सचिन बनसोडे
नेवासा (अहमदनगर) : अहमदनगर जिल्ह्यातील शनि शिंगणापूर देवस्थानावर कथित भ्रष्ट्राचाराचा आरोप करत (BJP) भाजपचे कार्यकर्ते ऋषिकेश शेटे यांनी गुरुवार सायंकाळपासुन बेमुदत (Shani Shingnapur) उपोषण सुरू केले आहे. केंद्रिय मंत्री भागवत कराड आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. (Tajya Batmya)
अहमदनगर जिल्ह्यातील शनि शिंगणापूर देवस्थानात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप उपोषणकर्ते शेटे यांनी केला आहे. शनि शिंगणापूर देवस्थानमध्ये चालू असलेला कोट्यवधीचा भ्रष्टाचार, अनधिकृत कामगार भरती झाली. तसेच अनधिकृत बोगस विश्वस्त मंडळ बरखास्त करून आणि त्वरित प्रशासकाची नेमणूक करणे यासह इतर मागण्यासाठी ३० नोव्हेंबरपासून बेमुदत आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी आज अचानक उपोषणकर्त्यांची भेट घेत सर्व प्रकरण समजून घेतले. तसेच आगामी हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सादर करून गैरप्रकाराचा आणि भ्रष्टाचाराचा बुरखा फाडू अशी ग्वाही बावनकुळे यांनी उपोषणकर्त्यांना दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.