Ahmadnagar Karat Crime Saam Tv
महाराष्ट्र

पत्नीला माहेरी न पाठवल्याचा राग; सासऱ्याने जावयाला टेम्पोखाली चिरडलं

Ahmadnagar Crime : जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील (Karjat) कौडाणे गावात ही धक्कादायक घटना घडली आहे.

सचिन अग्रवाल, साम टीव्ही अहमदनगर

अहमदनगर : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात सासऱ्यानेच आपल्या जावयाच्या अंगावर टेम्पो चढवत त्याला चिरडून ठार केल्याची घडली आहे. या घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. पत्नीला तसेच मुलाला माहेरी पाठवत नसल्याचा राग आल्याने सासऱ्याने हे कृत्य केल्याची प्राथामिक माहिती आहे. जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील (Karjat) कौडाणे गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी कर्जत (Police) पोलीस ठाण्यात ७ जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Ahmadnagar Karjat Crime News)

दत्तात्रय जानू मुळे (वय ३८) राहणार कौडाणे (तालुका कर्जत) असं मृत्युमुखी पडलेल्या जावायाचं नाव आहे. तर सूद्रिक मुळे असं गुन्हा दाखल झालेल्या सासऱ्यांच नाव आहे. माहितीनुसार, कर्जत तालुक्यातील कौडणा आणि मुळेवाडी येथील सुद्रिक व मुळे एकमेकांचे नातेवाईक आहेत. काही दिवसांपासून दत्तात्रय हा त्याच्या पत्नीना तसेच मुलाला माहेरी पाठवण्यास नकार देत होता. त्यामुळे सूद्रिक आणि मुळे यांच्यामध्ये सतत वादावादी होत होती.

दरम्यान, सुद्रिक हे वर्ष श्राद्धच्या कार्यक्रमला आले होते. त्यावेळी नातंवाला घेण्याचा आग्रह धरला. मात्र मुलाला घेऊन जाण्यास मुळे यांनी विरोध केला. दत्तात्रय मुळे यांनी टेम्पोत बसलेल्या मुलांना उतरवण्यासाठी टेम्पो वर चढले त्यावेळेस त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर सुद्रीक यांनी जावई मुळे याच्या अंगावर टेम्पो घालून त्याला चिरडून ठार मारले.

या घटनेनंतर दत्तात्रय यांचे वडील जानू मुळे यांनी कर्जत पोलीस ठाण्यात रवींद्र बाबासाहेब सूद्रिक, बाबासाहेब दत्तात्रय सुद्रिक, नरेंद्र सदाशिव सूद्रिक, विठ्ठल सदाशिव सुद्रिक, अमोल बाबासाहेब सुद्रिक, सदाशिव दत्तात्रय सुद्रिक यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रार दाखल होताच दोन आरोपींना अटक केली आहे. तर एकूण नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shirdi : दहीहंडीच्या मिरवणुकीत हत्येचा थरार, जुन्या वादातून मित्रांकडून १८ वर्षीय तरुणाची हत्या

Elvish Yadav House Firing: धावत धावत आले अन् धाड धाड धाड झाडल्या दोन डझनभर गोळ्या, गोळीबाराचा CCTV व्हिडिओ व्हायरल

Sakshee Gandhi: थोडीशी लाजली अन् गालातच हसली; अभिनेत्रीचं मोहक सौंदर्य

Shravan Special : श्रावणात चिकन-मटणाची चव येतेय? मग ही डुबुक वडी रेसिपी एकदा बनवाच

तेजस्विनी पंडितने आईला दिला मुखाग्नी, अखेरचा निरोप देताना अश्रू अनावर; राज ठाकरेंची उपस्थित! VIDEO

SCROLL FOR NEXT