महाराष्ट्र

Ahmednagar Politics: नगरमध्ये भाजपचा वाद चव्हाट्यावर; 'विखे महादेवाच्या पिंडीवरील विंचू', राजेंद्र पिपाडांची टीका

Ahmednagar Politics: नगरमध्ये भाजपचा वाद चव्हाट्यावर आलाय. शिर्डी विधानसभेसाठी इच्छूक असलेल्या भाजपच्या राजेंद्र पिपाडांनी विखेंवर जहरी टीका केलीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीपूर्वी अहमदनगर भाजपमधील वाद चांगलाच उफाळून आलाय. शिर्डी विधानसभेसाठी इच्छूक असलेल्या भाजपच्या राजेंद्र पिपाडांनी विखे पिता-पूत्रावर गंभीर आरोप करत चांगलंच तोंडसूख घेतलंय. एवढंच नाही तर विखे पाटील हे महादेवाच्या पिंडीवर बसलेला विंचू आहे, असं म्हणत हल्लाबोल केलाय.

2009 च्या विधानसभा निवडणूकीत राजेंद्र पिपाडांनी राधाकृष्ण विखेंना जोरदार टक्कर दिली होती. त्यावेळी पिपाडांचा अवघ्या 13 हजार मतांनी पराभव झाला होता. मात्र 2019 मध्ये राधाकृष्ण विखे आणि राजेंद्र पिपाडा या कट्टर विरोधकांमध्ये मनोमिलन घडवण्यात फडणवीसांना यश आलं होतं. मात्र लोकसभेला शिर्डी आणि अहमदनगर दक्षिण लोकसभेत पराभव झाल्यानंतर बॅकफूटवर गेलेल्या विखेंना पिपाडांनी आव्हान दिलंय. मात्र यावर विखेंनी सध्य़ातरी मौन बाळगलंय.

2019 च्या विधानसभा निवडणूकीनंतर जिल्ह्यातील 5 जागा पाडण्यामागे विखे असल्याचा आरोप राम शिंदेंसह भाजपच्या एका गटाने केला होता. मात्र आता लोकसभेतील पराभवानंतर पिपाडांच्या हाती आयतंच कोलित मिळालंय. तर दुसरीकडे शिर्डी विधानसभेतून पून्हा विखेच दावेदार असल्याने पिपाडांनी थोरातांच्या माध्यमातून फिल्डिंग लावायला सुरुवात केलीय. त्यामुळे पिपाडांच्या आरोपांवर भाजपचं नेतृत्व काय निर्णय घेणार? यावर विखेंची कोंडी होणार की विधानसभेचा मार्ग मोकळा होणार? हे स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra : राष्ट्रवादीसोडून १४ जण भाजपच्या वाट्यावर, यादी पाहून अजित पवार नाराज; मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली खंत

Special Railway Trains: ख्रिसमस आणि नवीन वर्षानिमित्त १३८ स्पेशल ट्रेन, ६५० फेऱ्या; रेल्वे मंत्रालयाचा निर्णय

Maharashtra Live News Update: मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींचा हप्ता लांबणीवर जाणार; जानेवारीत खात्यात ₹४५०० जमा होण्याची शक्यता

Panchag Today: आजचा दिवस बदल घडवणारा! या 4 राशींवर नशीब होणार मेहरबान

SCROLL FOR NEXT