Ahmednagar News Saam tv
महाराष्ट्र

Ahmednagar News : विद्यार्थ्यांना घेऊन ग्रामस्थांनी पंचायत समितीत भरवली शाळा; शिक्षक हजर होत नसल्याने पालक संतप्त

Ahmednagar News : पालकांकडून आणि ग्रामपंचायतकडून पाठपुरावा करूनही गावातील शाळेत शिक्षक हजर होत नसल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी श्रीगोंदा येथील पंचायत समिती कार्यालयातच विद्यार्थ्यांची शाळा भरवली

Rajesh Sonwane

सुशील थोरात

अहमदनगर : जिल्हा परिषदेमार्फत जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया राबवून शिक्षकांची नियुक्ती केली. नियुक्ती आदेश (Zp School) दिल्यानंतर दोन महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर देखील शिक्षक अद्याप शाळेत हजार झालेला नाही. यामुळे संतप्त पालकांनी विद्यार्थाना घेऊन (Shrigonda News) श्रीगोंदा पंचायत समितीतच शाळा भरविली. (Latest Marathi News)

अहमदनगरच्या (Ahmednagar) श्रीगोंदा येथे खांडगाव वडघूळ येथील ग्रामस्थांनी गावातील शाळकरी विद्यार्थ्यांची पंचायत समितीमध्ये शाळा भरवली आहे. दोन महिन्यापूर्वी जिल्हा अंतर्गत शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये बदली होऊन आलेल्या शिक्षक शाळेत हजर न झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पालकांकडून आणि ग्रामपंचायतकडून पाठपुरावा करूनही गावातील शाळेत शिक्षक हजर होत नसल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी श्रीगोंदा येथील पंचायत समिती कार्यालयातच विद्यार्थ्यांची शाळा भरवली आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शिक्षकांवर कारवाईची मागणी 

पंचायत समितीत आलेल्या ग्रामस्थांनी शिक्षण विभागाकडून बदली होऊनही हजर न होणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करावी; अशी मागणी केली आहे. याच बरोबर गावात हजर होतील अशा शिक्षकांची नियुक्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परळीच्या निवडणुकीमध्ये न्यायालयाकडून शरद पवार गटाला मोठा दिलासा

Supreme Court: निवडणुका रद्द करू नाहीतर निकाल आम्ही देऊ: सर्वोच्च न्यायालय

मुलगी झाली म्हणून सासरकडून छळ; आयुष्य 'नकोसे' झाल्यानं महिलेने संपवली जीवनयात्रा

Navi Mumbai : अलिबाग, गोव्यापेक्षाही सुंदर आहे नवी मुंबईतील 'हा' समुद्रकिनारा

T20 World Cup 2026 Schedule : टी २० वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर; या दिवशी क्रिकेटचा महाकुंभमेळा होणार सुरू, रोहित शर्माकडं मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT