Congress’ “Go Solo” slogan heats up Ahmednagar politics; MVA alliance faces new test. saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: मविआमध्ये बिघाडी? काँग्रेसचा स्वबळाचा नारा, अहिल्यानगरच राजकारण तापलं

Ahmednagar Politics: स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेसनं स्वबळावर निवडणुका लढवाव्यात अशी मागणी पक्षातील कार्यकर्ते करत आहेत. आहिल्यानगरमध्ये भाजपविरोधात वातावरण आहे, त्याचा फायदा काँग्रेसला होईल अशी आशा कार्यकर्त्यांना आहे.

Bharat Jadhav

  • काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेमुळे मविआमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

  • अहमदनगरमध्ये काँग्रेस पदाधिकारी स्वबळावर लढण्याच्या मागणीवर ठाम

  • बाळासाहेब थोरात यांनी या वादावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये.

राज्यातील राजकारणातील पारा चढू लागलाय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विरोधकांचा सुपडा साफ झाला पाहिजे, असं विधान अमित शहा यांनी मुंबईत केलं. दुसऱ्या बाजुला काँग्रेसन स्वबळाचा नारा दिल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. भाजपबरोबरच आता काँग्रेसचे पदाधिकारी स्वबळाचा नारा देत आहेत.

अहिल्यानगरमधील काँग्रेस आमदार, पदाधिकाऱ्यांनी 'स्थानिक'साठी स्वबळाचा नारा दिलाय. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी पदाधिकाऱ्यांच्या मागणीवर काही प्रतिक्रिया दिली नाहीये.

संगमनेरच्या अमृतनगर येथे अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक झाली. संगमनेर येथे बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुका काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवाव्यात अशी मागणी श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

बाळासाहेब थोरात यांनी मात्र पदाधिकाऱ्यांच्या मागणीवर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.. एकीकडे राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाविकास आघाडीत सहभागी होणार का? याकडे लक्ष लागलेले असताना दुसरीकडे अहिल्यानगर जिल्ह्यात मात्र काँग्रेस पदाधिकारी स्वबळाचा नारा देत आहेत.. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आघाडीत बिघाडी होणार की एकत्रित निवडणुकांना सामोरे जाणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अहिल्यानगर जिल्हा हा काँग्रेस विचारांचा बालेकिल्ला राहिलाय. सतत भूलथापा देऊन आणि जातीयवाद करून सत्तेवर आलेल्या महायुतीच्या पक्षांचे खरे रूप जनतेला कळालंय. यामुळे सर्वसामान्य जनता, नागरिक, युवक आणि महिला यांच्यामध्ये सत्ताधाऱ्याविरुद्ध मोठा संताप निर्माण झालाय. त्यामुळे आता काँग्रेसला अनुकूल वातावरण आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुका काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवाव्यात, अशी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आलीय.

काँग्रेस पक्षाला मोठी विचारधारा आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वावर जिल्ह्यातील नागरिकांचा विश्वास आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषदेमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मोठी संधी आहे. काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढण्यासाठी अनेक कार्यकर्ते इच्छुक आहेत. त्यामुळे सर्व निवडणुका काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवाव्यात, अशी मागणी पदाधिकारी करत असल्याचं आमदार हेमंत ओगले म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asthma: अस्थमाची लक्षणे कोणती? अशी घ्या काळजी

Bihar Election : निवडणुकीआधी माजी उपमुख्यमंत्र्यांचा दणका; 27 नेत्यांची पक्षातून हकालपट्टी

रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार? चाहत्यांमध्ये खळबळ

Maharashtra Politics: कोकणात वर्चस्वासाठी राणे बंधूंमध्ये संघर्ष, थोपटले एकमेकांविरोधात दंड

Pramod Mahajan Case: प्रमोद महाजनांना का संपवलं? महाजनांच्या हत्येचा नवा अँगल समोर

SCROLL FOR NEXT