Jejuri yatra 2023 Saamtvnews
महाराष्ट्र

Champa Shashthi 2023: यळकोट, यळकोट जयमल्हार! जेजुरी गडावर 'चंपाषष्ठी' उत्सवाची सांगता; प्रती जेजुरीत भाविकांची गर्दी

Ahmednagar News: प्रती जेजूरी समजल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील वाकडी येथेही खंडोबाच्या दर्शनाला भाविकांनी अलोट गर्दी केली आहे. दिवसभरात तब्बल लाखो भाविकांनी खंडोबाच्या दर्शनाचा लाभ आहे.

Gangappa Pujari

सचिन बनसोडे, अहमदनगर| ता. १८ डिसेंबर २०२३

Ahmednagar Prati Jejuri Darshan:

आज चंपाषष्टी निमित्ताने अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी येथे खंडोबाचा उत्सव असतो. या दिवशी खंडेरायाचे दर्शन घ्यायला जेजुरी गडावर लाखो भाविक हजेरी लावतात. तसेच प्रती जेजूरी समजल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील वाकडी येथेही खंडोबाच्या दर्शनाला भाविकांनी अलोट गर्दी केली आहे. दिवसभरात तब्बल लाखो भाविकांनी खंडोबाच्या दर्शनाचा लाभ आहे.

' येळकोट येळकोट जय मल्हार'चा जयघोष करत अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील राहाता तालुक्यात असणाऱ्या वाकडी येथे राज्यभरातून आलेले लाखो भाविक खंडोबा (Khandoba) चरणी नतमस्तक झाले. याठिकाणी भंडा-याची उधळण करत देवाची तळीआरती केली जाते. देवाला वांग्याचे भरीत आणि रोडग्याचा नैवद्य भाविक अर्पण करत असतात.

काय आहे आख्यायिका?

जेजुरीहून निघाल्यानंतर खंडोबा देवाचा पाचवा मुक्काम वाकडी (Vakadi) येथे झाला. वाकडीत पाण्याची सोय नसल्याने प्रधानजींना त्यांनी चंदनापुरी येथे पाणी आणण्यासाठी पाठवले. पाण्याची उपलब्धता नसल्याने सर्व सैन्य त्यांनी जेजुरीला परत पाठवले. मात्र जाताना घोड्यांच्या माना वाकड्या झाल्याने या जागेला वाकडी असे नाव पडल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे प्रत्येक चंपाषष्टीला मोठ्या संख्येने भाविक इथे दर्शनासाठी येतात.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जेजुरी गडावर चंपाषष्ठीची सांगता..

दरम्यान, चंपाषष्ठी निमित्त अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरी (Jejuri) गडावरही राज्यभरातील भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात पाहिला मिळत आहे. जेजुरी गडावर चंपाष्टमीला हळद आणि पोष पौर्णिमेला पाल येथे देवाचे लग्न होते. आज सोमवार रोजी चंपाष्टमी उत्सवाची सांगता होत आहे. या निमित्ताने जेजुरी गडावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

Crime News: संतापजनक! बेशुद्ध करत महिलेवर बलात्कार; उपचाराच्या बहाण्याने दिलं भूलचं इंजेक्शन,नंतर...

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाला मोठा धक्का, गुहागरमधील नेत्या शिवसेनेत प्रवेश करणार

Malshej Ghat Kalu Waterfall Tragedy : मुसळधार पावसामुळे नदीला अचानक पूर, ३०० पर्यटक अडकले; सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

SCROLL FOR NEXT