Ahmednagar News Saam tv
महाराष्ट्र

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये डेंग्यूने पसरले पाय; शहरात डेंग्यूचे १५ रुग्ण

Ahmednagar News : सध्या पावसाळ्याचे दिवस असून मागील काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. शिवाय वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे साथरोग पसरत आहे

Rajesh Sonwane

सुशील थोरात 
अहमदनगर
: अहमदनगर शहरासह जिल्हाभरात डेंग्यू रुग्ण संख्येत वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अहमदनगर शहराचा विचार केला; तर शहरात सध्या डेंग्यूचे १५ रुग्ण आहेत. या पार्श्वभूमीवर अहमदनगर मनपा आरोग्य विभाग सतर्क झाले असून प्रत्येक प्रभागात धूर फवारणी, स्वच्छता याकडे लक्ष दिले जात आहे

सध्या पावसाळ्याचे दिवस असून मागील काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. शिवाय वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे साथरोग पसरत आहे. दरम्यान (Dengue) डेंग्यूने देखील पाय पसरण्यास सुरवात केली असून आता (Ahmednagar) अहमदनगरमध्ये देखील डेंग्यूच्या रुग्ण संख्येत वाढ होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. सध्या अहमदनगर शहरात १५ डेंग्यूचे रुग्ण असून अनेक डेंग्यू सदृश्य आजाराने ग्रस्त आहेत. यामुळे महापालिका प्रशासन अलर्ट झाली आहे. 

मनपासोबतच काही सामाजिक संस्था देखील साथीचे आजार वाढू नये; यासाठी प्रयत्न करत आहेत. यात आमदार संग्राम जगताप यांच्या सामाजिक संस्थेचा पुढाकार पाहायला मिळत आहे. शहरात फवारणी आणि जनजागृतीचे काम सुरू आहे. डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यासाठी मनपा आरोग्य विभागाने अतिरिक्त ५० जणांचे मनुष्यबळ सोबत घेऊन परिसरात स्वच्छतेसह इतर उपाय योजना सुरू केल्या. तसेच आठवड्याच्या प्रत्येक रविवारी नागरिकांना सोबत घेऊन देखील स्वच्छता केली जात आहे. दरम्यान नागरिकांना कोणत्याही प्रकारचा ताप आला असेल तर मनपाच्या सात आरोग्य केंद्रावर तातडीने जाऊन तपासणी करून घेण्याचे आवाहन अहमदनगर मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ अनिल बोरगे यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Watch: धक्कादायक! खेळताना बास्केटबॉलचा पोल अंगावर कोसळला; खेळाडूचा जागीच मृत्यू

Monkey: माकडांना पकडा अन् ६०० रुपये मिळवा; राज्य सरकारकडून निर्देश जारी

Maharashtra Live News Update: श्री क्षेत्र जेजुरी गडावर चंपाषष्टी उत्सवानिमित्त भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी

Winter Skin Care : हिवाळ्यात मेकअप कसा टिकवावा? जाणून घ्या टिप्स

Gold Rate Today: सोन्याचे दर पुन्हा वाढले; १० तोळ्यामागे ८६०० रुपयांची वाढ; वाचा आजचे भाव

SCROLL FOR NEXT