NCP MP Nilesh Lanke Delhi News: Saamtv
महाराष्ट्र

Nilesh Lanke News: खासदार निलेश लंकेंना मोठा धक्का! कट्टर समर्थकाने साथ सोडली, दंड थोपटले, विधानसभा लढण्याची घोषणा

Maharashtra Assembly Election 2024: निलेश लंके हे खासदार झाल्यानंतर पारनेरची जागा रिक्त झाली आहे. अशातच आता पारनेर मतदार संघातून निलेश लंके यांच्या पत्नी रानी लंके विधानसभेच्या मैदानात उतरण्याची चर्चा आहे.

Gangappa Pujari

सुशिल थोरात, अहमदनगर

अवघ्या काही तासांमध्ये राज्याच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे, त्याआधी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे विधानसभेची जोरदार मोर्चेबांधणी सुरु असतानाच नगर दक्षिणमध्ये निलेश लंके यांना मोठा धक्का बसला आहे. निलेश लंके यांचे विश्वासू सहकारी असलेल्या पारनेरच्या माजी नगराध्यक्षांनी खासदार निलेश लंकेंना आव्हान देत विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर मतदार संघात खासदार निलेश लंके यांना घेरण्यासाठी कधी काळी त्यांचे निकटवर्ती असलेले पारनेर नगरपालिकेचे माजी नागराध्यक्ष विजय औटी यांनी लंकेंच्या विरोधातच दसरा मेळावा घेतला. निलेश लंके हे खासदार झाल्यानंतर पारनेरची जागा रिक्त झाली आहे. अशातच आता पारनेर मतदार संघातून निलेश लंके यांच्या पत्नी रानी लंके विधानसभेच्या मैदानात उतरण्याची चर्चा आहे.

त्यामुळे त्यांना शह देण्यासाठी औटी हे विधानसभेच्या रिंगणात उतरले आहे. 2019 ला निलेश लंकें यांचे आम्ही एकमुखाने काम केले मात्र आमच्या सारख्या अनेकांची हेळसांड झाली आहे. त्यांच्या कोविड काळात आमचा देखील हातभार लागला मात्र ते हवेत गेल्याने ही निवडणूक अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढण्याचे औटी यांनी संकेत दिले आहेत.

दरम्यान, या मेळाव्या प्रसंगी रावनाच्या पुतळण्याचे दहनही करण्यात आले. कट्टर समर्थकाने आव्हान दिल्याने निलेश लंकेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. निलेश लंके हे महाविकास आघाडीकडून खासदार झाल्यानंतर त्यांच्यावर विधानसभेच्या रणनितीची मोठी जबाबदारी असणार आहे अशातच त्यांना त्यांच्याच मतदारसंघातून घेरण्यात आल्याने पारनेरची निवडणूक ही चुरशीची मानली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT