Ahilyanagar Saam
महाराष्ट्र

Crime News: अहिल्यानगरमध्ये मौत का कुआं! दुसऱ्या विहिरीत सापडलं मुंडकं, दोन हात अन् एक पाय

Crime in Ahmednagar district: अहिल्यानगरच्या दाणेवाडीतील दोन विहिरीत एका व्यक्तीचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला आहे. या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही.

Bhagyashree Kamble

अहिल्यानगरच्या दाणेवाडी गावातील एका विहिरीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला होता. हा मृतदेह अनोळखी व्यक्तीचा असल्याची माहिती समोर आली होती. आता त्याच्या बाजूला असणाऱ्या दुसऱ्या विहिरीत मृतदेहाचे शिर, दोन हात आणि एक पाय आढळला आहे. एकाच मृतदेहाचे तुकडे दोन विहिरीत सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

अहिल्यानगरच्या दाणेवाडी गावातील एका विहिरीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. मात्र, हा मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेत होता. आज त्या विहिरीच्या बाजूला असणाऱ्या दुसऱ्या विहिरीत मृतदेहाचे शिर, दोन हात आणि एक पाय आढळला आहे. एकाच मृतदेहाचे तुकडे दोन विहीरीत आढळल्यानं श्रीगोंदा आणि बेलवंडीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या मृतदेहाबाबत अधिक चौकशी केली असता, जबर मारहाण करून आरोपीने हात पाय आणि शिर धडापासून वेगळं केलं आहे. नंतर आरोपीनं शरीराचे तुकडे करून दोन्ही विहिरीत फेकून दिले आहेत. आधी एका विहीरीत मृतदेहाचे काही तुकडे सापडले होते. त्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी केली. विहिरीच्या बाजूला असणाऱ्या दुसऱ्या विहिरीत देखील शिर, दोन हात आणि एक पाय आढळला आहे.

हा मृतदेह नेमका कुणाचा आहे. याचा तपास पोलीस करीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून १८ वर्षीय विद्यार्थी बेपत्ता आहे. हा मृतदेह विद्यार्थ्याचा आहे की नाही, याचा तपास पोलीस करीत आहेत. या घटनेचा संदर्भात बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT