Thorat Vs Vikhe 
महाराष्ट्र

Ahmednagar Politics: थोरात यांचे संगमनेर विखेंच्या रडारवर? सुजय विखे बाळासाहेब थोरातांना आव्हान देणार?

Girish Nikam

दक्षिण नगरच्या बालेकिल्ल्यात लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आता सुजय विखे पाटील विधानसभेच्या रणांगणात उतरण्याची तयारी करत असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे आपले पारंपरिक राजकीय शत्रू असलेल्या थोरातांच्या विरोधातच दंड थोपटण्याचे संकेत स्वत: सुजय विखेंनी दिले आहेत. भाजपच्या वाट्याला जागा आली तर संगमनेरमधून निवडणूक लढण्यास आवडेल असं सुजय विखेंनी म्हटलंय.

संगमनेर हा थोरातांचा गड मानला जातो. कारण ते इथून कधीही पराभूत झालेले नाहीत. थोरात संगमनेर मतदारसंघातून 1985 पासून 2019 पर्यंत असे सलग आठ वेळा निवडून आले आहेत. 2004 मध्ये थोरात कुटुंबातील पुढची पिढी राजकारण येईल अशी चर्चा आहे. थोरातांची कन्या जयश्री थोरात राजकारणात एन्ट्री करणार निवडणूक लढवणार अशी चर्चा काही महिन्यांपासून आहे.

जयश्री थोरात यांच्या पुढाकाराने नुकताच संगमनेर शहरात भव्य महिला मेळावा पार पडला. त्यामुळे जर जयश्री थोरात मैदानात उतरल्या तर थोरात - विखे घराण्याची दुसरी पीढी आमनेसामने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे संगमनेरमध्ये विखे-थोरातांमध्ये सामना रंगणार का? याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT