सोलापुरात पार पडली 'लिंग परिवर्तन' शस्त्रक्रिया; पुरूषाचं झालं महिलेत रुपांतर

डॉ. शरण हिरेमठ यांनी ही किमया करून दाखवली आहे.
Solapur
SolapurSaam Tv
Published On

सोलापूर : स्त्री किंवा पुरुषाचा देह घेऊन जन्म घेतला असला, तरी त्या देहातील मन विरोधी लिंगी असल्याची जाणीव झाल्यानंतर जगणेच अस्वस्थ होते. क्वचितप्रसंगी मुलांना आपण मुलगा असूनही मुलगी असल्याचा भास होतो. काही मुलींमध्ये पुरुषाप्रमाणे लैंगिक वर्तन दिसतं, त्यांच्यात पुरुष होण्याची आस अधिक असते. तर काही मुलांना आपण मुलगी असल्याचा भास होतो. त्यामुळे आपल्या मनाचा आवाज ऐकून प्लॅस्टिक सर्जरी (Gender Change Surgery) ऑपरेशनद्वारे लिंग परिवर्तन करून घेण्याकडे अनेकांचा कल वाढत आहे. सोलापूर (Solapur) जिल्ह्यातही अशीच एक लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. (Solapur Gender Change Surgery News)

Solapur
मोठी बातमी! पोलीस भरतीची तारीख ठरली; पहिल्या टप्प्यात 7 हजार जागा भरणार

सोलापुरातील ऍडोरा रुग्णालयात पहिल्यांदाच यशस्वीरित्या लिंग परिवर्तनाची शस्त्रक्रिया पार पडली आहे. डॉ. शरण हिरेमठ यांनी ही किमया करून दाखवली आहे. दोन वर्षांच्या अथक परिश्रमांनंतर त्यांनी एका पुरुषाच महिलेमध्ये रूपांतर केलं आहे. संबधित तरुणाच्या कुटुंबीयांच्या संमतीनंतर आणि मानसिकरोग तज्ञांच्या सल्ल्यानंतरच ही लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया केली असल्याची माहिती डॉ. शरण हिरेमठ यांनी दिली आहे.

लिंग परिवर्तन करणाऱ्या तरुणाने त्यांची ओळख गुपित ठेवली असल्याने या तरुणाबाबत अधिक माहिती मिळून शकलेली नाही. त्यांची माहिती मिळू शकलेली नाहीये. मात्र, सुरूवातीला फक्त विदेशात होणारी ही शस्त्रक्रिया आता भारतातही आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रातील ग्रामीण भागातही होत असल्याने अनेक लिंग परिवर्तन करू पाहणाऱ्यांच्या अडचणींचा मार्ग सुकर झाला आहे.

या शस्त्रक्रियेसाठी साधारण एक ते दीड लाख रुपयांचा खर्च येत असल्याची माहिती डॉ. शरण हिरेमठ यांनी दिली आहे. त्याचबरोबर लिंग परिवर्तनानंतर पुरूषातून महिलेमध्ये परिवर्तन झालेल्या महिलेला मुलाला जन्म देता येणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com