Online Order Froud
Online Order FroudSaam tv

Online Order Froud : ऑनलाइन कॅमेरा मागवला मिळाला साबण; पोलिसात गुन्हा दाखल

ORDER FROUD ऑनलाइन कॅमेरा मागवला मिळाला साबण; पोलिसात गुन्हा दाखल
Published on

Khalapur : : ॲमेझॉन ॲपवरून ६० हजार रुपये किमतीचा कॅमेरा मागवला असता त्याजागी साबण, बॅटरी, चार्जर व इतर वस्तू आल्याचा धक्कादायक (Online Fraud) प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे त्या वस्तू बदलवून (Fraud) देण्यास देखील कंपनीने नकार केला आहे. (Latest Marathi News)

Online Order Froud
Jalgaon Accident News : सुसाट कारचे टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून कार उलटली; महामार्गावरील थरार

प्रशांत लेंडवे या तरुणाने ॲमेझॉन ॲपवरून कॅनोन एम फिफ्टी मार्क टू या कंपनीचा कॅमेरा ऑनलाईन हप्त्यावर खरेदीसाठी ऑर्डर दिली. सायंकाळी आल्यावर आलेले पार्सल खोलून पाहिले असता त्यात सर्फ एक्सेल कंपनीचा साबण, कॅनन कंपनीचा बॅटरी चार्जर, चार्जर केबल, कॅनोन कंपनीची कॅमेरा कॅरिअर रस्सी आणि स्टील फ्लेक्सिबल पाईप अश्या वस्तू मिळून आल्या. 

Online Order Froud
Jalgaon Heavy Rain : मुक्ताईनगर, रावेर तालुक्यात पूरस्थिती; पूल वाहून गेला; सुकी नदीपात्रात युवक बेपत्ता

पोलिसात तक्रार 

याप्रकरणी ॲमेझॉनच्या ग्राहक केंद्राला तक्रार केली असता ऑर्डर परत मिळणार नसल्याचे सांगण्यात आले. यामुळे  तरुणाने कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com