Ahmednagar Accident News Saam Tv
महाराष्ट्र

Ahmednagar Accident: हृदयद्रावक! भरधाव डंपरच्या धडकेत पती ठार, पत्नी गंभीर जखमी; ७ महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह

Gangappa Pujari

सुशिल थोरात, अहमदनगर|ता. १२ जुलै २०२४

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे सत्र सुरू आहे. वरळीमधील हिट अँड रन प्रकरण ताजे असतानाच अहमदनगरमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. नगरच्या पाथर्डी भरधाव डंपरने धडक दिल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अहमदनगरच्या पाथर्डी येथे खडी वाहणाऱ्या विनाक्रंमाकच्या डंपरने दुचाकीवर जाणाऱ्या पती-पत्नीला धडक दिल्याची घटना सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत पतीचा जागेवरच मृत्यू झालाय तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. पाथर्डी- नगर रस्त्यावरील हॉटेल प्रशांत समोर ही घटना घडली.

नितीन पवार असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून तो शेवगाव तालुक्यातील वाघोली येथील राहणारा आहे. तर त्याची पत्नी रेणुका पवार ही गंभीर जखमी झाली असून तिला पुढील उपचारासाठी नगरला हलवण्यात आले आहे. दुर्दैवी बाब म्हणजे या दांपत्याचा सात महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता.

दरम्यान, या अपघातातनंतर धडक दिलेला डंपर देखील उलटला असून डंपर चालक पळून गेला आहे. विना क्रमांकाचा डंपर असल्याने हा डंपर नेमका कुणाच्या मालकीचा आहे? हे पोलीस तपासात समजणार आहे. या घटनेची माहिती मिळताच पाथर्डी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT