अहमदनगर जिल्हा हादरला! विहिरीत आढळले आईसह तीन चिमुकल्यांचे मृतदेह SaamTvNews
महाराष्ट्र

अहमदनगर जिल्हा हादरला! विहिरीत आढळले आईसह तीन चिमुकल्यांचे मृतदेह

हि सामूहिक आत्महत्या आहे की हत्या याचा तपास पोलीस करत आहे.

गोविंद साळुंके

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर (Sangamner) तालुक्यातील कोठे खुर्द (Kothe Khurd) गावातील एका विहीरीत आईसह दोन मुली व एका चिमुकल्याचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. कालच राहुरीच्या देवळाली प्रवरा येथे बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह गावातील बारव मध्ये आढळून आला होता. तर आज संगमनेर तालुक्यातील कोठे खुर्द गावातील विहिरीत आई सह तीन चिमुकल्यांचा मृतदेह आढळून आल्याने अहमदनगर (Ahmednagar) जिल्हा हादरला आहे. (Sangamner Kothe Khurd Latest News)

हे देखील पहा :

कोठे खुर्द गाव परिसरात असलेल्या खांडगेदरा येथे बाळासाहेब गणपत ढोकरे, व पत्नी स्वाती बाळासाहेब ढोकरे, हे आपल्या दोन मुली आणि एका वर्षाच्या मुलासोबत राहत होते. मात्र, आज स्वाती ढोकने हिच्या सह तीन चिमुकल्यांचे मृतदेह आढळून आले. या घटनेने अहमदनगर जिल्हा हादरला आहे.

घटनेची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत नागरिकांच्या मदतीने चारही मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. या घटनेने कोठे खुर्द गावावर शोककळा पसरली असून नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत. हि सामूहिक आत्महत्या (Suicide) आहे की हत्या (Murder) याचा तपास पोलीस करत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cholesterol: नारळाच्या दुधामुळे वाढतो हार्ट अटॅकचा धोका? कोलेस्टेरॉलवरही होतो 'हा' परिणाम, जाणून घ्या सत्य

Bigg Boss Marathi 6: 'तुला शिव्यांची सवय आहे, मला नाही...'; प्राजक्ता-अनुश्रीची कॅट फाईट, प्रोमो व्हायरल

Valentine Special : व्हॅलेंटाइन स्पेशल घरच्या घरी बनवा टेस्टी चॉकलेट्स, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: अकोला महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या शारदा खेडकर यांची निवड

Shocking : शाळेत भयंकर घडलं, विद्यार्थिनीला अंगावर वळ उमटेपर्यंत अमानुष मारहाण; धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT