Ahmednagar Pathardi Teacher Transfer News Saam TV
महाराष्ट्र

Ahmednagar News: शिक्षकाची १२ वर्षांनी बदली, विद्यार्थीच नाही तर अख्खं गाव रडलं; हृदयस्पर्शी VIDEO

Pathardi Teacher Transfer News: गुरू शिष्याचं नातं काय असते, याचा प्रत्यय पाथर्डी तालुक्यातील भारजवाडीतील हनुमाननगर शाळेत आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

सुशील थोरात, साम टीव्ही

Ahmednagar Pathardi Teacher Transfer News: गुरू शिष्याचं नातं काय असते, याचा प्रत्यय पाथर्डी तालुक्यातील भारजवाडीतील हनुमाननगर शाळेत आला आहे. आपल्या लाडक्या शिक्षकाना निरोप देत असताना केवळ विद्यार्थीच नाही तर पालकांच्याही डोळ्यात अश्रू होते. जवळपास 12 वर्षाचा जिव्हाळा एका क्षणात संपणार आणि आपले लाडके शिक्षकाला आपल्याला सोडून जाणार हे दुःख चिमुकल्याच्या डोळ्यात दिसत होते. (Latest Marathi News)

पाथर्डी तालुक्यामध्ये (Ahmednagar) भगवानगडाच्या पायथ्याशी असलेले भारजवाडी छोटेसे ऊसतोड कामगारांचे गाव आहे. या गावामधील 95% पेक्षा जास्त लोक ऊस तोडण्यासाठी चार ते सहा महिने घरापासून दूरच असतात.

त्यामुळे बऱ्याच लहान चिमुकल्यांना शिक्षणाची गैरसोय असल्यामुळे पालक त्यांच्यासोबत ऊस तोडण्यासाठी कारखान्यावर घेऊन जात असत. पाठीमागे मुलांचे म्हातारे आजी आजोबा घरी असतात. परंतु लहू बोराटे या शिक्षकाने (Teacher) जिल्हा परिषदेच्या हनुमान नगर वस्ती आणि भारजवाडी या गावची मागच्या 12 वर्षांमध्ये पूर्ण दशाच बदलून टाकली.

येथील पालकांना आणि मुलांना विश्वासात घेऊन शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन आणि स्वतःवर या सर्व मुलांची जबाबदारी घेत लहू बोराटे यांनी 2010 साली हा प्रवास सुरू केला. ज्यावेळी त्यांनी शाळेत प्रवेश केला त्यावेळी केवळ 20 पटसंख्या असलेल्या या शाळेत बोराटे यांच्या प्रयत्नांतून 54 पटसंख्या झाली.

कधी झाडाखाली तर कधी निसर्गामध्ये तर कधी खेळण्यामधून अशा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये शिक्षणामध्ये आवड करून देऊन शिक्षणामुळे तुम्ही आणि तुमच्या दहा पिढ्या कशा प्रकारे सुखी समृद्धी राहू शकतात, याबाबत मुलांना आणि पालकांना प्रेरित केलं.

मात्र बोराटे सरांची बदली झाल्याने हनुमान नगर वस्तीवरील भारजवडी गावातील ग्रामस्थांनी या शिक्षकांना निरोप दिला. निरोप देताना सर्वच पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या डोळ्यांमध्ये अक्षरशः पाण्याच्या धारा वाहत होत्या.

आजपर्यंत अशा प्रकारचा निरोप एखाद्या शिक्षकाला कधीच भेटला नसेल. प्रत्येक शिक्षकाचे स्वप्न असेल की मलाही अशाच प्रकारचा निरोप भेटायला पाहिजे. बोराटे सर यांची सध्या जामखेड तालुक्यातील धनगर वस्ती शाळेवर बदली झाली मात्र त्यांच्या निरोप समारंभाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी येत आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: मतभेदांपेक्षा महाराष्ट्र महत्वाचा; भर सभेत राज ठाकरे यांची भावनिक साद

kiwi Benefits: किवी फळाचे असंख्य फायदे!

VIDEO : पावसात सभा झाल्यावर निवडून येतात; भाषणावेळी पाऊस आला, फडणवीसांचा शरद पवारांना टोला

Champions Trophy: टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाण्यास नकार का दिलाय? समोर आलं खरं कारण

Kalyan News : कल्याण-डोंबिवलीत ४० जण तडीपार; ऐन निवडणुकीत पोलिसांची धडक कारवाई

SCROLL FOR NEXT