सुशील थोरात
अहमदनगर : अहमदनगरला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरून राज्य सरकारला धारेवर धरले. राज्य सरकारचा गुन्हेगारावरचा धाक संपलेला असल्याचे त्यांनी म्हटलंय. तर सत्ताधारीच गुन्हेगार झाले आहे. न्याय कोणाला मागायचा असा खोचक सवाल बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केला आहे. भाजपचा (BJP) आमदार मुख्यमंत्र्यांवर आरोप करतो. याचा मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली. (Maharashtra News)
अहमदनगर (Ahmednagar) येथे आयोजित पत्रकार परिषदेत आमदार बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी चर्चा केली. राज्य शासन अपयशी ठरले आहे. हे तीन लोक झाले असून एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री होण्याची इच्छा असलेले अशी उपरोधीक टीका त्यांनी केली. निवडणूक आयोगाच्या (NCP) राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्णयानंतर काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सत्ताधाऱ्यावर निशाणा साधला आहे. कुणी पक्ष बदलला तर असं सांगत नाही, की स्वतःच्या हितासाठी पक्ष बदलला हा माझा राजकीय हेतू होता. ते सगळे जनतेचेच हित सांगत असतात पण जनता सुद्धा दूधखुळी नाही. एखाद्या पारावरच्या इसमाला सांगितलं खरी शिवसेना कोणाची खरी राष्ट्रवादी कोणाची तो जे उत्तर देईल तो खरा न्याय.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
काँग्रेस शिर्डीच्या जागेसाठी आग्रही
लोकसभा निवडणुकीत (Congress) काँग्रेस पक्ष हा अहमदनगर दक्षिण मतदार संघासाठी नव्हे तर शिर्डीच्या जागेसाठी आग्रही आहोत. आमची चर्चा सुरु आहे. ते म्हणतात आमच्याकडे उमेदवार आहे आम्ही म्हणतो आमच्यकडे उमेदवार आहे. मात्र शेवटी जो निर्णय होईल; त्या पद्धतीने आघाडीचे नेते आणि पदाधिकारी काम करतील; असे मत काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.
भाजप जिंकण्यासाठी काहीही करू शकते
भाजप निवडणुका जिंकण्यासाठी काहीही करू शकतो. ईव्हीएममध्ये घोटाळा देखील करू शकतात. यावर आपला विश्वास बसत नव्हता. मात्र चंदिगड येथे झालेल्या महापौर निवडणुकीमध्ये ईव्हीएमबाबत छेडछाड झाली. सुप्रीम कोर्टाने देखील यावर ताशेरे ओढले आहेत. यावरून निश्चितच ईव्हीएममध्ये घोटाळा करता येऊ शकतो. यावर आपला विश्वास बसला असल्याचं थोरात यांनी म्हटलं आहे.
काँग्रेसला कोणी सोडून गेला म्हणून काहीही थांबत नाही
काँग्रेस पक्षाला अनेकजण सोडून जात आहे त्या पार्शभूमीवर प्रश्न विचारला असता थोरात यांनी सांगितले की.कठीण काळ हा पक्षाच्या दृष्टीने महत्तवाचा हे मी मान्य करतो ८० साली सुद्धा अशी अवस्था होती. काँग्रेस कुठे आहे हे विचारलं जातं होतं. इंद्राजीच्या सोबत फिरण्यासाठी माणसे नव्हतं ९९ ला १९ ला काँग्रेसचे किती उमेदवार येईल हे विचारले जातं होते. मात्र मोठ्या झाडाचे फ़ांद्या शेतकरी छाटतो आणि त्याला नव्या पाल्या फुटतात त्यामुळे कोणी गेला म्हणून काहीही थांबत नाही.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.