Political News Saam TV
महाराष्ट्र

Political News : महायुतीच्या मेळाव्याला भाजपच्या कोल्हेंची गैरहजेरी; विखेंसोबत एकाच मंचावर येण्याचे टाळले

Ahmednagar Lok Sabha Constituency : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे उपस्थित होते. भाजपच्या माजी आमदार स्नेहालता आणि त्यांचे पुत्र विवेक कोल्हे यांनी मात्र या मेळाव्याकडे पाठ फिरवली.

साम टिव्ही ब्युरो

सचिन बनसोडे

Lok Sabha Election :

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राम शिंदे यांची नाराजी दूर करण्यात सुजय विखे पाटलांना यश आलंय. शिर्डी मतदारसंघात मात्र विखे पाटील आणि कोल्हे या एकाच पक्षात असणाऱ्या राजकीय विरोधकांचे सुत मात्र जुळत नसल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आलेय.

काल सायंकाळी महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी कोपरगाव शहरात मेळावा पार पडला. या मेळाव्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे उपस्थित होते. भाजपच्या माजी आमदार स्नेहालता आणि त्यांचे पुत्र विवेक कोल्हे यांनी मात्र या मेळाव्याकडे पाठ फिरवली.

एकाच पक्षात असून गेल्या काही महिन्यांपासून कोल्हे आणि विखे यांच्यात राजकीय संघर्ष सुरू आहे. त्यामुळेच कोल्हे यांनी विखे पाटलांसोबत एकाच मंचावर येण्याचे टाळले असल्याचे बोलले जातेय.

महायुतीच्या या मेळाव्यात विखे पाटील यांनी राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांचे तरुण आमदार असा उल्लेख करत कौतुक केलंय. तर नगर दक्षिणच्या जागेवरून विखे पाटलांनी निलेश लंकेंना भाषणातून टोला लगावलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: महाराष्ट्रात 'कुछ तो बडा होने वाला है'; राजकीय नेत्यांच्या बैठकांचा अर्थ काय?

Pati Patni Aur Panga: 'पति पत्नी और पंगा'मध्ये झळकणार हे फेमस कपल

Pune Rave Party Case: 'ऐसा माल चाहीऐ' प्रांजल खेवलकरांच्या मोबाइलमध्ये आढळले आक्षेपार्ह व्हिडिओ आणि चॅट|VIDEO

Maharashtra Live News Update: जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले, पाण्याचा विसर्ग सूरू

Shocking : ३६० डिग्री फिरणारा पाळणा कोसळला, खांबाचे दोन तुकडे झाले अन् डोळ्यासमोर सारं संपलं; Viral Video

SCROLL FOR NEXT