Snake Bite Saam tv
महाराष्ट्र

Snake Bite : नुकसानीचे पंचनामे करताना तलाठ्याला सर्पदंश; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

Ahilyanagar News : तलाठी आकाश यांना घेऊन जाण्यासाठी शेतातून कोणते साधन नसल्याने ग्रामस्थांनी आणि शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी तलाठ्याला उचलून कसरत करत नदी ओलांडून चारचाकी वाहनातून रुग्णालयात दाखल केले

Rajesh Sonwane

सुशील थोरात 

अहिल्यानगर : मुसळधार पावसामुळे पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्यास प्रशासनाकडून सुरवात करण्यात आली असून कर्मचारी शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत. अशात शेतकऱ्याच्या बांधावर पंचनामा करण्यासाठी गेलेल्या एका तलाठ्याला सर्पदंश झाल्याची घटना अहिल्यानगर जिल्ह्यात घडली आहे. सर्पदंशानंतर भोवळ येत असल्याने नागरिकांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले आहे. 

अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात सदरची घटना घडली असून आकाश काशीकेदार असे सर्पदंश झालेल्या तलाठ्याने नाव आहे. दरम्यान मागील दोन आठवडे झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला असून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळावी यासाठी प्रशासनाकडून पंचनामे करण्यास सुरवात करण्यात आली आहे. 

दरम्यान आकाश काशिकेदार हे जामखेड तालुक्यातील धनेगाव येथे पिकांचे नुकसानीबाबत पंचनामे करण्यासाठी गेले होते. यावेळी हे शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची माहिती घेत पंचनामा करत होते. याच वेळी गवतात बसलेल्या सापावर त्यांचा पाय पडला. यानंतर सापाने दंश केला. यावेळी त्यांच्या हा प्रकार लक्षात आला नाही. 

शेतकऱ्यांनी खांद्यावर उचलून नेले रुग्णालयात 

मात्र काही वेळाने तलाठी काशिकेदार यांना भोवळ येऊ लागल्याने त्यांना आपल्या पायाला कशाने तरी चावा घेतल्याचे लक्षात आले. भोवळ आल्यावर आकाश कशीकेदार यांना सोबत असलेल्या शेतकऱ्यांनी खांद्यावर उचलून घेत पायी धावपळ करीत दवाखान्यात नेले. यावेळी नदीतून वाहन जाऊ शकत नसल्याने बंधाऱ्यावरून लोकांनी कसरत करत काशिकेदार यांना खांद्यावर उचलून आणले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karwa Chauth 2025: करवा चौथ कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त अन् पद्धत

Gauri Kulkarni: जशी नभीची चमचम चमके चांदणी, गौरी कुलकर्णीचा सुंदर साज

Nilesh Ghaiwal : फरार गुंड निलेश घायवळला पुणे पोलिसांचा दणका, आता बायको अन् मुलगाही अडचणीत, कारवाईची टांगती तलवार कायम

Kalyan : कचऱ्यात पडलेले गुलाबजामुन खाण्याचा मोह; मुलीची प्रकृती बिघडली, कल्याण पूर्वेतील धक्कादायक घटना

POK Erupts After Nepal: नेपाळनंतर POK पेटलं, जनतेचं बंड, मुल्ला मुनीरची घाबरगुंडी

SCROLL FOR NEXT