Ahmednagar News Saam tv
महाराष्ट्र

Ahmednagar News : ग्रुप ग्रामपंचायतमधून खर्डा गाव वगळावे म्हणून गाव बंद

ग्रुप ग्रामपंचायतमधून खर्डा गाव वगळावे म्हणून गाव बंद

साम टिव्ही ब्युरो

सुशील थोरात
अहमदनगर
 : जामखेड तालुक्यातील  खर्डा ग्रामपंचायत विभाजनाच्या मागणीसाठी खर्डा येथील सर्वपक्षीय युवक (Ahmednagar) आक्रमक झालेआहेत. विभाजनाच्या मागणीसाठी आज खर्डा बंदची हाक देण्यात आली असून गावातील व्यापारी आणि (Gram Panchayat) ग्रामस्थांनी या बंदला उत्स्फूर्तपणे पाठिंबा देत संपूर्ण गाव शंभर टक्के बंद ठेवले आहे. (Live Marathi News)

जामखेड तालुक्यातील खर्डा ही सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील खर्डा शहर व सहा वाड्यांसाठी ही एक ग्रुप ग्रामपंचायत आहे. खर्डासह तब्बल पाच महसुली गावे या ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट आहेत. ग्रामपंचायत विभाजनाची मागणी फार जुनी आहे. प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊनही प्रशासन (Jamkhed News) यावर कारवाई करत नसल्याने अखेर गावातील सर्वच पक्षी नेत्यांनी आणि ग्रामस्थांनी या बंदची हाक दिली होती.  मागील आठवड्यात ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीमध्ये सत्ताधारी सदस्यांनी विभाजनाच्या निर्णयाबाबत घूमजाव केले. या प्रकाराच्या निषेधार्थ आक्रमक तरुणांनी एकत्र येत ग्रामपंचायतीला टाळे ठोकून रविवारी गाव बंदची हाक दिली होती. 

विकासावर प्रतिकूल परिणाम 

दोन वेळा आवश्यक कारवाई करूनही विभाजन झाले नाही. १७ ग्रामपंचायत सदस्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये येणाऱ्या या ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गतच्या दरडवाडी, पांढरेवाडी, गितेवाडी, गवळवाडी, नागोबाचीवाडी, मुंगेवाडीसह खर्डा शहर या सातही गावांच्या विकासावर याचा प्रतिकूल परिणाम होत असल्याने एकत्र ग्रामपंचायत विभाजनाची मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! अण्णा हजारेंची तब्येत अचानक खालावली; मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल, पाहा हेल्थ अपडेट

Indian Railways: भारतातील ही 3 स्टेशनं मानली जातात सर्वात घाणेरडी, पाहा तुमच्या जवळचं स्टेशन आहे का यादीत?

NCMC Card : आजपासून नियम बदलला! 'या' महिलांचा अर्ध्या तिकिटाचा प्रवास बंद; घ्यावे लागणार पूर्ण तिकीट, वाचा सविस्तर

Chutney For Cholesterol: नसांमध्ये घाणेरड्या कोलेस्ट्रॉलचा थर साचतोय? रोजच्या आहारात फक्त 'ही' एक चटणी खा

Maharashtra News Live Update: मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य प्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT