Radhakrishna Vikhe Patil on Sanjay Raut Saam TV
महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe Patil on Sanjay Raut : 'संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झालाय', राऊतांच्या विखे पाटीलांचा पलटवार

'संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झालाय', राऊतांच्या विखे पाटीलांचा पलटवार

Satish Kengar

>> सचिन बनसोडे

Radhakrishna Vikhe Patil on Sanjay Raut : 'संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झालाय', असा हल्लाबोल भाजप नेते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर केला आहे. तुम्हीच भाजपचं मंगळसूत्र घातलं होतं आणि घरोबा दुसऱ्यासोबत केला होता, असंही त्यांनी म्हटलं आहे.

तत्पूर्वी संजय राऊत यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या एका वक्तव्यावर त्यांच्यावर टीका केली होती. देवेंद्र फडणवीस हेच माझ्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं विखे पाटील म्हणाले होते. यावर राऊत म्हणाले होते की, ''राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील तर त्यांनी त्यांनी फडणवीसांच्या गळ्यात मंगळसूत्र बांधावं.''

राऊतांच्या वक्तव्यावर पलटवार करत आता विखे पाटील म्हणाले आहवेत की, ''संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, असं जे लोक म्हणतात, त्याच हे उत्तम उदाहरण आहे.'' (Latest Marathi News)

राऊतांना उद्देशून ते म्हणाले, ''लग्न करून मंगळसूत्र आमचं घालायचं आणि घरोबा दुसऱ्याबरोबर करायचा, हे तुम्ही केलं. आता तिथेही तुमची काय परिस्थिती आहे? तुमच्या वज्रमुठेला आताच तडे गेलेत. उद्या तुम्हाला ते सोडणार नाही याची काळजी घ्या.''

सरकारचं डेथ वॉरंट आलाय, असंही संजय राऊत म्हणाले होते. यावर बोलताना विखे पाटील म्हणाले की, त्यांच्या विधानाला उत्तर द्यायची गरज नाही. एकनाथ शिंदेंच्या रूपाने कार्यक्षम मुख्यमंत्री मिळाला असून २०२४ ला सरकार आमचंच असेल. या सरकारला प्रधानमंत्री मोदींचं पाठबळ असल्याचंही ते म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Woolen Clothes Washing Tips: लोकरीचे कपडे कसे धुवावेत? स्वेटर आणि जॅकेट आकसू नये म्हणून सोपे मार्ग

Maharashtra News Live Update: लोकशाही व्यवस्था बदनाम करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न; भाजपचे ‘लोकशाही बचाव, अराजकता हटाव’ अभियान

Car AC not cooling: कारच्या AC मधून गरम हवा येतेय? मॅकेनिककडे जाण्यापूर्वी या 6 गोष्टी अवश्य तपासा

Benefits of Skipping: पोटाची चरबी कमी करयची आहे? मग रोज १०० वेळा दोरी उड्या मारा, शरीरात दिसतील हे बदल!

Post Office Bonus : पोस्टाच्या कर्मचाऱ्यांना ६० दिवसांच्या पगाराइतका बोनस; कोणाला किती पैसे मिळणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT