Leopard Saam tv
महाराष्ट्र

Ahmednagar News : धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात; परिसरात आणखी एक बिबट्या असण्याची शक्यता

Ahmednagar News : गेल्या दोन महिन्यापासून गायके मळ्यात अत्यंत भीतीची आणि दहशतीचे वातावरण या बिबट्याने केले होते.

Rajesh Sonwane

सुशील थोरात

अहमदनगर : जंगलातून शिकार व पाण्याच्या शोधात आलेल्या बिबट्याने अहमदनगर शहर व परिसरात धुमाकूळ (Ahmednagar) घातला होता. या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाकडून पिंजरे लावण्यात आले होते. दरम्यान हा बिबट्या अखेर पिंजऱ्यात अडकल्याने परिसरातील नागरिकांनी मोकळा श्वास घेतला आहे. (Tajya Batmya)

गेल्या दोन महिन्यापासून गायके मळ्यात अत्यंत भीतीची आणि दहशतीचे वातावरण या बिबट्याने (Leopard) केले होते. या बिबट्याने अनेकांवर हल्ले केल्याच्या घटना मागील काही दिवसात झाल्याच्या पाहण्यास मिळाल्या. याला पकडण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरु होते. काही दिवसांपासून धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात अडकला असून यामुळे नागरिकांनी मोकळा श्वास घेतला आहे. बिबट्या (Forest Department) वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकल्याची माहिती वाऱ्यासारखी शहरामध्ये पसरल्यानंतर बघ्यांनी मात्र या ठिकाणी तुफान गर्दी केली होती

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मादी बिबट्याचा वावर  

दरम्यान हा बिबट्या जरी जेरबंद झाला असला तरी आणखीन एक मादी व तिचे पिल्ले या भागात आजही निदर्शनास येत असल्याचे या परिसरातील प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. त्यामुळे आता मादीला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'पॅलेटगन वापरण्याचे आदेश गृहमंत्र्यांचेच'; राहुल गांधींच्या आरोपामुळे लोकसभेत घमासान

PMC News: विकासकामांच्या पैशांवर नगरसेवकांचा डल्ला? पुणे महापालिकेतील टक्केवारीचं रेटकार्ड उघड

Dark Chocolate : डार्क चॉकलेट खाण्याचे ७ जबरदस्त फायदे! हृदयापासून मेंदूपर्यंत होतील मोठे बदल

Gold Price: देशात सोनं टंचाई? आयात रखडली, किंमती वाढणार? व्यवहारांनाही मोठा ब्रेक

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर पाच ते सहा किलोमीटर अंतरापर्यंत स्ट्रीट लाईट बंद

SCROLL FOR NEXT