Pravara River SDRF Boat Accident Saam TV
महाराष्ट्र

Pravara River : प्रवरा नदीत SDRF जवानांची बोट नेमकी कशामुळे बुडाली? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला घटनेचा थरार

Pravara River SDRF Boat Accident : प्रवरा नदीत SDRF जवानांची बोट बुडाल्याची घटना नेमकी कशी घडली? पोहण्यात तरबेज असलेल्या जवानांना पाण्याबाहेर का पडता आलं नाही? याबाबत प्रत्यक्षदर्शींनी धडकी भरवणारा प्रसंग सांगितला.

Satish Daud

उजनी धरणात बोट बुडून ६ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच अहमदनगर जिल्ह्यातही बोट बुडाल्याची घटना घडली. प्रवरा नदीत बुडालेल्या तरुणांचा शोध घेण्यासाठी SDRF पथकाचे जवान गेले होते. शोधकार्य करत असताना अचानक त्यांची बोट उलटली. या घटनेत तीन जवानांचा बुडून मृत्यू झाला. तर बोटीवर असलेला एक स्थानिक बेपत्ता असल्याची माहिती आहे. त्याचा शोध घेणे सुरू आहे.

पाण्यात बुडालेल्या तरुणांचा शोध घेण्यासाठी गेलेले जवानच बुडाल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, ही घटना नेमकी कशी घडली? पोहण्यात तरबेज असलेल्या जवानांना पाण्याबाहेर का पडता आलं नाही? याबाबत प्रत्यक्षदर्शींनी धडकी भरवणारा प्रसंग सांगितला.

नदीतील घटना नेमकी काय?

अकोले तालुक्यातील सुगाव गावाजवळ प्रवरा नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. बुधवारी (ता २२) दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या तरुणांचा शोध घेण्यासाठी स्थानिक प्रशासनाने SDRF च्या टीमला बोलवलं होतं. जेव्हा जवान पाण्यात उतरले तेव्हा त्यांची बोट उलटली. यात ५ जण बुडाले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. एकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

SDRF जवानांची बोट नेमकी कशामुळे बुडाली?

प्रवरा नदीत SDRF जवानांची बोट बुडाल्याचा थरार सुगाव गावाचे पोलीस पाटील राजेंद्र शिंदे यांनी आपल्या डोळ्यादेखत पाहिला. घटनेबाबत माहिती देताना राजेंद्र शिंदे म्हणाले, "नदीपात्रात बुडालेल्या तरुणांचा शोध घेण्यासाठी सकाळी ६ वाजता SDRF चे पथक गावात आले. साडेसहा वाजेच्या सुमारास त्यांनी शोधमोहिम सुरू केली".

"SDRF टीमच्या दोन बोटी तरुणांचा शोध घेण्यासाठी पाण्यात उतरल्या. पण यातील एक बोट पाण्याच्या भोवऱ्यात सापडली. काही क्षणातच ही बोट उलटली. दुसरी बोट पाण्यात चकरा मारत होती. बुडालेल्या बोटीतील जवान पोहण्याचा प्रयत्न करीत होते. पण पाण्याच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे त्यांना वर येता आलं नाही. दुसरी बोट मदतीसाठी जाण्याआधीच ते बुडाले", अशी माहिती पोलीस पाटील राजेंद्र शिंदे यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परशुराम घाटा गॅबियन वॉलला तडे, दरड कोसळण्याची भीती

नाश्त्यासाठी झटपट बनवा मक्याचा उपमा; चवदार आणि पौष्टिक

Solapur : "वडिलांची प्रकृती माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची..", सैराट फेम अभिनेत्याने डिलीट केलेल्या व्हिडिओबद्दल दिलं स्पष्टीकरण

Sambhajinagar: संभाजीनगरमध्ये FDA ची मोठी कारवाई, सिद्धेश्वर दूध डेअरीवर धाड; ३५०० लिटर दूध पावडर जप्त

Shreyas Iyer: टर्निंग पॉइंट की ब्लंडर? श्रेयस अय्यरच्या एका चुकीने भारताने गमावला सामना; कर्णधाराने कोणावर फोडलं पराभवाचं खापर?

SCROLL FOR NEXT