Sujay Vike vs Nilesh Lanke saam Tv
महाराष्ट्र

Ahmednagar Politics: निलेश लंकेंची खासदारकी धोक्यात? विखेंच्या मागणीला निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील

Sujay Vike vs Nilesh Lanke: अहमदनगरमधील शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने सुजय विखे-पाटील यांच्या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणीला मंजुरी दिलीय, यामुळे लंके यांची खासदारकी धोक्यात आलीय.

Tanmay Tillu

लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सुजय विखे पाटलांनी अहमदनगर जिल्ह्यातील 40 मतदान केंद्रांवर संशय घेत आक्षेप नोंदवला होता. मतदान केँद्रांवरील EVM आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी त्यांनी केली होती, हीच मागणी आयोगानं मान्य केलीये त्यामुळे लंकेंच्या खासदारकीचं काय होणार असा सवाल उपस्थित होतो.

अहमदनगर लोकसभा निवडणुकीत महायुतीचे पराभूत उमेदवार सुजय विखे पाटील यांनी EVMच्या पडताळणीची मागणी केली होती. ही मागणी मान्य करण्यात आल्यानं आता खासदार निलेश लंकेंचं टेन्शन वाढलंय.. सुजय विखे पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी होणार आहे. या पडताळणीत काही उलटफेर झाल्यास लंकेंची खासदारकी धोक्यात येणार का असा सवाल उपस्थित होतोय. दरम्यान ही मोजणी आणि पडताळणी कशा पद्धतीने होणार आहे हे जाणून घेऊ.

असा होईल मॉकपोल

ईव्हीएम बनवलेल्या कंपनीचे अधिकारी मशीनची तांत्रिक तपासणी करतील.

आक्षेप घेतलेल्या 40 मतदानयंत्रांची मेमरी रिकामी केली जाईल.

यानंतर व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मशीनवरील मतांची पडताळणी होईल.

एका मशीनमध्ये प्रत्येकी 1 ते 1400 मतं टाकता येईल.

ही संपूर्ण प्रक्रिया सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली पार पडेल.

अहमगनगरचं राजकारण नेहमीच विखे घराण्याभोवती राहिलंय. भाजपनं राधाकृष्ण विखे पाटलांना गळाला लावलं. त्यानंतर भाजपच्याच तिकीटावर 2019 मध्ये सुजय विखें पहिल्यांदा खासदार झाले होते. मात्र या निवडणुकीत त्यांचा 28 हजार 929 मतांनी पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांनी पराभव केला होता.त्यानंतर विखेंनी 40 मतदान केंद्रावरील EVM आणि VVPAT मशीनची पडताळणी करण्यासाठी जिल्हा निवडणूक विभागाकडे अर्ज केला होता. नेमक्या कोणत्या मतदान केंद्रावरील पडताळणीची मागणी केलीय ते पाहूयात.

यात अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील श्रीगोंदा येथील 10, पारनेर 10, नगर 5, शेवगाव-पाथर्डी 5 , कर्जत- जामखेड 5, राहुरी येथील 5 अशा 40 केंद्रांवरील मतदान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी केली. नगरच्या राजकारणात या घटनेनं मोठा ट्विस्ट आलायं. ईव्हीएम पडताळणीत काय निकाल समोर येतो त्यावर दोघांचं भवितव्य अवलंबून असणार आहे. 1991 ची पुनरावृत्ती होणार की यंदा लंकेंची खासदारकी धोक्यात येणार याचीच उत्सुकताय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

Horoscope Sunday : कर्कच्या कामाचे कौतुक! धनु राशीच्या इच्छा पूर्ण होणार! पाहा, तुमचे राशिभविष्य

Anant Chaturdashi 2025 live updates : नागपुरातील दक्षिणामूर्ती गणेश मंडळाचा गणपती बडकस चौकात पोहचणार

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

SCROLL FOR NEXT