Maharashtra Rain Alert: राज्यासाठी पुढील ७२ तास महत्वाचे! मुंबई कोकणासह या जिल्ह्यांमध्ये धो धो बसणार; हवामान खात्याचा अंदाज

Monsoon Rain Alert: मान्सूनच्या पावसाची आतुरतेने वाट पाहत असलेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे.
Maharashtra Monsoon Rain Alert
Maharashtra Monsoon Rain AlertSaam TV
Published On

Maharashtra Monsoon Rain Alert: मान्सूनच्या पावसाची आतुरतेने वाट पाहत असलेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे रडखडलेल्या मान्सूनला येत्या काही दिवसांत पुन्हा गती मिळण्याची शक्यता आहे.

मोसमी वाऱ्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी सध्या पोषक स्थिती निर्माण झाली असून पुढील दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. (Latest Marathi News)

Maharashtra Monsoon Rain Alert
Cat vs Cobra Snake Fight: किंग कोब्रा आणि मांजराची जोरदार फाईट, वातावरण टाईट; कोण जिंकलं? पाहा VIDEO

दरवर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात मान्सून (Monsoon Update) उशीरा दाखल झाला होता. ११ जून रोजी कोकणात मान्सूनचे आगमन झाले होते. त्यानंतर १५ जुलै रोजी मान्सून राज्यभरात पोहचणार होता. मात्र, अरबी समुद्रात तयार झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळाने मान्सूनला मोठा फटका दिला.

मान्सून अचानक थांबल्यामुळे शेतकरी (Farmers) वर्गांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांची कामं खोळंबल्याचे चित्र दिसत आहे. सध्या मृग नक्षत्र सुरु आहे. अद्यापही या नक्षत्रात पाऊस झाला नाही. पेरणीसाठी शेतकरी पावसाची वाट बघत आहेत. मात्र, पावसानं दडी मारल्यानं बळीराजा चिंतेत आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात आगमन रखडलेल्या मान्सूनला येत्या काही दिवसांत पुन्हा गती मिळण्याची शक्यता आहे. मोसमी वाऱ्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी सध्या पोषक स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे पुढील तीन दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाच्या मुंबई आणि नागपूर केंद्राने वर्तवला आहे.

येत्या ७२ तासांत या जिल्ह्यांमध्ये कोसळणार पाऊस

पुढील तीन दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल. त्यामुळे मुंबई, कोकण मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस (Rain Updates) कोसळणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्याचबरोबर अहमदनगर, सातारा, सांगली, बीड, सोलापूर, लातूर, नांदेड, जालना, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com