Ajanta Caves Tourism  Saam TV
महाराष्ट्र

Ajanta Caves Tourism : अजिंठा लेणींना भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; शासनाकडून इलेक्ट्रिक बसचा ताफा सुरू

Ruchika Jadhav

महाराष्ट्रातील अंजिठा लेणी सर्व पर्यटकांसाठी खूप प्रसिध्द आहे. अंजिठा लेणीला भेट देण्यासाठी लाखो पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. अंजिठा लेणीला भेट देताना पर्यटकांना लेणीचा इतिहास, शिल्पकला, चित्रकला पाहायला मिळतात. पण अंजिठा लेणीला भेट देताना वाहनांमुळे पर्यटकांची खूप गर्दी जमलेली असते. याआधी अंजिठा लेणीला भेट देताना पर्यटकांसाठी डिजेल बस सुरु होत्या. त्यामुळे पर्यटकांना खूपवेळा बससाठी थांबावे लागत होते. वाहतुकीच्या समस्येमुळे जागतिक पर्यटन दिनानिमित्त महाराष्ट्र पर्यटन विभागाने पर्यटकांसाठी २० इलेक्ट्रिक बस सुरु केल्या आहेत. यामुळे पर्यटकांचा अंजिठा लेणी प्रवास खूप अविस्मरणीय ठरणार आहे.

जागतिक पर्यटन दिनामुळे इलेक्ट्रोनिक बस पर्यटकांसाठी शुक्रवारी सुरु झाल्या आहेत. त्यामुळे सर्व पर्यटक इलेक्ट्रिक बसचा वापर २० ऑक्टोबरपर्यंत करु शकणार आहेत. या बसेसमध्ये पर्यटकांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध असणार आहेत. महाराष्ट्रातील आणि आंतरराष्ट्रीय देशातील सर्व पर्यटक इलेक्ट्रिक बसचा वापर करु शकणार आहे.

एका इलेक्ट्रिक बसमध्ये एकावेळी १४ ते २२ प्रवासी अंजिठा लेणी प्रवास करु शकता. अंजिठा लेणीचा इतिहास पाहण्यासाठी प्रवाशांना पार्किंगच्या ठिकाणांपासून थेट लेण्यांच्या ठिकाणांपर्यंत नेण्यात येईल.

पर्यटकांना बसमध्ये प्रवास करताना लेणीचा संपूर्ण इतिहास दाखवण्यात येणार आहे. नवीन सुरु झालेल्या इलेक्ट्रिक बसमुळे सर्व पर्यटकांचा प्रवास खूप वेगवान होणार आहे. या बसेचा उपयोग दिव्यांग नागरिक देखील करु शकणार आहे. पर्यटक इलेक्ट्रिक बसबरोबर अंजिठा लेणीचा अनुभव घेऊ शकणार आहेत. पर्यटकांसाठी इलेक्ट्रिक बसची सेवा दर दोन मिनिटांनी असणार आहे.

महाराष्ट्रातील लोकप्रिय अंजिठा लेणी युनस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. अंजिठा लेणी छत्रपती संभाजीनगर शहरापासून सुमारे १०० किमी अंतरावर आहे. अंजिठा लेणीमध्ये भगवान बुद्धांचे जीवन दर्शवणारी चित्रे पाहायला मिळतील. अंजिठा लेणीला भेट देण्यासाठी तुम्ही कोणत्याही महिन्यात जाऊ शकता.

जर तुम्हालाही अंजिठा लेणीचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही तिन्ही मार्गांनी प्रवास करु शकता. पर्यटक हवाई मार्गाने प्रवास करु शकता. हवाई मार्गाने प्रवास करण्यासाठी सर्वात जवळचे विमानतळ औरंगाबाद आहे. पर्यटकांना जर रेल्वे प्रवास करायचा असेल तर जवळचे रेल्वे स्टेशन जालना आहे.

जालना हे अंजिठा लेणीपासून फक्त ६० किमी अंतरावर आहे. त्याचबरोबर पर्यटक औरंगाबाद स्टेशनवरुन देखील प्रवास करु शकता. औरंगाबाद स्टेशन अंजिठापासून १०० किमी अंतरावर आहे. पर्यटकांना रसत्याने प्रवास करण्यासाठी सर्व ठिकाणांहून बस सेवा उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे पर्यटक कोणत्याही ठिकाणांवरुन अंजिठा लेणीचा बस प्रवास करु शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray: 15 लाखाचे पंधराशे का केले? लाडकी बहीण योजेनवरून उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारला घेरलं

Uddhav Thackeray : भाजपच्या रोपट्याला गुलाबी अळी लागली, ठाकरेंनी अजित पवारांवर तोफ डागली

Goa : गोव्यातील 'या' गावाची पर्यटकांना पडली भुरळ

Akshay Shinde Funeral: अक्षय शिंदेचा दफनविधी पूर्ण, मोठ्या पोलीस बंदोबस्तात उल्हासनगरमध्ये अंत्यसंस्कार

Marathi News Live Updates : दोन महिन्यात राज्यात MVA सरकार येणार - अनिल देशमुखांचा विश्वास

SCROLL FOR NEXT