Protest at Ahmednagar's Shevgaon Area For Water Saam tv
महाराष्ट्र

Shegaon News: शेवगावमध्ये १५ दिवसांनी पाणी; नगरपरिषदेसमोर महिलांचे मुक्काम ठोको आंदोलन

Ahmednagar's Shegaon Water Supply News: सध्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. मात्र नगर जिल्ह्यातील शेवगाव शहरवासियांना १० ते १५ दिवसांनी पाणी मिळत आहे.

Rajesh Sonwane

सुशील थोरात
अहमदनगर
: पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने नागरिक आक्रमक झाले. यामुळे शेवगाव नगरपरिषद समोर पिण्याच्या पाण्यासाठी महिलांनी अनोखा असे मुक्काम ठोको आंदोलन करण्यात येत आहे. तर येत्या काळात पाण्यासाठी संघर्ष पेटण्याची चिन्ह आहे. 

सध्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. मात्र नगर जिल्ह्यातील (Shevgaon) शेवगाव शहरवासियांना १० ते १५ दिवसांनी पाणी मिळत आहे. यामुळे नगरपरिषद कार्यालयासमोर महिलांनी मुक्काम ठोको आंदोलन सुरू केल आहे. जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य हर्षदा काकडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या आंदोलनात महिला सहभागी झाल्या. शहरात नियमित आणि पुर्ण दाबाने (Water Shortage) पाणीपुरवठा व्हावा, ८७ कोटी २० लाख रुपये मंजुरीची नवीन पाणीपुरवठा योजना तात्काळ सुरु व्हावी, शहरातील अंतर्गत रस्ते, सांडपाणी व्यवस्था आणि विद्युतीकरण त्वरीत व्हावे; अशा मागण्या कृती समितीच्या आहे.

चूल मांडून बनवताय भाकरी 

विशेष म्हणजे आंदोलकांनी नगरपरिषद समोरच चूल मांडून भाकरी बनवण्यास सुरुवात केली आहे. (Ahmednagar) जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत नगरपरिषद कार्यालयासमोर मुक्काम ठोकला जाईल; असा इशारा आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या हर्षदा काकडे यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनांंच्या रांगा

प्रियकरासाठी पतीला विजेचा शॉक, अनैतिक संबंधात अडसर, पत्नीनं रचला कट

Cancer Care: मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! नव्या कॅन्सर सेंटरचे लोकार्पण; उपचारासाठी आता दूर जाण्याची गरज नाही

तुमची सबसिडी जाणार, सिलेंडर महागणार? सरकार सबसिडी बंद करण्याच्या तयारीत?

Petrol-Diesel: देशात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा? PM मोदींच्या आवाहनानंतर केंद्र सरकारने दिली महत्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT