Ahmednagar News Saamtv
महाराष्ट्र

Ahmednagar Crime: आधी बायकोची निर्घृण हत्या, मग स्वतःचं आयुष्य संपवलं; भयंकर घटनेने अहमदनगर हादरले

Ahmednagar News Update: पत्नीच्या डोक्यात लोखंडी झाऱ्याने मारहाण करून निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे.

Gangappa Pujari

सुशिल थोरात, प्रतिनिधी...

Ahmednagar News: अहमदनगर (Ahmednagar) शहरातून एक धक्कादायक घटना समोर येत असून आधी पत्नीची हत्या करून पतीने ही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार शहरात घडला आहे. अहमदनगर शहरात स्टेशन रोडवरील शिवनेरी चौक परिसरातील ही भयंकर घटना आहे. या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नगर शहरातील स्टेशन रोडवरील शिवनेरी चौक परिसरात पतीने आधी पत्नीची निर्घृण हत्या करुन आत्महत्या केल्याचा भयंकर घटना घडली आहे. आशा संदीप गुजर असे हत्या केलेल्या पत्नीचे नाव तर संदीप रामचंद्र गुजर असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, पत्नीच्या डोक्यात लोखंडी झाऱ्याने मारहाण करून तिची पतीने हत्या केली. तसेच मृतदेह बाथरूममध्ये टाकल्याचीही माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच कोतवाळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. (Latest Marathi News)

दरम्यान, या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नसून पोलिस या घटनेचा पोलिस अधिक तपास करत आहेत. या भयंकर घटनेमागे कुटूंब कलह हेच कारण की आणखी काय? पतीने पत्नीसोबत असे भयंकर कृत्य का केले असावे, अशा अनेक प्रश्नांची उकल करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. (Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP vs Congress:'सत्तेच्या भुकेपोटी भारताची बदनामी करू नका'; भाजप प्रदेशाध्यक्षांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर

राज्यातील जिल्ह्यांची संख्या वाढणार, कोणता बनणार नवा जिल्हा? सुनिल तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण

Konkan Alphonso Mango GI Tag Row: कोकणचा हापूस चोरण्याचा गुजरातचा डाव; 'हापूस'च्या जीआय मानांकनावरून वाद पेटला

'12 लाखांपर्यंतचा टॅक्स माफ केला, तुम्ही पगार वाढवला का?' पंतप्रधानांकडून उद्योगपतींची कानउघडणी

Saturday Horoscope: शनिवारी ग्रहांची मोठी कृपा! या राशींना मिळणार मेहनतीचे फळ, तर काहींना घ्यावी लागणार काळजी

SCROLL FOR NEXT