Ahmednagar Sambhaji Nagar highway Accident Saam TV
महाराष्ट्र

Breaking News: अहमदनगर-संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात; कंटेनरच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Ahmednagar Accident News: मृतांमध्ये पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांचा समावेश आहे. मन सुन्न करणारी ही घटना पांढरी पूल परिसरात रविवारी (२८ जानेवारी) सायंकाळच्या सुमारास घडली.

Satish Daud

सुशील थोरात, साम टीव्ही | अहमदनगर २९ जानेवारी २०२४

Ahmednagar-Sambhaji Nagar Highway Accident

भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरने दोन दुचाकींना पाठीमागून धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की दुचाकीवरील एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांचा समावेश आहे. मन सुन्न करणारी ही घटना पांढरी पूल परिसरात रविवारी (२८ जानेवारी) सायंकाळच्या सुमारास घडली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अनिल बाळासाहेब पवार (वय २८), सोनाली अनिल पवार (वय २२), माऊली अनिल पवार (वय ११), अशी मृतांची नावे आहेत. याशिवाय सहा महिन्यांच्या चिमुकलीचा देखील अपघातात मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या दुचाकीवरील भगवान आव्हाड हे जखमी झाले आहेत. अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. (Latest Marathi News)

नागरिकांचा रोष पाहताच कंटेनर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, मृत पवार कुटुंबीय वडगाव सावताळ (ता. पारनेर, जि. अहमदनगर) येथील रहिवासी होते. रविवारी कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर एकाच स्कूटीवरून ते घरी परतत होते.

दरम्यान, सायंकाळच्या सुमारास पांढरी पूल परिसरात पवार कुटुंब आले असता, पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनरने त्यांच्या स्कूटीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये पवार कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर-संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात होत आहेत. शुक्रवार (२६ जानेवारी) देखील महामार्गावर झालेल्या अपघातात सहाजण जखमी झाल्याची घटना घडली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Serial: 'सावळ्याची जणू सावली' मालिकेत नवा ट्विस्ट; 'मन धावतंया'फेम राधिका भिडेची होणार एन्ट्री

Mumbai Metro Line 8 : मुंबई - नवी मुंबई एअरपोर्ट मेट्रो-८ द्वारे जोडणार, गोल्डन लाईनवर कोणती २० स्थानके असणार? नावं आली समोर

Pista Kulfi Recipe: घरच्या घरी झटपट बनवा हॉटेल स्टाईल टेस्टी पिस्ता कुल्फी रेसिपी

WhatsApp Update: WhatsApp हॅक होण्याचा धोका संपला! 'हे' नवीन फिचर आत्ताच करा ऑन, वाचा संपूर्ण माहिती

Maharashtra Live News Update: छगन भुजबळ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT