मुंबई ते सिंधुदुर्ग विमान प्रवासानंतर, करावा लागणार खड्यातून प्रवास!
मुंबई ते सिंधुदुर्ग विमान प्रवासानंतर, करावा लागणार खड्यातून प्रवास! SaamTV
महाराष्ट्र

मुंबई ते सिंधुदुर्ग विमान प्रवासानंतर, करावा लागणार खड्यातून प्रवास!

अनंत पाताडे

सिंधुदुर्ग : वीस वर्षानंतर सिंधुदुर्गच चिपी विमानतळ (Chipi Airport) सुरू होतंय त्यामुळे प्रत्येक कोकणी माणसांमध्ये आनंद आहे. विमानतळाच 9 ऑक्टोंबरला उद्घाटन देखील होत आहे त्यांनतर येथून प्रवासी वाहतूक सुध्दा सुरू होईल मात्र मुंबई ते सिंधुदुर्ग चिपी एअरपोर्ट हवेतून प्रवास केल्यानंतर मात्र त्याच प्रवाशांना झाल्यावर खड्ड्यातून प्रवास करावा लागणार आहे. (Air travel from Mumbai to Chipi Airport)

चिपी विमानतळासाठी माजी पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला होता तसेच आताचे पालक मंत्री उदय सामंत यांनी 40 कोटी रुपये राज्य मार्गांसाठी दिल्या आहेत असा दावा खासदार विनायक राऊतांनी (MP Vinayak Raut) केला आहे. 15 मे पासून पाऊस सुरू झाल्यामुळे चिपी विमानतळाला जोडणारा रस्ता होऊ शकला नाही विमानतळ सुरू करण्याआधी त्या रस्त्याची डागडुजी केली जाईल भविष्यात इंटरनॅशनल एअरपोर्ट होईल असे खासदार विनायक राऊत सांगितला आहे. दरम्यान चिपी विमानतळ हे तब्बल वीस वर्षांनी सुरू होतं असल्याने मनसेने स्वागतही केलं आहे. मात्र सिंधुदुर्ग चिपी विमानतळाला सुसज्ज रस्ता असणे आवश्यक आहे मात्र मुंबई ते सिंधुदुर्ग एअरपोर्ट 45 मिनिटाचा प्रवास करून उतरल्यानंतर प्रवाशांना खड्डेमय प्रवास करावा लागणार असा हा रस्ता आहे.

चिपी विमानळ सुरु होतय खर, मात्र चिपी विमानळाला जोडणाऱ्या राज्य महामार्गाची खूपच दुरवस्था झाली त्यामुळे खासदार विनायक राऊत यांनी चिपी विमानतळ उद्घाटनाच्या आधी विमानतळाला जोडले जाणारे सर्व राज्यमार्ग दुरुस्त केले जातील असं सांगितले होते मात्र उद्घाटनाचा मुहूर्त जवळ आला तरी खड्डे मात्र तसेच आहेत. सिंधुदुर्ग चिपी विमानतळाचं कोकणी माणसाचा (Kokan People) स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण होणार असं जरी असलं तरी मात्र मुंबई वरून येणारा चाकरमानी मात्र आपल्या घरापर्यंत जाताना नक्कीच खड्ड्यातूनचं प्रवास करावा लागणार यात मात्र कोणतीही शंका नाही.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sambhajinagar News: संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, अजिंठा घाटात 66 प्रवासी घेऊन जाणारी बस उलटली

Today's Marathi News Live :नाशिक मुंबई महामार्गावर भीषण अपघात; बलगर चालक केबिनमध्ये अडकल्याने होरपळून जागीच मृत्यू

Lok Sabha Election 2024 : हुबेहुब आवाज, अॅक्शनही ; नरेंद्र मोदींचा मुखवटा घालून सांगलीतील सभांमध्ये दिसणारी व्यक्ती आहे तरी कोण?

Mint Water Benefits: उन्हाळ्यात रोज प्या पुदीन्याचं पाणी, आरोग्याला होतील फायदे

Jalgaon Crime : सोशल मिडियावर ओळख; लग्नाचे आमिष देत विवाहितेवर अत्याचार

SCROLL FOR NEXT