लहान भावाची वहिनीवर वाईट नजर; मोठ्या भावला संपवलं, थरकाप उडवणारी घटना

निलेश गणपत फुसे (वय २२) असं जन्मठेप झालेल्या आरोपीचं नाव आहे
Buldhana Crime News
Buldhana Crime NewsSaam Tv

संजय जाधव, साम टीव्ही

बुलडाणा : मोठ्या भावाच्या पत्नीवर वाईट नजर ठेवून लहान भाऊ सतत शरीरसुखाची मागणी करत होता. ही बाब मोठ्या भावाला कळताच त्याने लहान भावाला चांगलंच सुनावलं. याचा राग मनात धरत लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात वखराची पास टाकली. या घटनेत मोठ्या भावाचा मृत्यू (Murder) झाला. अंगावर काटा आणणारी ही थरारक घटना 28 एप्रिल 2017 रोजी बुलडाणा (Buldhana) जिल्ह्यातील खामगाव (Khambgaon) परिसरात घडली होती. याप्रकरणातील आरोपी लहान भावाला शुक्रवारी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. निलेश गणपत फुसे (वय २२) असं जन्मठेप झालेल्या आरोपीचं नाव आहे. (Buldhana Khambgaon Crime News)

Buldhana Crime News
सोलापुरात पार पडली 'लिंग परिवर्तन' शस्त्रक्रिया; पुरूषाचं झालं महिलेत रुपांतर

जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील रमेश गणपत फुसे (वय २६) आणि निलेश गणपत फुसे (वय २२) हे दोन सख्ये भाऊ. लहानपणापासून एकत्र वाढलेल्या या दोन्ही भावात एकमेकांविषयी खूप प्रेम होते. काही दिवसांनी रमेशचे लग्नही झाले, सर्व काही सुरळीत चालू असताना, लहान भाऊ निलेश हा दारूच्या आहारी गेला. सतत दारू पिऊन निलेश हा घरी येत असल्याने रमेश आणि त्याच्यात सतत खटके उडू लागले. इतकंच नाही तर, दारूच्या व्यसनात टुल्ल झालेल्या निलेशची मोठ्या भावाच्या पत्नीवरही वाईट नजर होती. त्यामुळे रमेश आपली पत्नी आणि लहान मुलीला घेऊन शेतात राहण्यासाठी गेला होता.

दरम्यान २८ एप्रिल २०१७ च्या रात्री निलेश हा दारुच्या नशेत रमेश राहत असलेल्या शेतातील घरी गेला. मध्यरात्रीच्या सुमारास त्याने रमेशला आवाज देत दार उघडण्याचे सांगितले. एवढेच नव्हे तर मला तुझ्या पत्नीसोबत झोपायचं आहे असे म्हणत त्याने आरडाओरड सुरू केली. त्यामुळे रमेशने शिवीगाळ करुन निलेशला शेतातून रात्रीच्या वेळेस काढून दिले. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजताच्या सुमारास निलेश परत शेतात आला. त्यावेळी रमेश हा घराच्या ओसरीत झोपलेला होता.

Buldhana Crime News
धक्कादायक! लग्न लावून मुलीला सासरी पाठवलं; दुसऱ्याच दिवशी आईने घेतला गळफास

तेव्हा निलेशने रमेशसोबत पुन्हा वाद घालण्यास सुरूवात केली. तसेच रमेशच्या पत्नीबाबत अपशब्द वापरले. यावरून दोघांचा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, निलेशने मोठा भाऊ रमेशच्या डोक्यात वखराची पास मारली. या घटनेत रमेश गंभीर जखमी झालात. त्याला जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मावळली. याप्रकरणी रमेशच्या पत्नीने जळगाव जामोद पोस्टेला तक्रार दिली असता पोलिसांनी आरोपी निलेश फुसे याच्या विरुध्द पोलिसांनी कलम ३०२, ५०४,५०६ भादंविचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती.

घटनेच्या तपासाअंती प्रकरण खामगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले. या प्रकरणात एकूण १३ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये प्रत्यक्षदर्शी रमेशची पत्नी आणि त्याच्या मुलीची साक्ष महत्वाची ठरली. त्यामुळे न्यायधीश वैरागड यांनी आरोपी निलेश याला कलम ३०२ अंतर्गत जन्मठेप तसेच १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेतील ५ हजार रुपये फिर्यादी अर्चनाला देण्याचे निकालात नमूद केले आहे. या प्रकरणात सरकारपक्षातर्फे सरकारी वकील अॅड. उदय आपटे यांनी काम पाहिले.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com