्यात गुंडेवाडी शिवारातील कृष्णा फस्केम कंपनीच्या गोडाऊनवर कृषी विभागाने ही मोठी कारवाई केली असून या कारवाईत फॉस्फोजिप्सम पाउडर नावाचं तब्बल 20 लाखांच 320 मॅट्रिक टन खत कृषी विभागाने जप्त केल आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर जालना कृषी विभागाने ही मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी जालनाच्या चंदनझीरा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासामध्ये सहभाग निष्पन्न झाल्याने तुळजापुरातून शुभम सुरेश नेपते या तरुणाला अटक
ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत 37 आरोपींचा सहभाग , तर 19 आरोपी अटक
तामलवाडी पोलिसांकडून शुभमच्या अटकेची कारवाई
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील 18 आरोपी अजूनही फरार, नोटीस बजावलेल्या अनेकांचा तपास सुरू
रत्नागिरीकरांची पाणी टंचाईची समस्या सुटली
मे महिन्यातच शीळ धरण 100 टक्के भरले
कालपासून पावसाने उसंत घेतली जरी असली तरी गेल्या 8 दिवसांमध्ये पडलेल्या पावसाने पाणलोट क्षेत्रात प्रचंड वाढ झालीय
शीळ धरणातून रत्नागिरी शहरातील जवळपास 8 लाख नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो
जिल्ह्यातील 68 धरणांपैकी 6 धरणं ही 100 टक्के भरुन वाहताहेत तर 25 धरण ही 50 टक्के क्षमतेने भरुन वाहताहेत
रत्नागिरीतून शीळ धरणावरुन आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल कलये यांनी....
वर्तमानपत्राच्या मालकांनी वृत्तपत्रा मागे कमिशन वाढवून देण्याची मागणी..
प्रत्येक वृत्तपत्रा मागे दोन रुपये दहा पैसे कमिशन देण्याची वृत्तपत्र विक्रेत्यांची मागणी.
29,30,आणि 31 मे पर्यत वृत्तपत्रे वाटप करणार नाही;संघटनेचा निर्णय..
वृत्तपत्र विक्रेते संपावर गेल्यामुळे जवळपास 60 हजार पेक्षा अधिक वृत्तपत्र वाचकांना फटका.
वाशिम जिल्ह्यातील मालेगाव पोलिसांना तब्बल आठ महिने चकवा देणारा आणि खुनासह दरोड्याच्या गुन्ह्यातील अंडर ट्रायल आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. अहमदाबाद येथून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
दिनेश किसनभाई निरापुरे (वय 45, रा. चांदुलाल चाळ, विक्रम मिल जवळ, बापू नगर, अहमदाबाद, गुजरात) असं आरोपीचं नाव आहे. त्याच्यावर 2021 साली मालेगाव पोलीस ठाण्यात खुनासह दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. सन 2021 पासून आरोपी वाशिम जिल्हा कारागृहात होता. मात्र मागील वर्षी 12 ऑगस्ट रोजी तब्बेत बिघडल्याने उपचारासाठी नागपूरला नेत असताना त्याने पोलीस गार्डला चकमा दिला आणि फरार झाला होता.
वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे निर्देश, औषधसाठा तपासण्याचे आदेश
यंदा जिल्ह्यात जोरदार पाऊस होणार असल्याचे संकेत हवामानशास्त्र केंद्राने दिले आहेत. त्यात मागील काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पावसाचा जोरदार मारा सुरू आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणाही अलर्ट मोडवर आली आहे. त्यामुळे सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे निर्देश दिले आहेत. शिवाय औषधांचा साठा तपासून आवश्यक असलेली औषधीची मागणी करण्याचे निर्देश जिल्हा आरोग्य यंत्रणेला देण्यात आले आहेत
जालना -अंबड रोडवरील शेवगा शिवारातील घटना, सकाळी साडेपाच वाजेची घटना...
अपघातात कारचालक गंभीर जखमी तर दोन प्रवासी किरकोळ जखमी...
जालन्यात ट्रकचा आणि कारचा भीषण अपघात झालाय. जालन्यातील जालना अंबड रोडवरील शेवगा शिवारात सकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान अपघाताची घटना घडली. या अपघातात कारचालक गंभीर जखमी झाला असून दोन प्रवासी किरकोळ जखमी झाली आहे. जखमींवर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. अपघात इतका भयंकर होता की या अपघातात कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे..
काल अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्याने शेतात काढून ठेवलेला मका व कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, धुळे जिल्ह्यातील नेर परिसरामध्ये काल पावसाने अचानक हजेरी लावली, यावेळी शेतकऱ्यांने शेतात काढून ठेवलेला मका व कांदा पूर्णतः भिजल्याने या पिकाच मोठ्या प्रमाणात नुकसान झाल आहे,
गेल्या काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील मका व कांदा काढून शेतात वाळण्यासाठी ठेवला होता, परंतु काल झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतात काढून ठेवलेल पिक पूर्णतः भिजल्याने शेतकऱ्याचे यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, नुकसान झालेल्या शेती पिकाची नुकसान पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रशासनाने मदत मिळवून द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
लातूर जिल्ह्याल्या ग्रामीण भागात मुसळधार पाऊस झाला आहे... पावसामुळे जनजीवन पूर्त विस्कळीत झालय.. जिल्ह्यातील अनेक नदी नाल्यांना पूर आलाय... तर काढणीला आलेल्या शेती पिकांचे देखील मोठे नुकसान झाल आहे.. विशेषता: कांदा टरबूज ,पिकांचं मोठं नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे.. तर काढणीला आलेल्या ज्वारी पिक पूर्ण पाण्यात गेल आहे.. पावसात ज्वारी भिजल्याने संपूर्ण ज्वारीचे दाणे काळे पडले आहे...
- बसवारूढ मठाच्या माध्यमातून त्यांनी मोठे सामाजिक कार्य केलेय
- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे ते गुरु होते
- महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा राज्यात त्यांचा लाखोंचा भक्तगण आहे
- आप्पाजींचा अध्यात्मिक क्षेत्रातही मोठा वरचष्मा होता
- ईश्वरानंद महास्वामी यांना आप्पाजी या नावाने संबोधले जात होते
- काल रात्रीच्या सुमाराम त्यांची प्राणज्योत मालवली.
- आज सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत
रांगेत उभा टाकण्याच्या कारणावरून दोन महिला एकमेकींना भिडल्या.
नांदेड शहरातील पोस्ट ऑफिस मधील आधार केंद्रासमोरील प्रकार.
आधार अपडेट करण्यासाठी दररोज पोस्ट ऑफिस समोर नागरिकांच्या लागत आहेत रांगा.
एका दिवसात 40 आधार अपडेट होत असल्याने नागरिकांचे प्रचंड हाल.
नांदेड शहरातील इतर ठिकाणचे आधार केंद्र बंद पडल्याने पोस्ट ऑफिस मधल्या आधार केंद्रावर प्रचंड गर्दी
- प्रणिती शिंदे यांचे सोलापूर ते गोवा प्रवासाचे विमानाचे तिकीट बुक करत केले अनोखे आंदोलन
- सोलापूर भाजपचे माजी नगरसेवक अनंत जाधव यांनी स्वखर्चातून विमानाचे तिकीट काढत हे अनोखे आंदोलन
- सोलापूरची विमानसेवा सुरू होणार नाही असे विधान खासदार प्रणिती शिंदे यांनी वारंवार केले होते
- त्यामुळे भाजपने ही विमानसेवा सुरू केली असून त्यावर विश्वास बसावा म्हणून सोलापूर ते गोवापर्यंत प्रणिती शिंदे यांच काढलं विमान तिकीट
- त्याचबरोबर काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी ''सांग सांग भोलानाथ, विमानसेवा सुरू होईल काय?" असे आंदोलन केले होते
- त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपने हे आंदोलन केलय.
- काँग्रेसला एवढेच सांगणे आहे की आम्ही जे बोलतो ते करुन दाखवतो.
- मात्र,काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी किती लोकांना आमदार करण्याचा शब्द दिला आणि किती लोकांची माती केली ते देखील भोलानाथला विचारावे,असा उपहासत्मक टोला ही यावेळी अनंत जाधव यांनी लागवला
- या विमानप्रवासासाठी जवळपास 11 हजार रुपये खर्च आला असून यामध्ये एका विंडो सीटचा ही समावेश आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत हिंगोलीत देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते साडेसातशे कोटी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन होणार आहे तर हिंगोली पंचायत समितीच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते होणार आहे यानंतर हिंगोलीच्या रामलीला मैदानावर फडवणीस यांच्या उपस्थितीत महिला मेळावा व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्यातून फडणवीस काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे दरम्यान गेल्या आठ दिवसांपासून प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली तयारी अंतिम टप्प्यात आली असून रामलीला मैदानावर पावसाच्या दृष्टिकोनातून जापानी तंत्रज्ञान वापरत मंडपाची उभारणी करण्यात आली आहे
पुणे विभागात बुधवारपर्यंत पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक अर्ज
पुणे जिल्ह्यातील ६० हजार २०४ विद्यार्थ्यांनी केली अकरावी प्रवेश प्रक्रियेची नोंदणी
अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिला फेरी चे अर्ज भरण्यासाठी ३ जून पर्यंत मुदत
शिक्षण विभागाने अकरावी मध्ये प्रवेश घेण्यासाठी सर्व ठिकाणी ऑनलाइन प्रक्रिया राबवली आहे
पुणे विभागात १ हजार ५३८ महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे
पुणे जिल्ह्याच्या पाठोपाठ अहिल्यानगर मधून २२ हजार ३६४, सोलापूर जिल्ह्यातून १४ हजार ३०५ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे
शहरात मोठा पाऊस झाल्यानंतर सुद्धा धोकादायक झाडांच्या फांद्यांच्या छाटणी कडे पालिकेचे दुर्लक्ष
पुणे शहरात गेल्या ३ दिवसात झाड पडीच्या दोन घटनांमध्ये दोन जणांचा बळी
काल संध्याकाळी पुण्यातील निलायम टॉकीज जवळ एका रिक्षावर झाड कोसळल्यामुळे प्रवाशाचा मृत्यू
२ दिवसांपूर्वी पुण्यातील कर्वेनगर परिसरात दुचाकीस्वाराच्या डोक्यावर झाड पडल्याने जागीच मृत्यू
धोकादायक झाडे आणि त्यांच्या फांद्या तोडण्यासाठी महापालिकेकडे १६११ तक्रारी आल्या होत्या
यापैकी १३८२ तक्रारींची दखल घेण्यात आली मात्र अजूनही २२९ तक्रारींवर महापालिकेने कारवाई का नाही केली असा प्रश्न
पुण्यात झालेल्या घटनांमुळे धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर
मे महिन्यात आत्तापर्यंत २५४ फांद्या आणि झाडं पडण्याच्या घटना घडल्या आहेत
पुणे जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग करणार प्राण्यांचे लसीकरण
पावसाळ्यापूर्वी ५ लाखांपेक्षा अधिक प्राण्यांचे लसीकरण पूर्ण
संसर्गजन्य आजारापासून प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी करण्यात येणार लसीकरण
१५ जून पर्यंत पुणे जिल्ह्यात राबविण्यात येणार विशेष लसीकरण मोहीम
पावसाळ्यात डास, फर्या (ब्लॅक क्वार्टर – बीक्यू ), एन्टरोटॉक्सिमिया आणि लम्पी स्किन डिसीज (एलएसडी) सारख्या आजारांपासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी लसीकरण मोहीम
मोहिमेअंतर्गत मिळालेल्या ५,९७,२०० लसींचा साठा गावपातळीवर वितरित करण्यात आला आहे. मान्सूनपूर्व लसीकरणात ३,४७,३९६ गायी, ३६,८०८ म्हशी आणि २८,०७४ वासरांचे लसीकरण करण्यात आले आहे.
काल दुपारी अचानक पावसाची मोठी सर आल्याने नागरिकांची तारांबळ उडाली
संध्याकाळ नंतर मात्र पावसाने विश्रांती घेतली आहे
पुढील ४ ते ५ दिवस पुण्यासह राज्यात मॉन्सून ब्रेक घेणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आता उत्तर दिशेला वळल्यामुळे राज्यातील होणारा पावसाचा वेग मंदावणार
पुढील ४ ते ५ दिवस राज्यात काही ठिकाणी वगळता पाऊस विश्रांती घेईल असा अंदाज पुणे वेधशाळाने वर्तवला आहे
"फरार आरोपी नीलेश चव्हाणला पकडून ठेवलय" असा फोन नांदेड सिटी पोलिसांना आला पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला
मात्र फोन करणाऱ्याने पोलिसांनाच खोटी माहिती दिल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
फरार आरोपीची माहिती आपण पोलिसांना दिल्यावर पोलिसांच्याकडून आपल्याला बक्षिसाची रक्कम मिळेल
या हेतूने त्याने ११२ या क्रमांकावर पोलिसांना फोन केला
संतोष दत्तात्रय गायकवाड, (वय ३३) याच्याविरुद्ध नांदेड सिटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे
फोन करणाऱ्यांनी ‘आम्ही वैष्णवी हगवणे प्रकरणातील फरार आरोपी चव्हाण हा पकडून ठेवला आहे. त्याची जवळ दोन पिस्तूल आहेत. आम्ही त्याला मारहाण करून गाडीचे डिक्कीत ठेवले आहे.’ असे सांगितल्याने त्या व्यक्तीचा शोध घ्यायला सुरुवात झाली
ती व्यक्ती किरकटवाडी, येथील पानशेत रस्त्यावरील स्वागत हॉटेल येथे मिळून आला
त्याच्याकडे चौकशी केली. त्या व्यक्तीने खोटे कॉल करत असल्याचे आढळून आले
शहरात गेल्या वर्षभरात ६४ हजार वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई
नियम मोडणाऱ्या ६४ हजार बेशिस्त वाहन चालकांवर RTO कडून कारवाई
RTO च्या फ्लाइंग स्क्वॉड कडून शहरभरात करण्यात आल्या कारवाया
२०२४-२५ या आर्थिक वर्षात फ्लाइंग स्क्वॉडने नोंदवलेल्या वाहतूक गुन्ह्यांच्या नोंदी
हेल्मेट न घालणे – १९,६४५
वेगमर्यादा ओलांडणे (स्पीड गन) – १३,८१७
अवैध विमा (इनव्हॅलिड इन्शुरन्स) – ८,७४४
सीट बेल्ट न वापरणे- ५,०८७
सिग्नल तोडणे / लेन कटिंग – ३,२०४
फॅन्सी नंबर प्लेट (५०/१७७ अंतर्गत) – ३,५८०
रिफ्लेक्टरशिवाय वाहन -४,२८५
चुकीचे पार्किंग – १,७७७
गाडी चालवताना मोबाईलचा वापर२ – २४३
टेल लॅम्प / ब्रेक लाइट काम करत नसणे – १,४४४
जास्त भार असलेले मालवाहू वाहन – १,३९२
तीन जणांनी दुचाकीवर बसणे – १,४३५
धाराशिवच्या कळंब शहरात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौकामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या शिल्पाचे धाराशिवचे ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.आमदार कैलास पाटील यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निधीतुन कळंब मध्ये अण्णाभाऊ साठे यांचे शिल्प उभारण्यात आले आहे.या अनावरण कार्यक्रमासाठी ठाकरे गटाचे पदाधिकारी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील कोठारी गावात काल सायंकाळी आलेल्या वादळवाऱ्याने गावातील पाच ते सहा शेतकऱ्यांचे सौर उर्जा पॅनल उडून गेले, काहींच्या पॅनलला मोठ्या प्रमाणावर तुटफुट झाली आणि लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या नुकसानामुळे मोठा फटका बसला आहे. गणेश शिवदास माहूलकर, बबन कटूजी गायकवाड, महादेव रामजी भोंगळे, ज्ञानेश्वर पांडुरंग राऊत आणि परशराम महादेवराव वाघ यांचे सोलर पॅनल पूर्णपणे क्षतीग्रस्त झाले आहेत.
शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी केली असून,शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
मेघागर्जना आणि सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह भंडाऱ्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसानं हजेरी लावली.
मागील काही दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात वेळोवेळी मुसळधार पावसानं हजेरी लावल्यानं भात पिकासह पालेभाज्यांची शेतीही धोक्यात आली आहे.
काल झालेल्या पावसानं अनेक हेक्टर मधील भात पीक जमीनदोस्त झाला आहे
आज परत सलग दुसऱ्या दिवशी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस आला.
यामुळं हाती आलेल्या भात पिकाची नासाडी होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
लातूरच्या गरसुळी इथ शेतात राहणाऱ्या वयोवृद्ध दाम्पत्याचा खून करून दागिने लंपास केल्याची धक्कादाय घटना घडली आहे...
तर या घटनेत चोरट्याने अत्यंत क्रूरपणे अर्धांगवायू झालेल्या वृद्ध व्यक्तीस खून करून जवळच असलेल्या विहिरीत फेकले आहे,तर वृद्ध महिलेचा डोक्यात कुकर घालून, दगडाने ठेचून तिचा खून केला. आणि चोरटा पसार झाला..
मात्र या घटनेची माहिती लागताच लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 12 तासात आरोपीला गजाआड केले आहे...
दरम्यान आरोपी हा गावातीलच असल्याच पोलीस तपासात समोर आल आहे...
चोरीच्या उद्देशाने वयोवृद्ध दाम्पत्याचा खून केल्याच निष्पन्न झाल आहे.. गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर 12 तासांत आरोपी पंडित रावणकोळे याला अटक करण्यात आली आहे..
वाशिम जिल्ह्यात सुरु असलेल्या अवकाळी पाऊस आणि जोरदार वादळामुळे मंगरुळपिर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
चिखली झोलेबाबा या गावात चंद्रकला श्रीराम खंडारे (वय ७०) यांच्या घरावरचे छत वाऱ्याने उडून गेले.
त्यामुळे त्यांचा परिवार उघड्यावर आला असून त्यांच्यासमोर निवाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
तर या घटनेत शेजारील नाना देवा खंडारे (वय ४०) यांच्या हातावर व डोक्यावर उडालेले टीन पत्रे पडल्यामुळे त्यांना दुखापत झाली आहे.
या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
चंद्रकला खंडारे या वयोवृद्ध महिलेने प्रशासनाकडे तातडीने सर्वेक्षण करून नुकसानभरपाई तसेच मदत देण्याची मागणी केली जात आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठ्या घाऊक बाजारपेठेत एक धक्कादायक प्रकार कॅमेरात कैद झाला आहे. राज्यभरात सुरु असलेल्या पावसामुळे खराब झालेला टोमॅटो बाजारात फेकण्यात आला होता. मात्र, एक व्यक्ती हेच सडलेले टोमॅटो गोळा करताना साम टीव्ही च्या कॅमेरात कैद झाले आहेत.
गोळा केलेले हे टोमॅटो नंतर किरकोळ बाजारात स्वस्तात विकले जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे. यामुळे सामान्य ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या या प्रकाराकडे बाजार समिती आणि प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते.
सडलेले, नाशवंत टोमॅटो आणि भाजीपाला पुन्हा गोळा करून विक्रीस पाठवणे ही आरोग्यदृष्ट्या अत्यंत धोकादायक बाब आहे.
ग्राहकांनी अत्यंत सावध राहण्याची गरज आहे, विशेषतः अतिशय स्वस्त दरात विकल्या जाणाऱ्या भाजीपाल्याबाबत.
बाजार प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन दोषींवर कारवाई करणे गरजेचे आहे.
में महिन्यात झालेल्या पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील जलसाठ्यांची पातळी लक्षणीयरीत्या वाढली आहे. घोळसगाव येथील साठवण तलाव ७५% भरला असून, येथील पाझर तलाव तब्बल १००% भरलेला आहे. इतिहासात पहिल्यांदाच मे महिन्यात एवढ्या प्रमाणात तलाव भरल्याची नोंद आहे.
मे महिन्यात नेहमी कोरडी असणारी ही जलसाठ्ये यंदा पावसामुळे भरून निघाल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भविष्यातील पाणीटंचाईसारख्या समस्या काही अंशी टळण्याची शक्यता असल्याने ही स्थिती सकारात्मक मानली जात आहे.
ताज्या पावसामुळे शेतीच्या पूर्वतयारीस गती मिळणार असून,खरीप हंगामासाठी लाभदायक स्थिती निर्माण झाली आहे.पावसाचा जोर आणखी काही दिवस राहिल्यास तालुक्यातील इतर जलसाठ्यांनाही लाभ होणार आह
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य प्रशासनातले डॉक्टर हे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये उपयुक्त आणि वॉर्ड ऑफिसर होण्यासाठी आयुक्तांकडे 4 डॉक्टर जणांनी अर्ज केला आहे
त्यात आरोग्य प्रशासनातले 5 डॉक्टर वॉर्ड ऑफिसर आणि उपायुक्त पदावर बसलेले आहेत
त्यामुळे आरोग्य सेवेचे नवी मुंबई महानगरपालिकेचे तीन तेरा वाजले आहेत एकीकडे पावसाळा सुरू झालेला आहे त्यात कोरोनाची संख्या नवी मुंबईत वाढत आहे मात्र डॉक्टरांना उपायुक्त आणि वॉर्ड ऑफिसर होण्यासाठी आणि मलाई खाण्यासाठी डॉक्टरांची धावाधाव सुरू झाली
हा आदेश अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवशी यांनी दिला आहे.
जिल्ह्यात विविध राजकीय पक्ष, विविध संघटना वेगवेगळ्या घटकांतील नागरिकांकडून त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात.
जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण न झाल्याच्या निषेधार्थ आंदोलनात्मक कार्यक्रम करण्यात येतात.
अशा वेळी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते.
7 जून रोजी बकरी ईद सण साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक असल्याने मनाई आदेश जारी करण्यात आला आहेत.
नागपुरी पोलिस स्टेशन हद्दीत अमरावती गुन्हे शाखा 1 ची कारवाई..
गुटख्याचे 3528 पॅकेट केले जप्त..
दोन आरोपी विरुद्ध नागपुरी गेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल..एक आरोपी अटकेत..
या कारवाई मुळे अमरावतीत अवैध गुटखा विक्री करणाऱ्याचे धाबे दणाणले..
वीज वितरण महावितरण कंपनीतर्फे वीज यंत्रणा दुरुस्तीला आजपासून सुरुवात...
दुरुस्ती साठी सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत संबंधित भागातील वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे
पाऊस व वादळामुळे वीजपुरवठा प्रभावित होते त्यामुळे पावसाळा लक्षात घेता देखभाल व दुरुस्तीची कामे करण्यासाठी सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने अमरावती शहरातील विज पुरवठा करण्यात येणार बंद..
वीज ग्राहकांनी सहकार्य करण्याचे महावितरण कंपनीकडून आवाहन
आजपासून सहा दिवस सकाळच्या दरम्यान वीजपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांना त्रास होण्याची शक्यता
मेट्रो 14 मुळे मुंबई आणि बदलापूर ही दोन्ही शहरं आता लवकरच मेट्रोने जोडली जाणार आहेत.
या प्रकल्पासाठी 14 हजार 898 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
ही मार्गिका सुरू झाली की दररोज 7 लाख प्रवाशांची ये-जा शक्य असेल.
खाडी पार करून येणारी ही मुंबईतील पहिली मेट्रो असेल.
या मेट्रोवर 15 स्थानके त्यातील 13 उन्नत स्थानके असणार आहे.असणार आहेत.
बदलापूर, अंबरनाथ, निलजे, शिळफाटा, महापे, घणसोली या भागातून पुढे जाऊन अखेरीस ठाणे खाडी ओलांडून कांजूरमार्ग येथे मुंबईच्या हद्दीत पोहोचेल.
आठवडे बाजार मध्ये वडील सोबत भाजी खरेदी करण्यास गेलेल्या 19 वर्षीय मुलाचा चार जनाचे टोळक्याने चाकू ने वार करून खून केल्याचा धक्कादायक घटना बुधवारी संद्याकाळी पंचवटीतील भाजी पटांगण परिसरात पुला खाली घडला.
नंद लाल उर्फ सूरज जगत दास रा.सीता गुंफा पंचवटी असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.
सूरज वडिलांसोबत भाजी खरेदी करण्यास गेला होता वडील भाजी खरेदी करण्यास गेला होते.
सूरज गाडगे महाराज पुल खाली सुलभ जवळ उभा असताना चार संशयित आले.
पैशांची मागणी केली.देण्यास नकार दिला असता संशयिताने डाव्या बाजुला पोटात चाकू मारला गंभीर जखमी अवस्थेत सिव्हीलमध्ये नेले उपचार सुरू होण्यापूर्वी डॉक्टर ने मृत घोषित केले.
या बाबत पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलं आहे.
पोलिसांनी एक संशयित ताब्यात घेतला असून इतरांचा शोध सुरू आहे. संशयित अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.